Sunday, March 21, 2010

आईशप्पत !!

* लहानपणी आमच्या चाळीत गणपतीच्या शेवटच्या दिवशी सगळ्या वर्गणीदारांची नावं एकत्र करून एका (सगळ्यात.. म्हणजे आमच्यापेक्षाही) लहान मुलाच्या (आता मालिकांमध्ये आणि चित्रपटात दाखवतात तशा चुणचुणीत, आगाऊ मुलाच्या हस्ते नाही, कोणाही सामान्य मुलाच्या) हस्ते तीन चिठ्ठ्या उचलल्या जात. आणि त्या तीन भाग्यवंत विजेत्यांना अनुक्रमे प्लास्टिकची मोठी बादली (किंवा ड्रम/टब वगैरे), मध्यम बादली, आणि छोटी बादली अशी बक्षिसं मिळत. त्या चिठ्ठ्यांमध्ये एकदा तरी आमचं नाव यावं असं मला नेहमी वाटायचं, अहो बादल्या चिक्कार होत्या घरी त्याचा प्रश्न नाही पण ते दिमाखात स्टेजवर जाऊन (गणेशोत्सव मंडळाच्या) अध्यक्षांच्या हस्ते एकदा तरी बक्षीस घेता आलं पाहिजे अशी जाम इच्छा होती. आमच्या शेजार्‍यांची आणि एकूणच सगळ्यांची १०-१० वेळा नावं येऊन गेली पण (दरवर्षी वेळच्यावेळी वर्गणी भरुनही) एकदाही माईकवरून (निदान) 'तिसरं बक्षीस (तरी) ओक' अशी घोषणा ऐकायची माझी इच्छा अपूर्णच राहून गेली. 

* संध्याकाळी मैदानात (मुंबई सोडून डोंबिवलीत आल्यावर .. मुंबईत कुठली आली मैदानं.. वेडे की काय?) क्रिकेट खेळताना नाणं उडवल्यावर 'छापा की काटा' असं ओरडल्यावर मी जर छापा ओरडलो असेन तर काटा किंवा काटा असेल तर छापा येऊन पडायचं. म्हणजे अगदी जणु मी काय ओरडतोय हे त्या नाण्याला ऐकू येतं की काय अशी शंका येण्याएवढं.

* सापशिडी खेळताना इतर पोरांच्या सोंगट्या १५-२० किंवा कित्येकदा ४० पर्यंत गेल्यावरसुद्धा फासे माझ्यावर प्रसन्न होऊन मला सहा टिंबं दाखवतायत असं कधी व्हायचं नाही. एकदा तर एक शूरवीर (नर्व्हस नसलेल्या) नायनटीजमध्ये गेल्यावर मला सहा पडल्याचं मला स्पष्ट आठवतंय. आमच्या बिल्डिंगमधला 'विश्वविक्रम' आहे तो. अगदी आत्तापर्यंत अबाधित राहिलेला.

* नंतर थोडाफार लॉटरी तिकिटं काढून बघायची सवय (नाद नाही सवय) लागली. बरेचदा १००-२०० रुपयांची तिकिटं काढून झाल्यावर ५ रुपयाची लॉटरी लागायची. :(

* नंतर च्यामारिकेत (मीनलचा शब्द) आल्यावर व्हेगस, यॉँकर्स, अटलांटिक सिटी च्या कसिनोंमध्ये (कधीकधी) रात्रभर स्लॉट मशीन समोर बसून कालांतराने पूर्ण कफल्लक होऊन बाहेर पडायची पाळी आली होती. आणि त्यात पुन्हा नुकसानीची डॉलर-टू-रुपये गुणाकाराची दुखरी जखम जास्तच ठसठसणारी..


अरे काय यार सक्काळी सक्काळी नन्नाचा पाढा लावलाय यार? काय झालं एवढं गळे काढायला? हं ?? 
नाही सांगायचा मुद्दा एवढाच की जिथे जिथे म्हणून चिठ्ठीत आपलं नाव येण्यासाठी, छाप किंवा काटा बरोबर पडण्यासाठी, आपण टाकलेल्या फाश्यांवर सहा येण्यासाठी, लॉटरीत किंवा कसिनोत पैसे लागण्यासाठी (आणि इतरही अनेक ठिकाणी वगैरे वगैरे) नशीब लागतं तिथे तिथे या पठ्ठ्याने आमची चांगलीच फजिती केलेली आहे. 

