Tuesday, March 16, 2010

डोसा : भाग २

भाग १ इथे वाचा

काय हे !!!. काय करत होतो मी !!! कोण कुठला तो माणूस ज्याच्याबिषयी मला एक अक्षरही माहित नव्हतं त्याला आणि त्याच्या मुलांना मी सरळसरळ गबाळं बनवून टाकलं होतं. क्षणभर ओशाळलो मी. पण खरंच ती मुलं म्हणावीत तर तीही अशीच अस्वच्छ आणि मळक्या कपड्यांमधलीच होती. ज्यांना घालायला धड कपडे नाहीत असे लोकं या असल्या हॉटेलमध्ये येऊन पन्नास रुपयांचा डोसा कसा खाऊ शकतात याबददल मला राहूनराहून कुतूहल वाटत होतं.

---------------------------------

"बाSSबाSS, कर ना" उन्मेष.
"अरे का ओरडतोयस? काय करू?"
"अरे छकुलीने तुला दोनदा सांगितलं आईला फोन कर म्हणून, तिला विचार ती कधी येत्ये म्हणून. तर तुझं लक्षच नाही."
"अरे सॉरी करतो आत्ता लगेच फोन. मी जरा ऑफिसच्या कामाचा विचार करत होतो."
फोनवर बायकोचं अपेक्षित उत्तर मिळाल्याने आम्ही हॉटेलमधून निघालो. तिला घरी पोचायला पहाट होणार होती. नंतर विकेंडची कामं, खरेद्या यात वेळ गेला आणि नंतर सुरु झालेला नेहमीसारखाच धावपळता आठवडा यात मी तो प्रसंग पूर्णपणे विसरून गेलो.

**

गुरुवारी रात्री अभ्यास चालू असताना छकुलीने पुन्हा विषय काढला.
"आई, उद्या जाऊयाना पुन्हा हॉटेलात. तू पण यायचंस यावेळी. सगळेजण जाऊ."
"बघू ते... तू आधी तुझा अभ्यास संपव."
"आंSS .. नाही ना... आधी सांग"
"सांगितलं ना बघू म्हणून.... राजा मला खरंच वेळ नाहीये ग."
"जा.... तू उद्या येणार नसशील तर मी अभ्यासच नाही करणार."
"ए त्याचा आणि अभ्यासाचा काय संबंध?"
"नाही नाही नाही.... नाहीच करणार मी अभ्यास."
मायलेकीचा प्रेमळ संवाद भलत्याच दिशेने चाललेला बघून मी मध्ये पडलो.
"बरं उद्या जाऊया. उद्या आई येईल नक्की."
"अरे पण"
मी नुसती डोळ्याने खुण केली तिला गप्प बसण्याची. चिरंजीव उगाचंच हसल्यासारखे वाटले मला पण मी दुर्लक्ष केलं. दोन्ही पिल्लं पुन्हा अभ्यासात रमल्याचं पाहून सौ. ने खुण करून मला किचन मध्ये बोलावलं.
"अरे मी तुला संध्याकाळीच सांगणार होते की मला उद्याही ऑफिसमध्ये बसायला लागणार आहे. उद्याची क्लायंट मीटिंग तर अजून भयंकर होणार आहे. गेल्यावेळी आयत्यावेळी बसायला लागलं म्हणून सगळ्यांनी बडबड केली म्हणून पीएमने आज सकाळीच इंटर्नल मीटिंगमध्ये सांगून टाकलं की Friday will be an all-nighter. आणि कदाचित रविवारी पण जावं लागेल. मी तुला संध्याकाळी सांगणारच होते पण तू नुकताच ऑफिसमधून आलेलास तेव्हा तुझा मूडऑफ नको म्हणून नंतर सांगू म्हटलं."
"हो ना आणि तेवढ्यात मी नेमका माझ्या पायावर धोंडा पाडून घेतला." मी हसत म्हणालो. तीही हसली आणि सॉरी म्हणाली.
"पण आता छकुलीला कसं सांगायचं? आता उद्या मी आले नाही तर तिला वाटेल तिने अभ्यास करावा म्हणून आपण खोटं खोटं सांगत होतो असं."
मी म्हटलं "मी बघतो काय करायचं ते"
अभ्यास आणि जेवणं झाल्यावर रात्री झोपायच्या वेळी मी छकुलीला समजावून सांगितलं की आईला उद्या पण काम आहे ऑफिसमध्ये त्यामुळे ती आपल्याबरोबर हॉटेलमध्ये येऊ शकणार नाही. पण आपण नक्की जाऊया. ती आधी थोडी हिरमुसली पण नंतर तयार झाली. आईने आपल्याला न येण्याबद्दल गेल्यावेळसारखं आयत्यावेळी न सांगता आधीच सांगितलं या विचाराने तिला थोडं बरं वाटलं.

**

ठरल्याप्रमाणे दुसर्‍या दिवशी पुन्हा आम्ही तिघेच जण हॉटेलमध्ये पोचलो. पण यावेळी छकुली आणि उन्मेष सुद्धा थोडे खुशीतच होते. एक तर लागोपाठ दुसर्‍या शुक्रवारी हॉटेलमध्ये जेवायला जात होतो आणि दुसरं म्हणजे यावेळी शेवटच्या क्षणापर्यंत आईची वाट बघायला लागणार नव्हती. मी ऑफिसमधून येऊन फ्रेश झाल्यावर आम्ही लगेच निघालोही होतो.

"काही झालं तरी तुला यावेळी डोसा मिळणार नाही" असं मी बजावून सांगितल्याने छकुलीने "त्या दादाला सगळं हवं ते देता तुम्ही लोकं आणि मला मात्र नाही" अशी कटकट करत नाइलाजानेच इडली मागवली होती. आमच्या ऑर्डर्स येईपर्यंत मी जरा रेस्टरूमला जाऊन यावं अशा विचाराने उठलो. दोघांनाही जाग्यावरून न उठण्याविषयी सांगून आणि उन्मेषला छकुलीवर लक्ष ठेवायला सांगून मी रेस्टरूमच्या दिशेने निघालो. वाटेत माझी पावलं थबकली. मला पुन्हा तो गेल्या वेळचा गबाळा परिवार दिसला. पण आज जरा बरे वाटत होते सगळे जण. तो माणूस दाढी बिढी करून, स्वच्छ कपडे घालून आला होता. मुलंही जरा बर्‍या कपड्यात दिसत होती यावेळी. पण त्यांची खाण्याची पद्धत जवळपास तशीच होती. त्याच्या डोळ्यातले कौतुकाचे भाव, मधेच शून्यात बघणं हे सारं सारं जसंच्या तसं होतं. पण अचानक मला काहीतरी जाणवलं. ती गेल्या वेळी डोसा खाणारी मुलगी थोडी वेगळी दिसत होती. गेल्यावेळी तिचे केस अगदी लहान होते. पण यावेळी मात्र चांगले मोठे दिसत होते. मी इतर दोन मुलांकडेही बघितलं आणि माझ्या लक्षात आलं की खाण्याची पद्धत आणि वयं सारखीच असली तरी ही तिन्ही मुलं गेल्या वेळच्या मुलांपेक्षा वेगळी होती. माणूस तर तोच वाटत होता. नाही नक्की तोच होता. मग ही नवीन तीन मुलं कोण? की याला सहा मुलं आहेत? आणि याची बायको कुठे आहे वगैरे प्रश्नांनी मला त्या दोन मिनिटांत घेरून टाकलं. तेवढ्यात एका वेटरने त्या टेबलवर बटर नान ठेवली आणि जायला लागला. मी त्याला खुण करून बोलावलं आणि विचारलं "कोण आहे रे हा माणूस?"
"आपल्याला काय माहित साहेब. त्याने अजून एक बटर नानची ऑर्डर दिली, आपण दिली बटर नान. आता तो कोणीका असेना"
"अरे तसं नाही. तुझ्या मॅनेजरला बोलाव."
"का साहेब उगाच मॅनेजरला बोलावताय. मी काय केलं. तुम्ही जे विचारलत त्याचं मला जेवढं माहिती आहे तेवढं उत्तर दिलं. माझं काय चुकलं? उगाच मॅनेजरला कशाला बोलावताय?"
"अरे बाबा, तुझ्यासाठी बोलवत नाहीये मॅनेजरला. मला त्या माणसाबद्दल विचारायचं आहे." असं सांगितल्यावर हायसं वाटून त्याने मॅनेजरला बोलावलं.

काही क्षणात स्वच्छ गणवेशातला एक मध्यमवयीन हसतमुख गृहस्थ माझ्यासमोर उभा राहिला.

"गुड इव्हिनिंग सर. काय झालं काही प्रॉब्लेम झालाय का? काही हवंय का आपल्याला?"
मी म्हटलं "हो. मला माहिती हवीये त्या माणसाबद्दल. कोण आहे तो. ती मुलं कोण आहेत?" मी माझं कुतूहल वाढवत नेणार्‍या त्या माणसाकडे हलकंच बोट दाखवलं.
"तो काही बोलला का तुम्हाला?"
"नाही"
"मग त्या मुलांनी काही त्रास दिला का?"
"नाही. अहो तसं नाही. मी गेल्यावेळी आलो होतो तेव्हा पण हा माणूस इथे होता. त्याच्याबरोबर अशीच २-३ मुलं होती. आज पण ३ मुलं आहेत. पण वेगळीच आहेत ती. गेल्यावेळेसची नाही. कोण आहे हा माणूस? कोण आहेत ती मुलं ? काय प्रकार आहे हा सगळा?"
त्याने मला थोडं बाजूला नेलं आणि बोलू लागला "सर त्याचं नाव शांताराम.....

-- क्रमशः

- भाग ३ अर्थात अंतिम भाग इथे  वाचा.  

28 comments:

 1. आयला.. हेरंब.. बाबारे.. असे छोटे छोटे पोस्ट नको ना रे टाकू. सधी पण इतकी मस्त जाते आहे स्टोरी की वाट बघवत नाही रे. संध्याकाळ पर्यंत पूर्ण कर नाहीतर बघ हां!!!

  ReplyDelete
 2. ठरलं. पुढच्या वेळी पूर्ण कथा लिहून झाल्याशिवाय टाकणारच नाही पोस्ट.. :) ट्राय करतो संध्याकाळपर्यंत संपवायचा (भारतातल्या संध्याकाळ पर्यंत)

  ReplyDelete
 3. आरे रामा... आरे हेरंबा.... परत एक क्रमश: ....काय रे.. तू काय "सरिता" चा वाचक होतास का?? त्यात यायचं धारावाईक कादंबरी.. नेहेमी क्रमशः... आता संपव ना बाबा... कशाला जीव जाळतोस आमचा..
  BTW, तुला chat वर जे बोललो तसलाच काही तरी प्रकरण दिसतंय हे.. काय??

  ReplyDelete
 4. सरिता?? :) .. नाही रे तसलं काही नाही. ते लोक मुद्दाम पाणी घालून घालून कथा वाढवत राहतात अजून अजून भाग टाकायला. माझी कथा पाणी घालून वाढवल्यासारखी वाटत्ये का? लवकरच संपेल. chat बद्दल ... मम्म same answer no comments ;)

  ReplyDelete
 5. शेवटी प्रतिक्रिया देणार होते पण एकदम मस्त फ्लो होतोय फक्त या क्रमश:मुळे जरा....... टाक रे पटकन. आवडतेय. :)

  ReplyDelete
 6. आभार भाग्यश्रीताई.. तुमच्यासारख्या कथा लिहिणार्‍या व्यक्तीला आवडली म्हणजे नक्कीच जमतंय.. पुढचा भाग लवकरच टाकतोय.

