Tuesday, April 27, 2010

उत्तर : भाग-१

मुंबई विमानतळावरून सकाळी सातचं विमान, साडेआठला बंगलोरला उतरणार, कॅब पकडून 'आय टी  व्हिला' ला पोचायला जास्तीत जास्त अर्धा तास--वाईट ट्रॅफिक धरून एक तास--तरी दहाच्या मीटिंगसाठी मी साडेनऊपर्यंत मीटिंगच्या जागी पोचणार होतो. सगळा नेटका, चोख हिशोब होता. अजून पाचच मिनिटात विमान बंगलोर विमानतळावर उतरत असल्याची घोषणा झाली. मी हातातलं पुस्तक बंद करून ते ब्लेझरच्या खिशात ठेवून दिलं. आत ठेवताना त्यातल्या चिठ्ठीकडे लक्ष जाऊन मी थोडासा हसलो. माझं घड्याळ सव्वाआठची वेळ दाखवत होतं. अचानक काय झालं काय माहित. प्रचंड मोठ्ठा आवाज झाला. अख्खं विमान हलत होतं. सगळं सामान वरच्या कप्प्यातून धडाधड खाली पडायला लागलं, काही काही सीट्स उखडल्या गेल्या. सगळीकडून आरडाओरडा, किंकाळ्या ऐकू येत होत्या. मीही प्रचंड घाबरलो. काय करावं कळेना. तेवढ्यात माझ्या डोक्यावर प्रचंड जोरात येऊन काहीतरी आदळलं..

**

"हे औषध घ्या" सिस्टर माझ्या दंडाला हलकेच हलवून मला उठवत होती. मी अर्धवट डोळे उघडले आणि पुन्हा मिटले. जणु डोळे उघडण्याचे श्रमही मला जास्त झाले होते.

आणि अचानक आठवड्यापुर्वीचं ते विमान, धक्के, आरडाओरडा, प्रचंड आवाज माझ्या डोळ्यासमोरून तरळून गेलं आणि नंतर डॉक्टरांनी सांगितलेलं सारं आठवलं. बंगलोर विमानतळावर विमान उतरताना काहीतरी तांत्रिक बिघाड झाला आणि विमानाचं सेफ लँडिंग झालं नाही. अनेकजण जखमी झाले आणि तेही याच हॉस्पिटलमध्ये होते. पण जवळपास सगळ्यांनाच १-२ दिवसातच डीसचार्ज मिळाला होता. मोडका पाय आणि गळ्यात हात घालून घेऊन बसलेला मी एकटाच होतो.

"आणि हे पुस्तक. डॉक्टरांनी पुस्तक वाचायला परवानगी दिली आहे आता. म्हणून तेही आणलं. पण रोज जास्तीतजास्त एक तासच वाचायचं त्यापेक्षा जास्त नाही."

"सिस्टर, आठवणीने पुस्तक आणल्याबद्दल आभार. दुपारच्या वेळी खुपच कंटाळा येतो." माझ्या चेहर्‍यावरचं हलकं स्मित बघून सिस्टरही हसल्या.

मला जास्त वाचन न करण्याविषयी बजावून पुन्हा त्या निघून गेल्या.

मी पुस्तक उघडलं आणि तेवढ्यात त्यातून खुण म्हणून ठेवलेली 'ती' चिठ्ठी बाहेर पडली.

