Monday, April 5, 2010

मी आणि माझे ब्लॉगु-ब्लगिनी !!


गेल्या आठवड्यात अपर्णाने टॅग करून ब्लॉगर्सच्या प्रकाराबद्दल लिहिशील का असं विचारलं. तेव्हा मी नेहमीप्रमाणे (म्हणजे नेहमीच्याच उतावीळपणे आणि आगाऊपणे) "हो बिनधास्त" असं काहीसं म्हटलं होतं (बहुतेक).. पण नंतर लिहायला बसल्यावर काही नीट सुचेना. म्हणून मग पुन्हा एकदा जाऊन ब्लॉगवाचकांचे प्रकार बघितले तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे या ब्लॉगवाचकांच्या प्रकारांमधला वाचक शब्द काढून तिथे ब्लॉगर शब्द घातला की झालं आपलं काम. एकदम सोप्पं. त्यामुळे मग लगेच मी ब्लॉगर्सचे प्रकार लिहून टाकले.

मित्र ब्लॉगर 
ब्लॉगर मित्र
धूमकेतू ब्लॉगर (क्वचित पोस्ट्स टाकणारे)
निनावी ब्लॉगर (टोपणनाव टाईप)
गडबडीत असणारे ब्लॉगर्स (छोट्या छोट्या पोस्ट्स टाकणारे)
मूक ब्लॉगर (ब्लॉगर प्रोफाईल असूनही पोस्टी न टाकणारे ब्लॉगर्स)

पण जरा वेळाने वाटलं की हेच प्रकार (अपेक्षित) असते तर ते अपर्णाने ते स्वतःच लिहिले असते. उगाच टॅग करायच्या भानगडीत कशाला पडली असती..(अनलेस तिला माझी फजिती करायची असेल ;-) ).. म्हणून मग जरा वेगवेगळे ब्लॉग्स, त्यातल्या पोस्ट्स आठवून बघितल्या आणि त्या अनुषंगाने तो ब्लॉगर कसा असेल याचा अंदाज बांधायचा प्रयत्न केला. तर मेंदूने (त्याचं त्या कमी सुरकुत्यावाल्या.. त्यामुळे समजून घ्या थोडं.) ही लिस्ट आउटपुट म्हणून पाठवली.

खादाड ब्लॉगर, 
पिदाड ब्लॉगर, 
सुगरण ब्लॉगर, 
जागरण ब्लॉगर, 
भटके ब्लॉगर, 
सटके ब्लॉगर,  
नवखे ब्लॉगर, 
ठाऊके ब्लॉगर, 
आचरट ब्लॉगर, 
धांदरट ब्लॉगर 

अहा अहा... पोस्ट झाली म्हणेम्हणे पर्यंत पुन्हा लक्षात आलं की  "नाय बा. ह्येबी बराबर न्हाय.. म्हणजे हेही प्रकार असतील कदाचित पण उगाच समीर (तोच तो आपला नावडता. आठवत नसेल तर तुमच्यासारखा लक्की कोणी नाही.) सारखं र ला ट जोडल्यासारखं वाटतंय.."


मग पुन्हा विचार करत करत लिहायला घेतल्यावर शेवटी (एकदाचं) लक्षात आलं की आपल्याला काहीही सुचत नाहीये आणि अक्षरशः "दिवसा तारे दिसतायत"..... वॉव.. बिंगो... लिहिता लिहिता एक नवीन प्रकार मिळाला तर.

 "दिवसा तारे बघणारे" ब्लॉगर्स हा झाला पहिला प्रकार. थोडक्यात माहिती म्हणजे "आपण कशावरही लिहू शकतो अशा भ्रमात राहून प्रत्यक गोष्टीला "हो SSS" असं म्हणून प्रत्यक्षात लिहिताना मात्र भांबावून जाणे अर्थात "दिवसा तारे बघणे" हा यांचा प्रमुख गुणधर्म (अवगुणाला गुणधर्म म्हटलं की त्येवढंच जरा बरं वाटतं..)"

