Friday, April 30, 2010

उत्तर : भाग-४ (अंतिम)


--------
अ  पेक्षा 


--------

चिठ्ठी पूर्ण कोरी होती फक्त पानाच्या मध्यभागी 'अ  पेक्षा' असं लिहिलं होतं. मला काहीच कळलं नाही. मी तडक दादांकडे जाण्याचा निर्णय घेतला. त्यांना ही आनंदाची बातमी द्यायची होती. तेव्हाच त्या मजकुराचा  अर्थही विचारू असं ठरवलं. 

**

"दादादादा"

"अरे कोण देवेशये ये.. बस. कसा आहेस ?"

"दादा माझं प्रोजेक्ट त्या कंपनीला खूप आवडलं. त्यांनी त्यांच्या योजनेसाठी माझ्या प्रोजेक्टची निवड केली आहे. मला पुढची बोलणी करण्यासाठी पुढच्या आठवड्यात बंगलोरला जायचं आहे. खूप खुश आहे मी दादा खूप खुश आहे."

"अरे वा. उत्तम. अभिनंदन."

"दादाअजून एक. मी तुम्ही दिलेली चिठ्ठी उघडली. पण मला काही नीट कळलं नाही. समजावून सांगाल प्लीज?"

"पुन्हा वाच काय लिहिलंय ते" दादा मंदस्मित करत म्हणाले.

"अपेक्षा" मी पुन्हा गोंधळून जाऊन म्हंटलं.

"आठवतंय मी तुला काय सांगितलं होतंतू जेव्हा यशस्वी आहेस असं तुला पटेल तेव्हाच तू चिठ्ठी उघडायचीस. तू आत्ता चिठ्ठी उघडली आहेस म्हणजे तू यशस्वी आहेसआनंदी आहेस हे मान्य आहे तुला?"

"हो आहे."

"पण तुला माहित आहे का की हा आनंदहे यश चिरकाल टिकत नाही. आपण ते टिकूच देत नाही. कारण आपला स्वभाव. आता तुझं हे प्रोजेक्ट यशस्वी झालं आहे. तू आनंदात आहेस. पण कालांतराने आपल्या अपेक्षा वाढू लागतातआपल्याला वाटू लागतं की त्या अमक्यातमक्याकडे माझ्यापेक्षा चांगली गाडीचांगलं घरचांगली नोकरी/धंदा आहे. त्याच्या मानाने मी तर काहीच नाही. आणि असा विचार करून आपण आपलाच आनंदसमाधान आपल्या हातांनीच गमावून बसतो. आणि जे दुसर्‍याकडे आहे पण आपल्याकडे नाही असं आपल्याला वाटतं ते मिळवण्याच्या मागे धावू लागतो. ही धावाधाव अविरत असते. कधीच न संपणारी. कारण आपल्या अपेक्षा कधीच संपत नाहीत. इतक्या की होता होता त्या अपेक्षा बदलून लोभाचं, हावेचं रूप घेतात. आपल्याला लोभी बनवून जातात. ही हावहा लोभ कधीही न संपणारा असतो. पण आपल्याला ते कळतच नाही....
एक सांगू? ? तू माझ्याकडे आला होतास तेव्हाही तू सुखीयशस्वी होतासच. फक्त तुला त्याची जाणीव नव्हती किंवा तू ते विसरला होतास इतकंच. तू जेव्हा सीए झालास, जेव्हा तुला पहिली नोकरी मिळालीजेव्हा तू नोकरी सोडून व्यवसायात उतरायचं ठरवलंस, जेव्हा व्यवसाय प्रत्यक्ष सुरु केलास त्या त्या प्रत्येक क्षणी, हरेकक्षणी तू यशस्वी आणि आनंदी होतास. आणि तेही पूर्वीपेक्षा जास्तच. त्या प्रत्येक क्षणी मी तुला जर ती चिठ्ठी दिली असतीस तर तू "होय मी आत्ता सगळ्यात यशस्वी आहे" असं म्हणून ती उघडली असतीस. मला खात्री आहे. बघ नीट विचार करून. त्या प्रत्येक क्षणी तू यशस्वी होतासच... नव्हतास तो फक्त समाधानी. 
अर्थात सुखीसमाधानी रहायचं म्हणून "आहे त्यात सुख मानून नवीन ध्येये शोधू नयेतकुपमंडूक वृत्तीने जगत रहावं, 'ठेविले अनंते' किंवा 'असेल माझा हरी' अशा अविर्भावात जगावं" असं मी अजिबात म्हणत नाहीयेकदापिही म्हणणार नाही. नवीन यशासाठी नवीन प्रयत्न हे केलेच पाहिजेत. पण डोळे उघडे ठेवून. सुखयश किंबहुना प्रत्येक गोष्ट सापेक्ष असते. फार कशाला...  अरे अगदी दु:खही सापेक्ष असतं. तुमच्यापेक्षा अधिक दु:खी असणारा माणूस दिसला की तुम्ही आपोआपच त्याच्यापेक्षा सुखी ठरता. नाही का? त्या बिरबलाच्या रेघेसारखं.. !! म्हणून तुलना करायची असेल तर आपल्यापेक्षा दु:खी लोकांशी कर. त्यांना सुखी कसं करता येईल ते बघ. अर्थात यशाची तुलना आपल्यापेक्षा जास्त यशस्वी लोकांशी करणं उत्तमच पण ते प्रेरणा घेण्यासाठी. त्यातून वैफल्य येता कामा नये. न्यूनगंड निर्माण होता कामा नये. परंतु दुर्दैवाने लोक आपल्यापेक्षा अधिकाधिक यशस्वी माणसं बघून त्यांच्या यशाने गांगरून जाऊन आपल्या अपेक्षाइच्छाआकांक्षा वाढवून ठेवतात आणि मग छोट्या छोट्या अपयशाने उध्वस्त होऊन जातात आणि नशिबाला किंवा असाच उगाच कोणाला तरी बोल लावत रहातात. तू मला जेव्हा पहिल्या वेळी भेटायला आला होतास तेव्हा आठवतंय तू किती निराश होतास, किती खचलेला होतास ? कारण अजून अजून यशाच्या अपेक्षेत तू तोवर कमावलेलं यश विसरला होतास. दुर्दैवाने पुढच्या वेळी जर असा प्रसंग आलाच तर तेव्हा तू तुझं आजचं यश विसरू नको. तू सुखी होतास, आनंदी होतास हे विसरू नकोस. आणि एक लक्षात ठेव हे असे प्रसंग वारंवार येणारच पण त्याला तू अपयश मानतोस की आव्हान समजतोस यावर निकाल अवलंबून आहे.