**

"दादा, नमस्कार. हा माझा मित्र देवेश. देवेश रमानाथ राजे."
"नमस्कार संजू... नमस्कार देवेश..."
"दादा, याला जरा प्रॉब्लेम आहे. पण तुम्ही तो नक्की सोडवू शकाल म्हणून तुमच्याकडे घेऊन आलो."
"अच्छा. बरं बरं. संजू, मी बोलतो देवेशशी. तू बाहेर बसलास तरी चालेल."
"बरं" म्हणून संजू उठला आणि बाहेर गेला.
"बोल देवेश. काय झालं? "
"दादा, खूप आशेने आलोय तुमच्याकडे. प्लीज मला मदत करा."
"पण काय झालंय आणि कशासाठी मदत हवीये हे कळल्याशिवाय मदत कशी करणार? काय ते सगळं सविस्तर सांग."
"ठीके दादा. सगळं तपशीलवार सांगतो. मी शिक्षणाने सीए आहे. चांगली नोकरी चालू होती. चांगला पगार होता. पण त्या नोकरीत आणि एकूणच त्या अकाउंटिंग प्रकारात मला विशेष रस वाटत नव्हता. मला बिझनेस करायचा होता. संगणकाशी संबंधित. कारण त्या व्यवसायात खूप पैसा आहे आणि मला स्वतःला संगणकाची खूप आवडही आहे. संगणकाच्या सुट्ट्या भागांचा व्यवसाय सुरु करायचा किडा एका मित्राने डोक्यात घुसवला. तो फार उत्तम, लाभदायक, कमी भांडवलाचा, कमी वेळ द्यावा लागणारा आणि या सगळ्याच्या तुलनेत इतर व्यवसायांच्या मानाने जास्त नफा मिळवून देणारा व्यवसाय आहे असेही त्याने त्याच्या अनुभवावरून सांगितलं. त्याने माझ्या डोक्यात कल्पना घुसवली काय आणि ते मला शब्द न् शब्द पटलं काय आणि बघता बघता मी हातातली नोकरी सोडून व्यवसाय सुरु केला काय. सगळंच स्वप्नवत. सुरुवात तर छान झाली. पण बघता बघता तेच स्वप्न एक दु:स्वप्न ठरायला लागलं होतं. मी कामात आळशीपणा किंवा टाळाटाळ करत होतो अशातला भाग मुळीच नव्हता. उलट मी नोकरीपेक्षा जास्त उत्साहाने काम करत होतो. जास्त वेळ देत होतो. जास्त मेहनत करत होतो. पण कुठेतरी काहीतरी मार खात होतं. आणि त्यात पुन्हा आलेली ही जागतिक मंदी, मोठमोठ्या कंपन्यांनी केलेली खर्चातली कपात या सगळ्याचा एकूण परिणाम आपोआपच संगणक क्षेत्रावर झाला. परिणामी माझ्यासारख्या नुकत्याच व्यवसाय सुरु केलेल्या छोट्या व्यावसायिकाची पार वाट लागली. बघता बघता तोटा वाढतच गेला. पण तरीही मी हार सोडली नाही. एवढा तोटा झाल्यावरही व्यवसाय चालू ठेवण्याचा निगरगट्टपणा फार कमी व्यावसायिकांकडे असेल. आणि त्या कमी व्यावसायिकांच्या ग्रुपचा मी आजीवन सभासद ठरेन कदाचित."

दादा त्यांच्या समोर ठेवलेल्या पानाच्या पेटीवर हात ठेवून बोटातल्या अंगठीशी चाळा करत एकटक मी बोलतोय ते ऐकत होते.

"अशात पेपरातली एक जाहिरात माझ्या नजरेस पडली. अमेरिकेत मुख्य ऑफिस असलेल्या एका मोठ्या कॉम्प्युटर बनवणार्‍या कंपनीची जाहिरात होती. ते जगातला सगळ्यात, म्हणजे अगदी अगदी स्वस्त कॉम्प्युटर बनवण्याचा प्रोजेक्ट हातात घेत होते. आणि त्या अनुषंगाने जर कोणाकडे कल्पना असतील, त्या कल्पनांना मूर्त रूप देऊन जर कोणी अगदी स्वस्त कॉम्प्युटर बनवू शकत असेल तर त्या संपूर्ण प्रोजेक्टचा खर्च ती कंपनी करणार होती. आणि त्या व्यक्तीला त्या प्रोजेक्टच्या नफ्यातला ५०% वाटाही देणार होती. तीन महिन्यांत प्रोजेक्ट रिपोर्ट सादर करायचा होता. गेले कित्येक महिने संगणकाच्या सुट्ट्या भागांशी मी अक्षरशः खेळलो असल्याने अशा अनेक स्वस्त भागांपासून मी असा एखादा कॉम्प्युटर बनवण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकेन असं मला वाटत होतं. आणि बघता बघता मी त्या दृष्टीने तयारीला लागलो. गेले तीन महिने मी बाकीचं कामधाम सांभाळून, प्रसंगी कामाकडे थोडं दुर्लक्षही करून हात धुवून या प्रोजेक्टच्या मागे लागलो होतो."

दादा डोळे मिटून शांतपणे ऐकत होते. मध्येमध्ये बोटातल्या अंगठीशी चाळा चालूच होता.

"आणि शेवटी एकदाचं त्या प्रोजेक्टचं डिझाईन तयार झालं आणि मी ते अगदी थोडक्यात त्यांच्या वेबसाईटवर टाकलं. आश्चर्य म्हणजे त्यांनाही ते आवडलं. तिथे सबमिट झालेल्या प्रोजेक्ट्स मध्ये निवडक १० प्रोजेक्ट्स त्यांनी निवडली आहेत. त्यातलं एक माझं प्रोजेक्ट आहे. त्यांनी मला उद्या सविस्तर चर्चेसाठी माझा फायनल प्रोजेक्ट रिपोर्ट घेऊन बंगलोरला बोलावलं आहे. तिथे त्या कंपनीच्या त्या प्रोजेक्टवरच्या एका मोठ्या अधिकार्‍याबरोबर उद्या माझी मीटिंग आहे. पण  ....."

-- क्रमशः

- भाग २ इथे  वाचा.

34 comments:

 1. हेरंब, सुरवात चांगली झालीये... वाचतेयं... येऊ देत पटापट.

  ReplyDelete
 2. आभार श्रीताई. पुढचा भाग उद्या टाकतोय.

  ReplyDelete
 3. अगदी लॉलीपॉपचं नुसतं दर्शन देऊन तो हातातून काढून घेतल्यावर आता उद्या हं ....असंच काहीसं वाटलं :-)

  ReplyDelete
 4. येणार.. येणार.. येणार... !!

  ReplyDelete
 5. हा हा अपर्णा.. असं नाही.. उद्या येतंय पुढचं लॉलीपॉप..

  ReplyDelete
 6. झालं...परत क्रमशः.....नका रे असा अन्याय करू....दिवसभर डोक्यात तो भुंगा भुण भुणत राहतो....बाकी सुरूवात मस्त झाली आहे....पुढे काय होऊ शकत याचा अंदाज लावतोय...बघू कितपत खरा ठरतोय.

  ReplyDelete
 7. आभार योगेश. सॉरी पण अजून २-३ वेळा तरी हे क्रमशः बघावं लागणार..
  अंदाज लावायचा प्रयत्न कर पण हा प्रकार 'डोसा' एवढा चांगला जमला नसला तरी मस्त ट्विस्ट्स आहेत नंतर.. :)

  ReplyDelete
 8. हो रे डोसा तर अप्रतिमच होता....बघू आता पुढे काय आहे ते....

  ReplyDelete
 9. :) आभार.. उद्या बघू काय होतंय ते ..

  ReplyDelete
 10. क्रमश:चे वारे काय सुरु झालेत यार...असो मी वाट पाह्तोय पुढील भागाची...

  ReplyDelete
 11. काय करणार आनंद.. क्रमशः ला पर्याय नाही :( :)

  ReplyDelete
 12. arre!!! mala in fact awadate asa "kramasha:" :)
  hehe.. ugich nahi daily soap peksha weekly serials awadtat jast ;)
  aso! chhan aahe.. :)

  ReplyDelete
 13. वा वा.. चला क्रमशःचा निषेध न करणारं कोणीतरी भेटलं बाबा :-)

  ReplyDelete
 14. नेक्स्ट येऊ देत..मस्त झालीय सुरूवात

  ReplyDelete
 15. अरे तुम्ही कथा लिहिणारे लोक असे अर्धवत का लिहिता ? अनिकेत/कांचन/कु.का सगळे असेच करतात.. दुसरा भाग लवकर येऊ दे .. काहितरी चकाट्या वाचायला मिळणार दिसतय.

  ReplyDelete
 16. पहिला परिच्छेद वाचेपर्यंत ही कथा आहे हे मला माहीत नव्हतं. मला वाटलं तुझ्या डोक्यातच काही पडलं की काय? पण पुढे वाचल्यावर "तो तू नव्हेच"ची खात्री पटली. बरं वाटलं. नाहीतर पुढचा भाग यायला विलंब झाला असता. ;-)

  ReplyDelete
 17. पहिल्याप्रथम, मस्त चाललंय...पण... क्रमशः चा त्रिवार निषेध!

  ReplyDelete
 18. आम्हाला हळूहळू आनंद देणार(क्रमश) वाटत पुटे काय ?

  ReplyDelete
 19. चायला... हे क्रमश:चे वारे बरे नव्हेत. येऊ दे पटपट दादा... :)

  ReplyDelete
 20. सुरूवात उत्कंठावर्धक आहे. पुढचे भाग लवकर पोस्ट कर. (आयला, हे क्रमश: प्रकरण त्रास देतं, हे मला आत्ता कळलं. तुझी कथा वाचताना ;-))

  ReplyDelete
 21. आभार सुहास, लवकरच टाकतोय पुढचा भाग.

  ReplyDelete
 22. सोमेश, यार कथा लिहिताना जाम वाट लागते (माझी तरी) :( . त्यामुळे जाम सांभाळून लिहावं लागतं. त्यामुळे थोडा अधिक वेळ.. (आणि एवढं करून शेवट चांगला झाला नाही तर येक्स्टरा शिव्या.. ज्या मला या कथेत पडणार आहेत :( )
  उद्या टाकतो दुसरा भाग.

  ReplyDelete
 23. हा हा हा सिद्धार्थ . बरोबर.. 'तो मी नव्हेच'.. मला प्रथमपुरुषी एकवचनात कथा लिहायला आवडतात. जास्त वास्तव वाटतात .. उगाचच.

  ReplyDelete
 24. आभार प्रोफेटा.. अजून दोन (किंवा तीन) क्रमशः तरी येतील बहुतेक. सगळ्यांचे एकदाच करून टाक :)

  ReplyDelete
 25. आभार काका, अजून थोडे क्रमशः आहेत.

  ReplyDelete
 26. सॉरी रोहणा.. येणार येणार..

  ReplyDelete
 27. आभार कांचन. आज/उद्या येतोय पुढचा भाग. (आयला मला तर वाटलं तुला या त्रासाची/निषेधांची कल्पना असेल. तू तर दीर्घकथावाली :-) )

  ReplyDelete
 28. Nishedh Kramash... :)
  {Dosapeksh hi survat mla jast changli vatali }

  ReplyDelete
 29. निषेध नका रे करू.. येतोय दुसरा भाग लगेचच..
  { .. } : ओह थांकू थांकू..

  ReplyDelete