पॉझ

विचार

पॉझ

मंगळ, गुरु, शुक्र ('शुक्र तारा' मधला तारा आणि नॉर्मलातला ग्रह दोन्ही..)

पॉझ

विचार

शनी, रवी, सोम, प्लुटो, सूर्य, नेपच्युन..

उपरोल्लेखित विचारशृंखलेतील (पॉझ आणि विचार सोडून बाकी सगळी) 'डोळ्यापुढे अ‍ॅक्च्युअली चमकलेल्या' तार्‍यांची नावं आहेत. थांबा थांबा कुणा खगोलशास्त्राच्या अभ्यासकाने (किंवा कोणीही नॉर्मल जीके असलेल्या माणसाने फॉर दॅट मॅटर) आक्षेप घेण्यापूर्वीच सांगतो की यातल्या रवी उर्फ सूर्य सोडून बाकी सगळे ग्रह आहेत हे आम्हास देखील ठाऊक आहे. परंतु ते शनी, रवी, सोम असं चुकून कीबोर्डातून निघून गेलं. आणि हो शुक्र हा देखील कितीही तेजस्वी असला तरीही ग्रहच आहे तारा नाही हेही आम्हास चांगलेच ठाऊक आहे परंतु "शुक्र तारा, मंद वारा" मुळे हे ही निघून गेलं कीबोर्डातून.. यातून जन्माला आलाय 'ज्याने कीबोर्ड सांभाळला त्याचा ब्लॉग सावरला' हा आजचा ब्लॉगर सुविचार. याचं विजेट मी लवकरच माझ्या ब्लॉगवर टाकतो. ते कृपया आपण आपल्या ब्लॉगवर चिकटवावं ही विनंती. आणि हा सापडला दुसरा प्रकार (बरा सापडला हातात..) .. तर दुसरा प्रकार म्हणजे असंबद्ध ब्लॉगर. (अर्थात यात ब्लॉगर म्हणजे ती नेमकी व्यक्ती असंबद्ध बडबडणारी असेल असा आमचा मुळीच दावा नाही ) परंतु त्या व्यक्तीच्या ब्लॉगवरील अनेक पोस्ट्स बिनडोकपणा, अर्थहीनपण आणि निरर्थकपणाने भरलेल्या असतात. एका विषयावर लिहिता लिहिता मधेच दुसर्‍याच विषयाकडे भरकटणे, उगाच मोठमोठाली वाक्यं लिहून वाचकांना कन्फ्युज करणे, आणि पोस्ट वाचायला सुरुवात केल्यावर शेवटपर्यंत ती कशावर आहे हे वाचकाला कळू न देणे हे याचे प्रमुख गुणधर्म (सेम वरच्यासारखंच) !!!


यातला अजून एक उपप्रकार म्हणजे 'सुविचारी ब्लॉगर'. म्हणजे पोस्टच्या मध्ये उगाच नवीन नवीन सुविचार (करणारा नव्हे तर) पाडणारा ब्लॉगर. (हा उपप्रकार असल्याने बोल्डच्या ऐवजी अंडरलाईन केली आहे.)
तिसरा प्रकार खरा दुसर्‍या प्रकारच्या आधीच जन्माला आलाय.. म्हणजे ब्लॉगविश्वात वगैरे नाही हो. या पोस्टमध्ये.. परंतु ते असंबद्धता आणि भरकटणं अशा दिव्य प्रकारामुळे त्याची ओळख करून द्यायची राहून गेली. हा प्रकार आहे वाचकांच्या आक्षेपांना किंवा प्रतिक्रियांना उत्तर देणारे ब्लॉगर. जसं वर मी शुक्र ग्रह, शुक्र तारा बाबतीतल्या (न विचारलेल्या) प्रश्नाला दिलेलं आहे. आणि यांचा गुणधर्म म्हणजे .. सांगितलं की आत्ताच.. पुन्हा काय..
वरचा आचरटपणा जरासा कमी करून ब्लॉगरांचे चांगले आणि खरेखुरे प्रकार द्यायचे असल्याने (अरे हो हे वाक्य लिहिताना अजून थोडे प्रकार आठवले. आचरटपणा करणारे (म्हणजे लिखाण या अर्थी) ब्लॉगर्स. यांचे उपप्रकार पण आहेत. कमी आचरटपणा (आधीचाच म्याटर) करणारे ब्लॉगर्स, जास्तच आचरटपणा (आ म्या) करणारे ब्लॉगर्स, आचरटपणा न (आ म्या) करणारे ब्लॉगर्स हे ते नवीन प्रकार. आता यांचे गुणधर्म सांगायचा आचरटपणा मी काही झालं तरी करणार नाही. नाहीतर 'अर्धवट वाचून खिडकी बंद करण्यात आलेली हाय्यस्ट पोस्ट' म्हणून या पोस्टचा (आणि अर्थात माझाही) गिनीज बुक ऑफ ब्लॉग रेकॉर्ड्स मध्ये समावेश करावा लागेल. असो.) त्या तार्‍यांना बिर्‍यांना हाकलून देऊन पुन्हा विचार करायला लागलो. (हे वाक्य कळलं नसेल तर तुमचा काहीही दोष नाही. कारण मधला कंस जरा जास्तच मोठा झाला. तर ते वाक्य कळण्यासाठी सोप्पी सूचना म्हणजे असल्याने नंतर डायरेक्ट त्या पासून पुढील वाक्य वाचावे.)

आणि ते प्रकार म्हणजे कोणी एखादा विषय सुचवल्यावर त्या विषयावर (आणि लगेच) पोस्ट लिहू शकणारे ब्लॉगर्स आणि न लिहू शकणारे ब्लॉगर्स. आणि यांचं उदाहरण म्हणजे .............. कोण असेल ओळखा बरं. ;-)

खरं तर पोस्ट संपवताना मी एखाद्या ब्लॉगरला टॅग करणं अपेक्षित होतं. पण मी तसं करणार नाहीये. कारण.

१. तो/ती कोएविसुत्यावि (आल) पोलिशब्लॉ (नाही हा कुठलंही नवीन प्रकार नाही. शेवटच्याच प्रकारचा 'कं' फॉर्म आहे.) असेल तर उगाच मला शिव्या पडतील.
२. तो/ती कोएविसुत्यावि (आल) पोलिशब्लॉ (आ म्या) असेल तर त्याची/तिची पोस्ट माझ्या या पोस्ट पेक्षा जाम चांगली होईल आणि उगाच माझं मार्केट डाऊन होईल ;-)
३. अ‍ॅम श्युअर यापुढे आयुष्यात कधी चुकुनही (अपर्णाच काय) कोणीही मला कुठल्याही पोस्टला टॅग बिग करणार नाही. पण असं नका करू प्लीज :( .. पुढच्या वेळी मी अजून जास्त प्रयत्न करून जरा तरी बरं खरडण्याचा प्रयत्न करेन. :-( (अर्थात हे कारण नाहीये. पण अगदीच दोन कारणं देण्यापेक्षा तीन असली की जरा बघायला बरं वाटतं म्हणून ३. असं लिहिलं)

महत्वाची तळटीप : या पोस्टमध्ये कुठल्याही ब्लॉगरचा किंवा वाचकाचा कणभरही उपमर्द करण्याचा उद्देश नाही. थोडा नाजूक विषय असल्याने सांभाळून (आणि आचरटपणा करत) लिहिला आहे. तरीही यातल्या कुठल्याही उल्लेखाने कोणालाही किंचितही वाईट वाटलं तर त्याबद्दल क्षमस्व आणि ते माझ्या निदर्शनास आणून दिल्यास मी लगेच तो उल्लेख वगळेन.

