Friday, December 25, 2009

बरहाताईचा गुगल-दादा (इमे)

गेल्या आठवड्यात एका मित्राने बरहाताईच्या या गुगल-दादाबद्दल सांगितलं. इमे त्याचं नाव. मी कधीपासून डाउनलोड करून ट्राय करणार होतो पण राहून जात होतं. शेवटी आज वेळ मिळाला आणि हे गुगल इनपुट मेथड एडिटर (IME - इमे) डाउनलोड केलं. एकदम झक्कास आहे. बरंचसं बरहा सारखंच आहे. म्हणजे तळाशी लँग्वेज बार उघडतो. तिकडे मराठी निवडायचं. (आणि ही मराठी, हिंदी, कन्नड, तेलुगु भाषा वगैरे आपण डाउनलोड करायच्या वेळी निवडायची.) आणि नेहमीप्रमाणे दाणादण टंकायचं. बरहावाल्यांना कदाचित विशेष आवडणार नाही. पण माझ्यासारखे गुगल भक्त असतील त्यांना नक्की आवडेल. आणि खूप सोयीस्कर पण वाटेल. क्वीलपॅड, बरहा वगैरे मध्ये कॉमनसेन्सचा अभाव आहे असं मला वाटतं. म्हणजे गुगल मराठीतले नेहमीचे वापरातले शब्द आपोआप टिपतं. पण क्वीलपॅड, बरहा ते नाही करत. सोप्प उदाहरण म्हणजे "येतं, जातं, करतं" सारख्या शब्दांमधला शेवटचा अनुस्वार किंवा विंग्रजीत लिवलेले office किंवा camera सारखे शब्द गुगल बरोब्बर टिपतं. अर्थात क्वील/बरहा मध्ये पण असेल अशी काहीतरी सोप्पी सोय किंवा शोर्टकट. पण मला नाही सापडले. अजून एक म्हणजे IME मध्ये आपण शब्द टाईप करायला लागलो कि तिथे तो आपोआप आपल्याला शब्द सुचवतो. म्हणजे समानार्थी वगैरे नाही हो (करेल. ते पण करेल गुगल १-२ वर्षात :P) . म्हणजे word-suggestion. आपल्या मोबाईल मधल्या डिक्शनरी सारखं.
गुगलदादा काय एकेक प्रोडक्टस काढतो यार. (आणि पुन्हा चकटफू) जी-मेल, युट्युब, ओर्कट,पिकासा, अर्थ, जी-टॉक, क्रोम, गुगल maps. गुगल वॉईस. सगळे एकापेक्षा एक. गुगलने जी-टॉक जी-मेलच्या पेज मधेच इंटीग्रेट केल्यावर याहूला पण तसं करावंच लागलं. किंवा पीसी-टू-पीसी वॉईस चॅट पण सुरु केलं ते गुगलने. त्यांनी क्रोम लॉंच केल्या केल्या त्या दिवसापासून मी ते वापरायला सुरु केलं. काय मस्त लाईट-वेट आहे. खरंच अगदी हलकं-फुलकं वाटतं. लॅपटॉपलाही आणि आपल्यालाही.. आता वाट पहायची ती क्रोम ओ.एस. ची.
असो गुगलचा उदो उदो थोडा अति होतोय आणि तो उद्देश नव्हता या पोस्टचा. इमे बद्दल चटकन-पटकन सांगायचं होतं. म्हणून हे क्विक पोस्ट.

20 comments:

 1. गुगलदादा बद्दल काय बोलनार "दादाच" ते शेवटि. पन ओफिसमध्ये आम्ही नाही ना डाउनलोड करू शकत.. (अडमीन पासवर्ड नाही ना, तरिही प्रयत्न केलाच... नाही जमले) .. पन मस्त आहे...

  पाचोळा.

  ReplyDelete
 2. दोस्ता लई भारी, खूप सोप झालं आता टाईप करण. भारी अ‍ॅप्लीकेशन आहे हे.

  -अजय

  ReplyDelete
 3. डाउन लोड केलंय.. आता वापरुन पहातो.

  ReplyDelete
 4. धन्यवाद साळसूद पाचोळा. जेव्हा जमेल तेव्हा करून बघा. एकदम मस्त आहे..

  ReplyDelete
 5. अरे खरंच अजय. म्हंटलं ना दणादण टंकायचं ते अगदी खरं आहे.

  ReplyDelete
 6. वापरून बघा काका. तुम्ही बरहा वापरता ना. आता हे कसं वाटतंय बघा. आय थिंक आवडेल.