तात्पर्य, त्या चिठ्ठीत सांगितल्याप्रमाणे 'अपेक्षामधला 'काढून टाक आणि उरलेला 'पेक्षाहा मी कोणा 'पेक्षा' किती अयशस्वीदु:खी आहे हे बघण्यापेक्षा कोणा 'पेक्षा' किती 'सुखीआनंदीयशस्वीसमाधानीआहे हे बघण्यासाठी वापर. जे तुझ्यापेक्षा दु:खी आहेत त्यांना तुझ्यापेक्षा सुखी करण्याच्या प्रयत्नाला लाग. यशसमाधान अजून वेगळं काय हवं मग?" 

मी भारावून जाऊन ऐकत होतो. खरंच हा एवढा विचार मी कधी केलाच नव्हता. उगाच स्वतःची दु:ख कुरवाळत बसण्याची सवय लागली होती मला....... !!! तेवढ्यात मला काहीतरी आठवलं.

"दादाअजून एक. त्या दिवशीही आणि आजही जे जे लोक तुम्हाला भेटून बाहेर येतात त्यांच्या हातात मी तुम्ही मला दिलीत तशी चिठ्ठी बघितली. काय असतं त्या प्रत्येक चिठ्ठीत?."

 "तुला काय वाटतं?" दादा पुन्हा मंदस्मित करत उत्तरले. त्यांच्या प्रश्नातच त्यांचं (आणि माझंही) उत्तर दडलेलं होतं !!! 

--  समाप्त.

56 comments:

 1. वा.. मस्त आहे ... अजिबात कंटाळवाणा नाही आहे... एक मस्त मेसेज पास ऑन केला आहेस... तो ही सहजरित्या... खूप आवडली आणि भावली सुद्धा... :) तूला ज़रा त्रास दिला ना लिखाण पूर्ण करायला.. :D

  ReplyDelete
 2. 'अपेक्षा' मधला 'अ' काढून टाक आणि उरलेला 'पेक्षा' हा मी कोणापेक्षा किती अयशस्वी, दु:खी आहे हे बघण्यापेक्षा कोणापेक्षा किती 'सुखी, आनंदी, यशस्वी, समाधानी' आहे हे बघण्यासाठी वापर. जे तुझ्यापेक्षा दु:खी आहेत त्यांना तुझ्यापेक्षा सुखी करण्याच्या प्रयत्नाला लाग. यश, समाधान अजून वेगळं काय हवं मग?"

  किती सहज आणि सोपे लिहिले आहेस...आयुष्याची व्याख्या ह्यापेक्षा अजून सोपी नसावी... :)

  ReplyDelete
 3. आभार आभार रोहन.. मला वाटलं होतं हा भाग थोडा कंटाळवाणा वाटेल कदाचित.

  पण पहिल्याच छान प्रतिक्रियेने बरं वाटलं.. आता उडू शकतोस तू :)

  ReplyDelete
 4. पुन्हा आभार रोहणा.. पेक्षा-अपेक्षा या बेसिक थीम वरून गोष्ट रचली गेली :)

  ReplyDelete
 5. रोहणाशी सहमत...

  किती सहज आणि सोपे लिहिले आहेस...आयुष्याची व्याख्या ह्यापेक्षा अजून सोपी नसावी... :)

  ReplyDelete
 6. सुंदर! छान जमली आहे. मागचे पण भाग वाचत होतो. पूर्ण होईपर्यंत प्रतिक्रीया दिली नाही. कंटाळवाणी न होण्याची काळजी उत्तम घेतली आहे.

  ReplyDelete
 7. कथा मला आवडली... नॉन लिनीयर कथानक, एकदम 'क्वेंटीन टेरेंटीनो' ईश्टाईल... आजचा भाग खुपंच सुंदर आणि खुप मोठा संदेश अत्यंत सोप्या उदाहरणासह देणारा आहे... अत्यंत आवडला...

  ReplyDelete
 8. खूप आभार सचिन. साध्या गोष्टींतच बरेचदा मोठ्या व्याख्या दडलेल्या असतात.

  ReplyDelete
 9. खूप आभार सीताराम. कंटाळवाणा होऊ नये असा प्रयत्न होताच. शेवटच्या भागाचीच थोडीशी धाकधूक होती.

  ReplyDelete
 10. आनंद :D .. अरे कुठे 'क्वेंटीन टेरेंटीनो' कुठे पामर .. :) .. तरीही उपमा आवडली ;-)
  त्या सोप्या उदाहरणामुळेच कथा जन्माला आली.

  ReplyDelete
 11. हेरंब, साधी-सोपी व भावणारी कथा. सारखे यापेक्षा अजून कायच्या मागे लागण्य़ापेक्षा आपल्यापाशी काय आहे ते पाहण्याची नितांत गरज आहे. खरेच आयुष्याची व्याख्या ह्यापेक्षा अजून सोपी नसावी... :) मस्तच.

  ReplyDelete
 12. आभार श्रीताई.. खरंच .. हे 'अजून काय' थांबवलं की बरेच प्रश्न सहज सुटतील.

  ReplyDelete
 13. हेरंब,
  गोष्ट एकदम भन्नाट आहे, विशेषत: 'आनंदी' असण्याची गुरूकिल्लीच तू सांगितलीस. गेले काही महिने मॅताही रिकार्डच्या 'हॅप्पिनेस' चा प्रभाव माझ्यावर चांंगलाच टिकून आहे, माझी ५ वर्षापूर्वीची जगण्याची धोरणं, अपेक्शा आणि सुखाच्या जागा जवळ-जवळ बदल्यात .. विशेषत:‌गेल्या वर्शभरामधे, हे सगळं माझ्या ब्लॉगवरून कधीकधी अव्यक्तपण व्यक्त होतं असतं .. या पार्श्वभूमीवर तू सांगितलेली ही कथा मनाला मजबूत भावली, हे सांगणे नलगे.
  जय हे !

  ReplyDelete
 14. खूप आभार सोमेश.. गुरुकिल्ली वगैरे सांगण्याएवढा मी काही कोणी मोठा विचारवंत नाही. पण हो. आपल्या आजूबाजूला (आणि ब-याचदा आपल्या स्वतःच्याच आयुष्यात) घडणा-या गोष्टी लिहिल्या आहेत शेवटच्या परिच्छेदात..
  कथा आवडली हे वाचून खूप छान वाटलं. आभार !!

  ReplyDelete
 15. छान शेवट केलास! आणि दररोज एक एक भाग टाकून उत्सुकता पण राखून ठेवलीस. तुझी लेखणी अशीच फ़ुलत राहो हिच अ-पेक्षा :)

  ReplyDelete
 16. आभार अभिलाष.. भाग तसे तयार होते.. पण थोडी थोडी डागडुजी, पॉलिशिंग बाकी असायची. ते करून रोज पुढचा भाग टाकायचो. :)

  शुभेच्छांबद्दल आ-भार :)

  ReplyDelete
 17. क्या बात है!!! मस्तच....

  (अक्शरशहा : मी माझेच विचार सुसंगत मांडल्यासारखे वाचत होते....)

  हेरंब आयुष्य खरं तर फार सोपे असते नाही का, ते तसे ठेवायची ईच्छा असेल तर... लोक आधी उगाच गुंते वाढवतात आणि मग त्यात गुंततात... जिंदगी ये छोटी है पुरी वसुल कर ऐकणारे अनेक पण ते करतात ते खरे !!!

  गोष्ट/ कथा लिहीणारे त्यांचे विचारच त्यांच्या पात्रांना देतात त्यामुळे राजे तुमचे विचार करणेके पद्धत को सलाम!!!

  ReplyDelete
 18. वा वा !! खरच एक अमुल्य संदेश तुम्ही दिला आहे. त्यासाठी धन्यवाद. आणि अजिबात कंटाळवाणी नाही झाली कथा. कथानायक देवेश जसा भारावून ऐकत होता तसे मीदेखील भारावून वाचत होते. खूप छान.

  ReplyDelete
 19. मस्त झाली आहे. मुद्दाम शेवटचा भाग येण्याची वाट पहात होतो. आजच वाचली. कथा प्रकाराला आता चांगलेच दिवस येताहेत म्हणायचे ब्लॉग वर..

  ReplyDelete
 20. chhan ahe goshta.. mast rangali

  ReplyDelete
 21. मस्त एकदम भौ. तु स्वतःबद्दल असलेल्य 'अपेक्षा' होत्या त्या 'पेक्षा' जास्त पूर्ण केल्यास.

  ReplyDelete
 22. हेरंब

  खूपच अप्रतिम. वाचून छान वाटलं.

  सर्व भाग वाचूनच प्रतिसाद द्यावा म्हणून थांबलो होतो. शिवाय ‘चिठ्ठीत’ काय असेल याची उत्सुकता होतीच.

  शेवटचा भाग सर्वात छान झालाय.

  विवेक.

  ReplyDelete
 23. Sajit ParicharakMay 1, 2010 at 6:00 AM

  Hey Heramb, Never knew we have a great thinker, writer in our BIT group. I happen to read all 4 parts at 1-go. Good thought process broadcast over web.

  ReplyDelete
 24. आभार तन्वी..

  >>(अक्शरशहा : मी माझेच विचार सुसंगत मांडल्यासारखे वाचत होते....)

  ग्रेट माईंडस .... !! :)

  अगदी खरंय .. कित्येक वेळा सध्या सोप्या आयुष्याचा उगाच गुंता करून ठेवतो आपण .. आणि अडकून बसतो.

  एवढी मोठी कथा पेशंटली वाचणे के लिये तुम्हेको सलाम !!

  ReplyDelete
 25. आभार जीवनिका.. अग संदेश वगैरे असं काही नाही.. आणि असलाच तरी थोडाफार स्वतःसाठीच :-)

  ReplyDelete
 26. काका खूप आभार.

  >>कथा प्रकाराला आता चांगलेच दिवस येताहेत म्हणायचे ब्लॉग वर..

  अहो मी काय लिंबूटिंबू आहे या कथा प्रकारात. आपल्याकडे एकापेक्षा एक दिग्गज आहेत !!

  ReplyDelete
 27. सोनिया,

  कथा आवडली हे ऐकून बरं वाटलं. प्रतिक्रियेबद्दल अनेक आभार.

  ReplyDelete
 28. विद्याधरा, असाच थोडा आधी 'पेक्षा' बरं लिहून बघण्याचा प्रयत्न !! तसे इथे चिक्कार एका 'पेक्षा' एक आहेतच.. अनेक आ-भार.

  ReplyDelete
 29. खूप आभार मैथिली !!

  ReplyDelete
 30. विवेक, अनेक आभार !! सगळ्यांना कथा आवडली हे बघून छान वाटतंय. मला उगाच वाटत होतं की शेवटचा भाग बोअर होणार आहे :-)

  ReplyDelete
 31. अरे साजित !!! तू चक्क इथे? हा हा.. Thanks for the kind words !! Nothing like 'great thinker, writer' and all.. