Sunday, January 3, 2010

अल्पविराम संपला... पण !!!!

गेला आठवडाभर (न सांगता) घेतलेला अल्पविराम किंवा मध्यंतर/ब्रेक/टाईम-प्लीज वगैरे वगैरे संपला/ली. कोण वाट बघताय म्हणा माझ्या पोस्टची. पण ही अशी सुरुवात केली कि जरा बरं वाटतं आपलं आपल्यालाच. अल्पविरामाचं कारण म्हणजे घर-बदली उर्फ मुव्हिंग. आठवडाभर पॅकिंग, अन-पॅकिंग करत करत शेवटी आलो एकदाचे नवीन घरात. नवीन म्हणजे, कोरं करकरीत वगैरे नाही हो. आधीच्या घराऐवजी आता हे दुसरं घर. म्हणजे नवीनच नाही का. तर हे मुव्हिंग प्रकरण संपवून, नवीन घरात समान लावून, (इंटरनेट सुरु व्हायला २ लागलेले दिवस धरून) जवळपास आज ४ दिवसांनी आलो नेटवर. म्हटलं काहीतरी खरडूया ब्लॉगवर. मुव्हिंग, नवीन वर्ष, स्नोफॉल कशावरही. एकीकडे मेल्स, जुन्या पोस्ट्सवरचे कमेंट्स अप्रूव करणं चालू होतं आणि आपले नेहमीचे मराठी ब्लॉग्स पण चाळत होतो. कमेंट्स टाकत होतो. आणि बघता बघता अचानक कळलं उचलेगिरी झालीये. मी लिहिलेल्या एका जुन्या कवितेची. पुन्हा नीट बघितलं. कविता माझीच होती पण माझा नामोल्लेख कुठेही नाही. वाईट वाटलं थोडं. ब्लॉगच्या मालकाच्या काही खाणाखुणा, नाव-गाव, contact-me वगैरे काही आढळलं नाही सुरूवातीला. ब्लॉगचा फॉलोअर म्हणून जॉईन झाल्यावर एक लिंक मिळाली ब्लॉग-मालकाशी संपर्क करायची. २-३ जण मालक आहेत असं आढळलं. ज्याने माझ्या कवितेचं पोस्टिंग केलं होतं त्याच्या नावाने मायना टाकून त्याला सौम्य शब्दात जाणीव करून दिली आहे. बघुया काही प्रतिसाद मिळतो का. १-२ दिवसात काहीच उत्तर आलं नाही तर नवीन पोस्ट टाकेन त्या ब्लॉगची आणि माझ्या मूळ कवितेची लिंक देऊन.
नंतर सहज म्हणून तो ब्लॉग चाळत होतो. भरपूर लेख, कविता, गाणी, चित्रपट सामिक्षेसारखं काहीतरी असे बरेच प्रकार आहेत. काही ठिकाणी मूळ लेखकाची नावे आहेत तर बऱ्याच ठिकाणी नाहीत. माझा साधारण असा अंदाज आहे कि "नेटवर मराठीत जे जे आढळेल ते सरसकट (आणि बरेचदा मूळ लेखकाचे नाव न घालता) आपल्या ब्लॉगवर टाकणे" हा अजेंडा असावा. असो.
खरंतर काहीतरी चांगलं, नवीन किंवा थोडक्यात मी वर जे काही लिहिलं आहे ते न लिहिता दुसरं काहीतरी लिहायचं होतं. पण उचलेगिरी बघून जरा मूड गेलाय. अर्थात तात्पुरताच. ही नवीन गडबड संपली की लिहीनच पुन्हा.

8 comments:

 1. कुठला ब्लॉग आहे तो? लिंक नाही दिलीत.
  बाकि इतरांची काही चोरी केलेले सापडु शकते.

  ReplyDelete
 2. २०१० ची सुरूवातचं उचलेगिरी प्रकरणांपासून झालीय. इकडे "३ ईडियट्स" वरुन चेतन भगत आणि AK, VVC, RH पेटले आहेत. लोकांना मूळ लेखक/कवीला श्रेय न देता चोर्‍या करायला खूप आवडतं. काय करणार असते एकेकाला आवड.

  तुम्हाला नवं वर्षाच्या शुभेच्छा.

  ReplyDelete
 3. चांगली वरात काढायची हेरंब. काय नांव आहे त्याच?

  ReplyDelete
 4. हो ना काका. जर का काही उत्तर नाही आलं तर तेच करावं लागणार आहे..

  ReplyDelete
 5. हो ना सिद्धार्थ. ही प्रवृत्तीच फार घातक.. पण आमीर कडून ही अपेक्षा नव्हती. असो. तुम्हालाही नवीन वर्षाच्या शुभेच्छा !!

  ReplyDelete
 6. आनंद, त्यांचं काही उत्तर नाही आलं तर लिंक देतोच १-२ दिवसात. हो मला पण ते च वाटतंय कि बऱ्याच जणांचे लेख/कविता सापडू शकतील त्या ब्लॉगवर.. !!!

  ReplyDelete
 7. अगदी नव्या वर्षाचा मूड खराब झाला असेल ना?? अरे पण देऊन टाक ना लिंक....तसंही नाव न देता तुझी कविता चोरली तर आहेच ना??
  असो...नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि मुव्हिंगचा थकवा गेला असेल अशी अपेक्षा...

  ReplyDelete
 8. ह्म्म्म. मुव्हिंगची कटकट आणि त्यात लॉगिन झाल्यावर हे असं. झाला मूड-ऑफ.. पण थोडासाच.. अगं हो. लिंक तर देणार आहेच. पण त्याला/त्यांना उत्तर द्यायला २ दिवस देईन म्हणतो. नाहीतर पुढचं पोस्ट लिंकसकट.. तुलाही नवीन वर्षाच्या शुभेच्छा !! :-)

  ReplyDelete