Friday, January 8, 2010

गर्जा जयजयकार क्रांतीचा (कुसुमाग्रजांची क्षमा मागून)

गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!! तुम्ही विचाराल कसली क्रांती. सांगतो. मला लहानपणी क्रांती या शब्दाचा अर्थ नीट कळायचा नाही. (पोस्ट वाचून झाल्यावर तुम्ही म्हणाल आत्ता तरी कुठे कळलाय पठ्ठ्या). म्हणून मग मला कोणीतरी सोप्प्या शब्दात समजावून सांगितलं क्रांती म्हणजे बदल. अर्थातच फार ढोबळ अर्थ होता तो. पण आम्हाला आपलं ढोबळ, अंदाजे, शक्यतो, साधारण, बहुतेक, जमल्यास, कदाचित, बघुया हे असलंच आवडतं. बरं पडतं असं कुंपणावर राहिलं की. सेफ गेम. च्या मारी. (ही शिवी नाही. अजयचं शिवी-पुराण वाचा. अजय, तुझ्या आजच्या हिट्स माझ्याकडे वळव रे बाबा ;-) )

असो. वरच्या यादीत पाल्हाळ हे विशेषण जोडून घ्यायचं नाहीये म्हणून मुद्द्याकडे सरकू. (सरक ना रे बाबा, कोणी अडवलंय तुला.) अर्थात पोस्ट वाचून झाल्यावर तुम्ही म्हणाल कुठला आणि कसला मुद्दा राजा? पण असो. निंदकाचे घर असावे शेजारच्या ब्लॉगवर..

तर कुठे होतो आपण? हो हो .. क्रांती क्रांती. तर क्रांती म्हणजे बदल. आणि आमच्या ब्लॉग मधला बदल सुज्ञ वाचकांच्या एव्हाना (???) लक्षात आलाच असेल. (डोळे फुटले नाहीत अजून आमचे. चांगले शाबूत आहेत.. @*#$^*&). अर्थात ती क्रांती आणि हा बदल यांचं नातं जोडणं म्हणजे
१. सुर्व्यानं काज्यव्यासमोर चमकण्यासारखं आहे.
२. सशानं आपल्या टाळूला गंडस्थळ म्हणण्यासारखं आहे.
३. नळाच्या कृपेनं पाउस पडण्यासारखं आहे.
(पु ल, तुम्ही नसतात तर या तीनही मुद्द्यांच्या जागा मला रिकाम्या ठेवाव्या लागल्या असत्या एवढं चपखल लागू होतंय ते इकडे.)

तर एव्हाना तुमच्या लक्षात आलंच असेल की तशा अर्थाने क्रांती-बिंती काही नाही (पण एका अर्थाने आहेच. आठवा : क्रांती=बदल) ही तर आमची साधी-सोपी छोटीशी रंग-रंगोटी. (पण हे आधीच सांगितलं असतं तर पोस्ट थोडीच वाचलं असतंत आत्तापर्यंत?? ;-) ). तर ही रंग-रंगोटी कशी वाटली सांगा. की जुना रंगच चांगला होता ते ही कळवा. (डीस्टेमपर का होईना त्यात तुझं वाफाळलेलं तोंड तरी बघावं लागत नव्हतं)
तर पुन्हा एकदा क्रांतीचा आपलं रंग-रंगोटीचा जयजयकार !!!

19 comments:

 1. 'क्रांती' मस्त आहे, फक्त पोस्ट मधल्या लिंक चा कलर चटकन लक्षात येईन असा ठेव. :-)

  -अजय

  ReplyDelete
 2. आता थोडा बदललाय. आता जरा नीट दिसते लिंक आधीपेक्षा.. आभार.. !!

  ReplyDelete
 3. रंगीत क्रांती आवडली बाबा मला !

  ReplyDelete
 4. अमेय, रंगीत क्रांतीचा जयजयकार रे :-)

  ReplyDelete
 5. ata jaaste aakarshaniya vattoy post :)

  ReplyDelete
 6. आभार रश्मी मॅडम .. :-)

  ReplyDelete
 7. चांगली क्रांती आहे.....आणि फ़ोटो एकदम अटलांटिक नाहीतर पॅसिफ़िकमध्ये स्पीडबोटवर भन्नाट वेगाने जातोयस असं वाटतंय....

  ReplyDelete
 8. हा हा. थँक्स.. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या इथला आहे स्नॅप आहे आणि मी नॉर्मल उभा आहे. बायको ३-डी अॅनिमेटर असल्याचा फायदा. तिनेच अँनिमेशन मध्ये काहीतरी चमत्कार करून मला स्पीड बोट वर पाठवलंय ;-)

  ReplyDelete
 9. आणि हो. मागे अर्थातच हडसन नदी आहे.. ही ही..

  ReplyDelete
 10. चांगली क्रांती आहे. अभिनंदन. :)
  सवड मिळाल्यानंतर अशीच क्रांती पुन्हा करायचा माझाही विचार आहे.

  आणखी एक क्रांती, पण थोड्या वेगळ्या अर्थाची, येथे वाचावी.
  http://maajhianudini.blogspot.com/2008/05/blog-post_12.html

  ReplyDelete
 11. आभार देवदत्त.. तुम्हाला क्रांतीची गरज नाहीये हो. छान दिसतोय तुमचा ब्लॉग तसाही. पोस्ट्स थोडे फ्रीक्वेन्ट येउदेत म्हणजे झालं :-)
  तुमची क्रांती वाचली. सहीच डेरिंग आहे बाबा :)

  ReplyDelete
 12. हेरंबजी,
  अनेक धन्यवाद. मीदेखील तुमचा ’झोपेवरचा’ ब्लॉग वाचला. अगदी अनुभुतीचा विषय असल्याने प्रत्यंयकारी वाटला. (बघा, असं लिहीत गेल्यावर वाचकाला झोप येणार नाही तर काय?)
  तुमचे बाकीचेही लेख फारच छान आहेत. फार बरे वाटले हे सर्व वाचून.

  ReplyDelete
 13. धन्यवाद विक्रांतजी. (बाय द वे. मला एकेरी आवडेल.) खरं सांगतो. पुन्हा एकदा वाचलं तुमचं झोपेवरचं पोस्ट. अगदी फ्रेश (किंवा झोपाळल्यासारखं :P) वाटलं. बाकीचे पोस्ट्सही वाचले. खुपच छान लिहिलं आहेत.

  ReplyDelete
 14. तुमची क्रांती छान दिसते, त्यामुळे आम्हाला पसंत आहे ;)

  ReplyDelete
 15. धन्यवाद आनंद. हेरांबो खुश हुआ :P

  ReplyDelete
 16. छान दिसतो आहे ब्लॉग..म्हणजे क्रांती चांगली आहे...शिवाय बदल हा हवाच असतो...

  ReplyDelete
 17. आभार देवेंद्र.. !!

  ReplyDelete
 18. मागे कमेंतायचे राहून गेले होते. आता पुन्हा एकदा क्रांती घडवतो आहेस का??? मी काल सर्व ब्लोग्सना नवीन कपडे केले... :D

  ReplyDelete
 19. :) .. नाही रे. आता हेच रुपडं कायम :)..

  ReplyDelete