अजून एक महत्वाचं म्हणजे आपल्याला यापेक्षा खूप अधिक ब्लॉगर्स आणि त्यांचे प्रकार बघायचे असतील, त्यांच्याशी संवाद साधायचा असेल तर 'मुंबई ब्लॉगर्स मेळाव्या' ला हजेरी लावा.
अधिक माहितीसाठी इथे आणि इथे टिचक्या मारा.

58 comments:

 1. अर्थहिन व बिनडोक पण खुप हसलो रे...जाम मजा आलि वाचताना...

  खादाड ब्लॉगर,
  पिदाड ब्लॉगर,
  सुगरण ब्लॉगर,
  जागरण ब्लॉगर,
  भटके ब्लॉगर,
  सटके ब्लॉगर,
  नवखे ब्लॉगर,
  ठाऊके ब्लॉगर,
  आचरट ब्लॉगर,
  धांदरट ब्लॉगर
  :D :D :D :D :D :D :D :D

  ReplyDelete
 2. :D :D .. सागर, खूपच बिनडोकपणा झाला त्यामुळे पोस्ट टाकू की नको असा विचार करत होतो. पण मग आधी म्हटल्याप्रमाणे 'खाऊन माजावे पण टाकून माजू नये' हे सुवचन आठवलं. म्हणून मग 'पब्लिश' वर क्लिकून टाकलं.

  ReplyDelete
 3. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 4. हे..हे..हे...मस्तच...

  पण काही टर्म्स समजल्या नाहीत जसे:

  कोएविसुत्यावि (आल) पोलिनशब्लॉ
  कोएविसुत्यावि (आल) पोलिशब्लॉ

  ReplyDelete
 5. राहुल, तू काय म्हणतोयस ते आलं लक्षात. पण आधीच्या २-३ पोस्ट्स खुपच सिरीयस झाल्या होत्या. आणि तो सिरीयस मूड (माझाच) घालवावा म्हणून जरा बाष्कळपणा केला.

  कळावे लोभ असावा. !!

  ReplyDelete
 6. आनंद आभार.
  अरे 'कोएविसुत्यावि (आल) पोलिनशब्लॉ' म्हणजे शेवटच्याच प्रकारचा 'कं' फॉर्म (उर्फ शॉर्टफॉर्म) आहे. त्याचा लॉंग फॉर्म असा.

  'कोएविसुत्यावि (आल) पोलिशब्लॉ' म्हणजे कोणी एखादा विषय सुचवल्यावर त्या विषयावर (आणि लगेच) पोस्ट लिहू शकणारे ब्लॉगर्स आणि न लिहू शकणारे ब्लॉगर्स.
  'कोएविसुत्यावि (आल) पोलिनशब्लॉ' म्हणजे कोणी एखादा विषय सुचवल्यावर त्या विषयावर (आणि लगेच) पोस्ट लिहू न शकणारे ब्लॉगर्स
  ;-)

  ReplyDelete
 7. हे...हे..हे. . .मस्त रे ...भारी लिहलय रे!!!!

  ReplyDelete
 8. धन्यु मनमौजी. असाच जरा टीपी. :-)

  ReplyDelete
 9. हेरंब ..........................


  कठीण!!!!!!(चांगल्या अर्थाने..... :) )अक्षरश: भरकट आहे..... दर २/३ ऒळींनंतर पुन्हा मागे जाऊन स्वत:चीच लिंक लावून घेत होते :)
  मजा येते पण तुझे लिखाण वाचायला....

  तळटीप: कोणाच्या भावना दुखावणारे काहितरी लिहून ते अर्थपुर्ण आहे असा स्वत:चा भ्रम करून घेण्यापेक्षा कोणाच्याही भावना न दुखावणारे अर्थहीन लिखाण नेहेमीच चांगले नाही का!!! आणि आपण लिहीलेले अर्थपुर्ण की जरासे भरकटलेले हे समजण्यासाठी आणि ते मान्य करण्यासाठी हिम्मत चाहिये भिडू.....

  आता मुड फ्रेश झाला असेल (वाच ’आहेच’) तर पटकन अजुन एक भन्नाट पोस्ट टाक.....

  सुविचाराचे विजेट लवकर टाक...:)

  ReplyDelete
 10. हेरंब मला अगदी हेच अपेक्षित होतं बघ....(म्हणजेच आचरटपणाच रे...:) तुझ्या ब्लॉगचा ’तो’ मूड गेला नं?? आणि अरे कस्सं ओळखलं तू खरं टॅग नाही केलं तरी चालेल..मान गये भिडू...अभी तो माननाच पडेगा की Grrrrrrrrrrrrrrrr8 minds think alike....

  आता पुढची पोस्ट येऊदे मस्तपैकी...

  ReplyDelete
 11. तन्वी, अग चांगल्या काय वाईट अर्थानेही कठीण म्हणालीस तरी आपूनको मान्य हाय.. कम्प्लीट भरकट आहे :-) निव्वळ 'खाऊन माजावे पण टाकून माजू नये' यामुळे टाकली पोस्ट ;-) आणि दुसरं कारण म्हणजे अपर्णाने वाट लावली असती माझी :-)

  सुविचाराचं विजेट लवकरच येणार. वाट बघ !! ;-)

  ReplyDelete
 12. डोक्याचा पार भुगा झाला हि पोस्ट वाचताना ;)

  ReplyDelete
 13. अपर्णा, चला. म्हणजे तुला हवी तशी पोस्ट झाली तर :-) हुश्श...

  'Grrrrrrrrrrrrrrrr8 minds think alike' हे तर आहेच .. ऑलवेज !!

  आणि तू आणि तन्वी दोघीही म्हणताय की (निदान) पुढची (तरी) मस्त पोस्ट लवकर येउदे म्हणजे 'बिटवीन द लाईन्स रीड' करून ही पोस्ट वाचताना तुमचे काय हाल झाले असतील मी हे ओळखलं आहे :-) ..
  तेव्हा पुढच्या वेळी जास्तीत जास्त प्रयत्न करून कमीत कमी अर्थहीन लिहिण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करण्याचा अजून जास्त प्रयत्न करीन ;-)

  ReplyDelete
 14. विक्रमा.. सॉरी रे ;-) .. बेटर (लक) लेख नेक्स्ट टाईम.. ;-)

  ReplyDelete
 15. ते ब्लॉगर आणि वर्डप्रेसचे लोगो इथे काय करताहेत म्हनून मी बराच विचार केला ... पोस्ट परत एकदा वाचली - त्यामुळे तुझी भन्नाट पोस्ट वाचून अजून एक ‘कन्फूज्ड ब्लॉगर’ असा प्रकार झालाय बघ ... :D

  ReplyDelete
 16. ब्लॉगर प्रकार सहीच आहेत. 'कोएविसुत्यावि (आल) पोलिशब्लॉ' आणि 'कोएविसुत्यावि (आल) पोलिनशब्लॉ' हे एकदम भन्नट, लॉंग फॉर्म शोधण्यात किती वेळ घालवला मी. खरच पोस्ट वाचताना मधेच एकदम लॉस्ट झाले होते :)

  ReplyDelete
 17. हा हा गौरी. त्या लोगोंऐवजी आपल्या ब्लॉगर्स मंडळींचे लोगोज लावायला पाहिजे होते. (कदाचित) थोडीशी कमी कन्फ्युजिंग पोस्ट झाली असती.

  मी तर १००% कन्फ्युज्ड ब्लॉगर आहे. चल त्यात तुझीही भर पाडली काही वेळासाठी तरी का होईना :-)

  ReplyDelete
 18. सोनाली, लॉंगफॉर्म पेक्षा आपले 'कं' फॉर्मच बरे नाही का? अग मी लिहितानाही किती वेळा लॉस्ट झालो होतो त्यामुळे तू (आणि सगळेचजण) वाचताना झालीस तर काहीच नवल नाही :P

  ReplyDelete
 19. 'खाऊन माजावे पण टाकून माजू नये' :)
  +1 कन्फ्युज्ड ब्लॉगर

  ReplyDelete
 20. म्हणजे पब्लिशून माजावे पण ड्राफ़्टून माजू नये का?

  ReplyDelete
 21. मस्त ,,,,मस्त,,,मस्त,, सुंदर ,,सुंदर,,,,सुंदर,,,,चाबूक,,,चाबूक ,,,चाबूक,,, महेश , काका

  ReplyDelete
 22. पब्लिशून माजावे पण ड्राफ़्टून माजू नये का?
  हे...हे...हे.. सहीये मिनल

  ReplyDelete
 23. Are heramb mast lihila ahes. me pan donda vachala. kiti prakar fakat VACHNARE bloger

  ReplyDelete
 24. Are Pl 1,2,3 ase nunmber tak aani ho pl tya numberat number nako mhanaje 1(a),1(b) ase nako. nakki kiti prakar aahet?
  pan sahi lihil aahes ekadam vegal, aani 1, 2 ase nos takale nahis mhanunach vegali post zali aahe.

  ReplyDelete
 25. अरे..किती लिहितोस रे...
  मला वाचायला वेळ नाही आणि तू हे सारे लिहून छापत ही राहतोस...
  असो. माझी पुढची पोस्ट याच विषयावर आहे...कळेलच

  ReplyDelete
 26. हेरंब, काल अगदी तारीख उलटेपर्यंत आपण बोललो. तेव्हांच तुझ्या या पोस्टवर एक भर्रर्रर्रकन नजर टाकली..... प्रत्येक दोन ओळीनंतर पुन्हा वर जावे असे दोन तीनदा झाल्यावर... लक्षात आले की आता आपली बॅटरी पुरी डाऊन झाली आहे. आदीचे इतके गोड गोड फोटो पाहून मस्त वाटत होते तेव्हां खूशीत झोपावे आणि उद्या सकाळी पुन्हा पोस्टवर यावे.... खरेच कठीण लिहीले आहेस (:P)वाचता वाचता सगळेच भरकटलेत.... ये हुई ना बात.... तळटीपेतली शेवटची ओळ म्हणजे... याच देही याच डोळा जाऊन समक्ष बघाच काय... हा हा...

  ReplyDelete
 27. >>"म्हणजे पब्लिशून माजावे पण ड्राफ़्टून माजू नये का?"

  हा हा मीनल.. अगदी अगदी. या नियमाचं काटेकोरपाने पालन केल्याने माझ्या गाठी (ब्लॉगी) अशा बर्‍याच अर्थहीन आणि बिनडोक पोस्ट्स जमा झाल्या आहेत.

  ReplyDelete
 28. :).. खूप आभार काका.

  ReplyDelete
 29. :-) आनंद, जबरीच आहे मीनलचा सुविचार. पोस्ट अपडेट करू का विचार करतोय ;-)

  ReplyDelete
 30. आई, सगळं कन्फ्युजनच आहे सगळ्यांचं.. (माझ्यासकट ;-) )

  ReplyDelete
 31. हेमाली, अग किती प्रकार आहेत, किती उपप्रकार आहेत हे माझं मला कळलं कि नवीन पोस्ट टाकेन. तोवर असंच भागवून घे ;-)
  हो. हि पोस्ट बिनानंबरांची झाली खरी :)

  ReplyDelete
 32. सागर, अरे उलट या आठवड्यात कमीच झालं लिखाण. एक पूर्ण आठवडा उलटून गेला दोन पोस्ट्स मध्ये. नाहीतर जनरली आठवड्याला २-३ पोस्ट्स तरी होतात. घाबरू नको अशा पोस्ट्स अजून नाही लिहिणार ;-) ..
  तुझी पुढची पोस्ट येउदे लवकर.