पण आज अचानक रोहनने मला पिंगुन "पुन्हा अभिनंदन" केलं. तेव्हा मला वाटलं की आदितेय चालायला लागलाय त्याबद्दल ब्लॉगपोस्टवर कमेंट टाकून अभिनंदन केलेलं आहेच आणि परत चॅटवर करतोय म्हणून हे "पुन्हा" असावं. पण नंतर मला भाग्यश्रीताईंचं अभिनंदनाचं मेल आलं. आणि ते मेल वाचल्यावर मला कळलं की इतकी वर्षं कुठल्याही स्पर्धांमध्ये, टॉसमध्ये, लॉटरीमध्ये, हौझीमध्ये आपली साथ न देणार्‍या नशिबाचा मूड आज जरा बरा आहे. कारण  'वटवट सत्यवान'ला नेटभेटतर्फे घेण्यात आलेल्या "मराठी भाषा दिवस" स्पर्धेत चक्क प्रथम क्रमांक उर्फ पाहिलं बक्षिस उर्फ प्रथम पारितोषिक मिळालं आहे. आणि नशिबाचा मूड बरा आहे म्हणतोय ते यासाठी की हे बक्षिस चक्क लकी ड्रॉ मध्ये मिळालं आहे. वा म्हणजे नुसतं गुणवत्तेच्या आणि दर्जाच्या आधारावर कोणीही पाहिलं बक्षिस मिळवेल पण लकी ड्रॉ मधून बक्षिस मिळणं ही कित्ती मोठ्ठी गोष्ट आहे अशा टायपाचं हे वाक्य वाटत असलं तरी इतकी वर्ष हात दाखवून अवलक्षण करणारं नशीब जर एखाद्यावर फिदा होऊन पाहिलं बक्षिस वगैरे द्यायला लागलं तर त्याची (नशिबाची नव्हे माणसाची.. सदरहू प्रसंगात या पामराची) काय अवस्था होईल याचा अंदाज अजूनही आला नसेल तर पहिले पाच तारे (* व्हो) पुन्हा नजरेखालून घाला की राव एकदा.. :-)

स्पर्धेचे निकाल इथे वाचता येतील. आणि हो अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे पहिलं बक्षिस म्हणजे नेटभेटतर्फे स्वतंत्र डोमेन नेम दिलं जाणार आहे. म्हणजे http://harkatnay.blogspot.com/ आता लवकरच http://harkatnay.com/ किंवा http://harkatnay.in (किंवा असंच काहीतरी) वर शिफ्ट होईल. हाय की नाय मज्जा? 

स्पर्धेचे निकाल थोडक्यात देतो. (देतो म्हणजे परीक्षक स्टाईलमध्ये नाय वो.. सांगतो याअर्थी.)

================================================

वाचकांसाठीची स्पर्धा - "मला भावलेले मराठी व्यक्तीमत्व"

प्रथम क्रमांक - सुपर्णा कुल्रकर्णी, मुंबई 

द्वितीय क्रमांक - नीला सहस्रबुद्धे, पुणे 

तृतीय क्रमांक -  आनंद घारे, नवी मुंबई


ब्लॉगर्ससाठीची स्पर्धा -

प्रथम क्रमांक - हेरंब ओक    ( http://harkatnay.blogspot.com/ )

द्वितीय क्रमांक -  आल्हाद महाबळ   ( http://alhadmahabal.wordpress.com )

सर्व स्पर्धकांचे आणि विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन.

================================================

तळटीप (तळटिपेशिवाय आपलं काय होतंय?) : अर्थात हे एवढंसं सांगण्यासाठी एवढ्या मोठ्या पोस्टची गरज नव्हती. पण निकाल बघितल्यावर माझ्या (नेहमीच्या) उतावीळपणामुळे अगदी लगेच बझ करून आणि चॅट स्टेटस अपडेट करून सगळ्या जगाला ओरडून सांगून झालं होतं. सो उगाच कोणाचा (आणि आपला स्वतःचाही) गैरसमज नको म्हणून ही पोस्ट :-) .. भेटूच... !!

45 comments:

 1. पुन्हा एकदा 'च्याभिनंदन' रे सत्यावाना !!! बरं ते डोमेन फ़क्त '१ वर्षाकरता फ्री' आहे बरं का... :)

  ReplyDelete
 2. च्याभार रे :-) .. अरे आता नशीब खुश हाय. दरवर्षी माझंच नाव येणार चिठ्ठीत.. :P

  ReplyDelete
 3. हेरंब, अभिनंदन! प्रयत्नांती परमेश्वर. :) रोहन, तू पण ना... जरा राहू दे की रे खुशीत त्याला.

  ReplyDelete
 4. किंवा "असेल माझा हरी तर डोमेन फ्री करी" असं काहीतरी.. हाहाहा ..

  ReplyDelete
 5. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 6. ब्लॉगनं नशीब काढलं म्हणु शकतो आता तू (पोरानं नशीब काढलं या धर्तीवर) :)

  अभिनंदन!

  ReplyDelete
 7. अभिनंदन हाय बाबा....मला जे म्हणायचं होतं ते वरच्या सगळ्यांनी आधीच म्हटलं की रे...(आनंदने तर खोडून परत) मग परत परत तेच काय?? बरं पण पार्टीचं लक्षात हाय ना??

  ReplyDelete
 8. अरे हो आणि ६० अनुयायी झालेत त्यासाठी डबल अभिनंदन...

  ReplyDelete
 9. You lucky chap!
  मनापासून अभिनंदन!

  ReplyDelete
 10. अभिनंदन रे ... अपर्णाने काहीतरी पार्टीविषयी विचारलंय वर ... त्याच्या उत्तराची मीही वाट बघते ;)

  ReplyDelete
 11. मला पार्टी पाहिजे....अभिनंदन रे दादा......

  ReplyDelete
 12. येऊ द्या आपली स्वारी मुंबईत लवकर...अभिनंदन हेरंब :)

  ReplyDelete
 13. अ.भि.नं.द.न !!!!!त्रि.वा.र !!!!

  ReplyDelete
 14. अभिनंदन त्रिवार अभिनंदन.....

  आणि पार्टी भारतात करा रे...हो ना गं गौरी, नाहितर करायचे अमेरिकेत आणि आपल्याला फोटूवर कटवायचे.... तसा खादाडी राज्याचा प्रधान सेनापती हल्ली तिथेच तळ ठोकुन आहे म्हणा... रोहना लक्ष ठेव रे!!!

  ReplyDelete
 15. abhinandan
  mala jara he ushirach kaltay bahutek...
  :)

  ReplyDelete
 16. कॉंग्रेसअधिवेशन!

  पार्टी करत आहात का? नावनोंदणी कुठे आहे?
  आणि तू लिंक दिलीस होय? तरीच म्हटलं, येवड पब्लिक आज हिकडं कुनीकडं वाट चुकलं? ठ्यांक्यू!

  ReplyDelete
 17. abhinandan bhai...
  vatvatat raha!

  ReplyDelete
 18. हा हा हा आनंद.. ब्लॉगने 'नशीब' काढलं हे अगदी १००% खरं :-)

  ReplyDelete
 19. :-) .. वरच्या सगळ्यांचीच उत्तरं तुला पण :-) .. आभार.. !! आणि पार्टी नुवार्क एअरपोर्टात करून टाकू की आणि त्याआधी तुम्ही लोकं घरी आलात तर उत्तमच :-)

  आणि अग काल झोपायाल गेलो तेव्हा ६० जण होते आज सकाळी बघितलं तर ६२ जण. आयला टेन्शनच यायला लागलंय मला. आता जरा बरं लिवायला लागनार.. हे अनुयायी स्वतःला स्वतःहून रिमुव्ह करू शकण्याचा पर्याय डिसेबल करण्यासाठी शोधलं पायजे कायतरी आता. म्हणजे कायम ६२ तरी राहतील निदान !! :-)

  ReplyDelete
 20. सोनाली, U said it.. yupp. That's me !! आभार :-)

  ReplyDelete
 21. गौरी, तुम्ही पार्टी-माग-धारकांनी (हे हातमागसारखं वाटतंय :P) व्हेन्यू ठरवा मी मेन्यू ठरवतो :-)

  ReplyDelete
 22. सागर, पार्टी साठी गौरी, अपर्णा, तन्वीला संपर्क कर. तुम्ही व्हेन्यू ठरवा मी मेन्यू ठरवतो :-)

  ReplyDelete
 23. आभार सुहास. बघुया कधी येणं होतंय.. आल्यावर भेटूच..

  ReplyDelete
 24. माऊ, आ.भा.र!!!!! त्रि.वा.र !!!! :-) (ही मधली टिंबं F.R.I.E.N.D.S सारखी वाटतायत :-) )

  ReplyDelete
 25. तन्वी, खूप खूप आभार. मी पार्टी प्लानर्स मध्ये गौरी, अपर्णा आणि तुझं नाव घातलंय. तुम्ही ठरवा काय ते :-)

  आणि र.च्या.क. (मराठी BTW), तन्वीबाय, पार्टी भारतात ठ्येवली तर तुमी येनार हायसा जनु !!

  हा हा रोहनला लक्ष ठेवायला सागते आहेस. तो तर आमच्या पार्टीतला आहे सध्या :)

  ReplyDelete
 26. आल्हाद, तुझंही हार्दिक अभिनंदन !!

  ReplyDelete
 27. आता यात कॉंग्रेस कुठून आलं? हो पार्टीची तयारी चालू आहे जोरात :-) .. वरचे कमेंट्स वाच म्हणजे कोणाकोणाला संपर्क करायचा ते तुला कळेल.

  म्हंजी.. लिंक तर द्येनारच ना. आपन उगाच कुनाचं क्र्येदित मारत न्हाय :-)

  ReplyDelete
 28. आभार प्रोफेटा, अरे लोकं कंटाळतील पण वटवट संपणार नाही :-)

  ReplyDelete
 29. हेरंब आपले मनापासून अभिनंदन

  ReplyDelete
 30. आभार रविंद्रजी आणि आपलं ब्लॉगवर स्वागत !!

  ReplyDelete
 31. हे बघ मला मुंबई हाकेच्या अंतरावर आहे...तुम्हीच कधी येताय बोला...मला काय लंच घरी केला मस्कतला तरी डिनर नासिकला होऊ शकतो येव्हढा जवळ आहे भारत :)
  उगा आपली टाळाटाळी करायची नाही...समझा क्या!!!!
  मुद्दाम तीन बायका ठेवल्यात तू कमिटीवर म्हणजे जमलेच आता :))

  ReplyDelete
 32. छे ब्वॉ.. आपून पार्टीला टाळाटाळ कधीच करत नाही. तुम्ही म्हणाल तेव्हा करू.. अगदी नक्की. आणि हो, वाईस ते डोमेन नेम तरी येऊ द्या की :-)

  ReplyDelete
 33. अभिनंदन...
  चला.. गंगेत घोड न्हालं म्हणायचं एकदाच.. कसं ? नशीब जोरावर आहे मित्रा..
  बघ कुठे कुठे चान्स मारता येतो ते.. कुठली निवडणूक होतेय का बघ, हमखास जिंकशील,
  एखादी डेट मारायची असेल (तुझी बायको वाचत नही ना रे तुझा बॉल्ग??) , किवा इतर काहीहि येही वक़्त है पूरी करले आरजू...
  ... आणि पार्टी अरेंज करणाऱ्या नि माझं हि नाव लिस्ट मध्ये लिहून घ्यावं.. partiality करूनये.. :)

  ReplyDelete
 34. न्हालं रे न्हालं एकदाचं :-)

  अमेरिकन प्रेसिडण्टची निवडणूक आत्ताच झाली रे त्यामुळे.. नाहीतर त्या निवडणुकीलाच उभा राहिलो असतो. चला ते नाही तर डेटिंगचंच जरा मनावर घेतो :P .. मेलो .. आजची डिनरची सोय बाहेर बघावी लागणार :(

  आणि तळटीप काय रे पुणेरी स्टायलीत टाकली आहेस ? ;-)

  ReplyDelete
 35. atta amhala pan parti havi arthath bharatamadhye

  ReplyDelete
 36. देणार देणार :-)

  ReplyDelete
 37. sahi re sahi Heramb..... Heartiest congrats to you... " ashich pragati hot raho aani aamhala chan chan wachayala milo tuzyakadun"....

  ReplyDelete
 38. आभार श्वेता !! .. बरेच दिवसांनी आलीस. मला वाटलं कंटाळलीस की काय :-)

  हो. आपण तर काय पाट्या टाकतच राहणार जोवर जमेल तोवर ;-)

  ReplyDelete
 39. अभिनंदन बाबा हेरंबानंद...वटवट अशीच चालु राहु दया...बाकी आता डॉट कॉम म्हणजे मजाच मजा...

  ReplyDelete
 40. एक अमेरिकेत, एक मध्यपूर्वेत आणि एक भारतात असे पार्टीचे संयोजक का? होऊन जाऊ द्या मग ३ पार्ट्या! ;)

  ReplyDelete
 41. चालेल... तीन तर तीन. आप्पून तयार हय.. पहिली पार्टी तुम्ही भारतात करून टाका. पुढच्या आम्ही इथे करतो :-)

  ReplyDelete
 42. Congratulations dada........ :)
  I knw its too late bt mi ithe navhate so kalalech nahi mala.... N e ways nashib jorawar aahe mhanayache tar tuze... :)

  ReplyDelete
 43. आभार मैथिली.. हो नशीब फुलटू जोरावर आहे. :-)
  तुझी सुट्टीतली भटकंती चालू आहे वाटतं.

  ReplyDelete
 44. अरे वा.....अभिनंदन.....अगदी मनापासून :)
  तुझी "वटवट" आवडली हं.ती सतत सुरुच ठेव :

  ReplyDelete
 45. आभार जयश्रीताई. हो लोकं (आणि मी स्वतःही) कंटाळत नाही तोवर वटवट चालुच ठेवायचा विचार आहे :-)

  ReplyDelete