  ReplyDelete
 7. एरवी बरहा वापरते मी.. आता गुगल वापरून बघते...

  ReplyDelete
 8. ह्म्म्म. वापरून बघा. बरहा वापरणार्यांना आवडेल कि नाही सांगता येत नाही. मला मात्र जाम आवडलं.

  ReplyDelete
 9. google is great
  pan aapale gamabhana aahe na
  fastat tanakayala
  check gamabhana also

  ReplyDelete
 10. डाउनलोड करतोय, गूगलच्या इतिहासावरुन हे चांगलच असणार याची खात्री आहे....

  ReplyDelete
 11. एकदम मस्त आहे. बरेच जणांचे मेल्स पण आले मला. :) वापरून बघा.. आवडेल नक्की.

  ReplyDelete
 12. विनायक, ह्म्म्म.. मी बरहा, क्वीलपॅड वापरलय. गमभन बद्दल ऐकलय. वापरलं नाही कधी. बघतो एकदा ट्राय करून.

  ReplyDelete
 13. आपले स्थानिक लोक करत नाहीत ते काम आंतरराष्ट्रीय स्तराची संस्था करते? एकच शब्द ! अप्रतिम !

  ReplyDelete
 14. ह्म्म्म.. नाही अगदी असंच नाही. आपल्याकडे पण क्वीलपॅड, गमभन अशा साईट्स आहेत मराठी टंकायला. पण गुगल इमे खूपच युजर-फ्रेंडली आहे.. वापरून बघा.. आवडेल.. !!

  ReplyDelete
 15. माझ्या ब्लॉग चे टायपिंग पहा. गेल्या वर्षीच मला गुगल मिळाले. मस्त आहे. नो मिस्टेक. मी महेंद्र न सांगितले होते की मी गुगल वर टाईप करते. मला बरहा आवडले नाही. ह्रस्व दीर्घ खूप चुका होतात. असो आपण सांगितले हे बरे केलेत कारण बराहा च्या लिमिटेशन मुळे चुका दिसत असूनही आपण हतबल होतो. आता बऱ्याच ब्लॉग वर कमीतकमी चुका दिसतील.

  ReplyDelete
 16. अनुक्षरे, बरोबर आहे. मला पण बरहाचा हाच अनुभव आहे. पूर्वी मी जीमेलच्या मध्ये बिल्ट-इन असलेल्या "indic transliteration" ने ब्लॉग्स लिहायचो. पण आता तर गुगल इमे मुळे ऑफलाईन असतानाही ब्लॉग लिहिता येतो.

  ReplyDelete
 17. आवडलं हो,
  फोनेटिक कि काय म्हणतात त्या प्रकारातला मला पटलेला हा पहिलाच प्रकार. बराहा वापरून पाहिलं, ओनलाईन प्रकार पण वापरून पहिले पण फारसे पटले नाहीत. हा त्यातल्यात्यात वापरायला सोपा वाटला. सध्या windows मधल्या मराठी keyboard ची प्रचंड सवय झालीय. उच्चारांनुसार किल्ल्या बडवणे अवघड जातंय :)

  ReplyDelete
 18. बरोबर. फोनेटिकच बहुधा. अरे वापरून बघ हे बाकी सगळ्यांपेक्षा जाम फंडू आहे. म्हणजे मला तरी वाटलं. :-)

  ReplyDelete
 19. २००९ सालातले सारे लेख वाचुन संपवले... खरं तर प्रत्येक लेखावर प्रतिक्रिया द्यायला हवी... पण लई आधाश्यासारखे एक एक करत सारे वाचु लागलो.... हुश्श्श... एवढे सगळे विषय वाचले की आता कशावर काय प्रतिक्रिया देऊ समजत नाहीये. सगळ्या पोस्ट्ससाठी एक कॉमन प्रतिक्रिया म्हणजे >> व्वाह, हम्म्म (इथे मी विचारात पडलेलो), बरोब्बर (इथे मी विचारातुन बाहेर आलो), झक्कास, ह्यॅह्यॅह्यॅ

  :D :D :D

  ReplyDelete
 20. सौरभ !!!! तुझ्या हिमतीला आणि चिकाटीला दाद देतो रे मी.. !! मानलं शेठ मानलं. गेले काही दिवस मला मॅपवर Utica, NY वेगवेगळया पोस्ट्सवर दिसत होतं खरं पण तू सगळा ब्लॉग वाचून काढशील असं वाटलं नव्हतं.. हेहेहे.. खरंच खूप खूप आभार !! :)

  ReplyDelete