  ReplyDelete
 33. हा हा श्रीताई. थोडी कन्फ्युजिंग पोस्ट होते आहे हे मला लिहितानाच लक्षात आलं होतं पण आता कमेंट्स वाचल्यावर तुम्हा सगळ्यांना माझ्यामुले कुठल्या दिव्यातून जावं लागलं याची कल्पना आली. :-) .. आता पुढचे काही महिने तरी अर्थहीन आणि बिनडोक या लेबलात एकही नवीन पोस्ट येणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल.
  आणि एका अर्थाने बरंय की मला मुंबई ब्लॉगर्स मेळाव्याला जाता येत नाहीये. नाहीतर तिकडे सगळ्यांनी ठराव पास करून माझ्या लिखाणावर बंदी घातली असती ;-)

  ReplyDelete
 34. :) आभार विद्याधर.. !

  ReplyDelete
 35. बेश्ट रे ब्लॉगू, आवडलं आपल्याला !!

  ReplyDelete
 36. आभार नॅकोबा ब्लॉगु !! :-)

  ReplyDelete
 37. अस वाटल की हेरम्ब नावाच्या टोरनाडो मधे सापडले मी...
  कंसात कंस, कंसात कंस, अरे किती पण तरी मज्जा आली वाचायला, डोक्याची भिंगरी zaali..
  :प :डी

  ReplyDelete
 38. हा हा श्वेता... 'हेरंब नावाचा टोरनाडो' ... हा हा हा .. आवडली आपल्याला उपमा. :-)
  कंसात कंस, आचरटपणा, बिनडोकपणा हे माझ्या ब्लॉगचे USP झाले नाहीत लवकरच म्हणजे मिळवलं.

  ReplyDelete
 39. आपनबी कन्फ़्युज़ झलो बगा...चांगल २-३ वेळा वाचाव लगल यार...लेखाचे विनोदी अंग सोडल्यास ब्लॉगरचे अजुन काही प्रकार अपेक्षीत होते...बाकी लेख नेहमीसारखाचा एकदम दमदार झाला आहे...

  ReplyDelete
 40. :-) देव, सगळ्या प्रतिक्रिया बघून मी तर हे मान्यच केलं आहे की लेख उगाचच (आणि कायच्याकाय) कन्फ्युजिंग झाला आहे.
  अरे आणि हे सगळे काल्पनिक प्रकार आहेत. उगाच टीपी म्हणून. अजूनही चिकार प्रकार असतील ब्लॉगर्सचे.. नाही.. आहेतच !!

  ReplyDelete
 41. आयला तू असा टीपी करतोयस..मी पोस्ट कालच वाचली..पण इतका कन्फ्यूज़ झालो. मला वाटला मला काही समजले नाही..पण इथे येऊन बघतोय तर सगळेच...हा हा हा
  बाकी बलॉगर्स चे प्रकार आवडले :) आपण नवखे ब्लॉगर तुम्हा सगळ्यांसमोर

  ReplyDelete
 42. हा हा सुहास. अरे ठरलं.. पुढच्या वेळेस पासून अगदी साधी सोप्पी सिम्पल पोस्ट लिहीन म्हणतो. :P .. बघू :-)

  ReplyDelete
 43. maze blogu - blogini solid nav aahe khup awadal khup hasale nav vachun. kal sangayach rahunach gel number chyach gondhalat adakale hote.

  ReplyDelete
 44. हेरंब, आदिचे फोटो आम्हाला नाही दाखवलेस, लिंक पाठव skelkar2007@gmail.com वर.

  ReplyDelete
 45. च्यायला.. अर्पणीची पोश्ट वाचतांना सगळं काही शास्त्र्शुद्ध भाषेत वाचायला मिळालं होतं.. त्यामंधी तरी धुमकेतू, वगैरे वगैरे कॅटॅगरिज तीने मांडल्या व्हत्या! पण तुम्ही इकडे तर आम्हा लोकांची (इज्जतच! ;P ) काढली की...! आता यात खादाड, पिदाड, भटके, सटके, आचरट इत्यादी सर्व प्रकारांत आम्ही मोडतो... जर हे कोणाला महित झालं की (म्हणजे आपल्या वाचकांना!) तर ते आपण लोकांना रातं-दिवस चिडवतील ना...!!!

  बाकी काही असो.. लय कॉमेडी पोश्ट झालिय...

  - विशल्या!

  ReplyDelete
 46. हेमाली, ब्लॉगु-ब्लगिनी मला पण जाम आवडलं :-)

  ReplyDelete
 47. धन्स विशल्या... अरे यात पिदाड ब्लॉगरची कॅटेगरी सोडली उरलेले सगळे प्रकार मलाबी लागु व्हतात :-) आणि कोणी चिडवणार नाही कारण प्रत्येकजण यापैकी कुठल्यातरी एका प्रकारात मोडतो हे प्रत्येकालाच स्वतःला माहित्ये. हा हा हा..

  ReplyDelete
 48. कधी कधी यमक न जुळणार गाणं ऐकायला पण मज्जा येते. हिंदमाता कोनाड्यात उभी राहिल्यासारखं वाटलं.

  BTW मला माझीच प्रतिक्रिया झेपत नाही आहे.

  ReplyDelete
 49. माझा नंबर पहिला ;-) हा हा हा..

  पोस्टला अगदी सुट होतेय प्रतिक्रिया. काळजी नसावी :)

  ReplyDelete
 50. ह्या सगळ्या प्रकारच्या ब्लॉगर्स मधे मी मोडतो. खादाड, पिदाड, वगैरे..
  आणि लिहितांना कन्फ्युज झालं नाही कां? :)

  ReplyDelete
 51. हा हा. मी विशल्याला म्हंटलंच की यातल्या प्रत्येक प्रकारात कोणी ना कोणी आहे म्हणून. आणि खादाड, पिदाड मध्ये तर बरेच जन असणार :-)

  हो. लिहितानाही चांगलाच कन्फ्युज झालो होतो. पण मजा आली.

  ReplyDelete
 52. ते तुम्ही स्वतः ठरवायचं :-)

  ReplyDelete
 53. bhin jhale mi wachata wachata.
  pan chhan lihilet.....

  ReplyDelete
 54. अस्मिता, ब्लॉगवर स्वागत. सगळ्यांची (माझ्यासकट) हीच परिस्थिती आहे :-) .. काळजी नसावी.

  ReplyDelete
 55. वरच्या प्रतिक्रिया वाचून असं वाटतंय की, एक तर मी जगावेगळा आहे किंवा लोक भिडस्त आहेत. (एवढा चांगला लेखक आहे हा, नेहमी खुमासदार असं काहीतरी लिहितो. आत्तापर्यंत सगळंच चांगलं लिहिलेलं आहे. एकच पोस्ट कशी खराब असेल? कदाचित आपल्यालाच काही कळलं नसावं... वगैरे वगैरे) पण टू बी फ्रँक, मला नाही आवडली ही पोस्ट. काहीच्या काही आहे. म्हणजे अगदी लालूप्रसाद यादव किंवा विलासराव देशमुख (राव म्हणण्याची योग्यता (पक्षी: लायकी) नाही वास्तविक, पण तरीही जनाची नाही तरी मनाची थोडी बाळगावी म्हणून...) बोलतात तेवढी असंबद्ध...

  ReplyDelete
 56. हे हे.. अरे मान्य आहे मलाही.. जरा असंबद्ध झालीच होती ही पोस्ट. आणि तसंही वर अनेकांनी लिहिलंय की की काही कळलं नाही वगैरे.
  अरे ही पोस्ट लिहिण्याआधी 'मांजा' बघितला होता आणि त्याचा एवढा चरा उमटला होता मनावर की काही विचारू नकोस. एक आठवडा होऊन गेला तरी अस्वस्थ वाटत होतं. म्हणून त्यातून बाहेर येण्यासाठी काहीतरी (किंवा काहीही) उगाच टीपी लिहायच्या उद्देशाने लिहिलेली पोस्ट आहे ही.

  ReplyDelete