  ReplyDelete
 7. Next Dosa plzzzzzzzzzzzzz....
  Be Fast.............
  Khuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuup bhook lagali aahe.................Aata thambat nahi.................

  ReplyDelete
 8. सागर, पुढचा भाग उद्या नक्की ...

  ReplyDelete
 9. I don't know how I landed on this blog.....
  (was searching something else...)

  but, I truly know, your writings are awesome.

  Waiting for more Dosa.....

  Keep going.
  Vineet

  ReplyDelete
 10. आभार विनीत आणि ब्लॉगवर स्वागत.. !!!
  Glad you liked it. Thanks for the kind words. More Dosa will be served tomorrow !

  ReplyDelete
 11. क्रमशः ...चा नि....षे.....ध......हेरंब अरे डेली सोप नको रे. . . . लवकर संपव रे!!! बाकी मस्त जमली आहे कथा....मजा येते आहे वाचताना!!!

  ReplyDelete
 12. आभार मनमौजी. उद्या (बहुतेक) शेवटचा भाग आहे. :)

  ReplyDelete
 13. हेरंब,
  कथा साधी पण खुपंच सुंदर झाली आहे... मी पुढच्या भागाची वाट पहातोय...

  ReplyDelete
 14. आभार आनंद. पहिलाच प्रयत्न इतक्या सगळ्यांना आवडला हे बघून बरं वाटतंय.. पुढचा भाग उद्या नक्की.

  ReplyDelete
 15. Bhag 3 kuthe aahe mitra.... lawkar yeu det...

  ReplyDelete
 16. शार्दुल, ब्लॉगवर स्वागत.. उद्या टाकतोय पुढचा भाग.

  ReplyDelete
 17. अजुन कित्ती वाट पहावी लागणार????पोटात चुहे दौड रहे है....1 more dosaa plss....अब नही रहावींग....

  ReplyDelete
 18. आता जोवर तुझं सारचं पीठं आंबत नाही तोवर कमेंट नाही..... एक डोसा घालायचा आणि डाळं तांदुळ भिजवायचे... निषेध.... नही चलेगा नही चलेगा...क्रमश: नही चलेगा!!!!

  ReplyDelete
 19. e na cholbe....
  kramashahcha trivaar nishedh...!

  ReplyDelete
 20. सुंदर कथा. पुढचा भाग लवकर...!

  ReplyDelete
 21. माऊ पुढचा डोसा आज रात्रीपर्यंत (इकडच्या) टाकतोय.. नक्की..

  ReplyDelete
 22. आज रात्री येणार पुढचा डोसा.. आणि पुढच्या डोश्यावर तुला कमेंट टाकल्याशिवाय राहवलं गेलं तर मी नाव बदलेन.. :)

  ReplyDelete
 23. विद्याधर, अजून थोडाच वेळ... :)

  ReplyDelete
 24. आभार 'यदा-यदा ही धर्मस्य'.. आणि ब्लॉगवर स्वागत. पुढचा भाग येतोय लवकरच...

  ReplyDelete
 25. mast ahe hi katha...interesting!

  ReplyDelete
 26. खूप आभार, योग.

  ReplyDelete
 27. बर आहे मला पुढचा भाग वाचण्यासाठी वाट बघावी लागत नाहिये...आतापर्यंत तरी भट्टी मस्त जमली आहे...

  ReplyDelete
 28. आभार देव. अरे सगळ्यांनी भंडावून सोडलं होतं :-) .. तिसरा भाग वेळेवर टाकला म्हणून वाचलो नाहीतर काय झालं असतं माझं देव जाणे.

  ReplyDelete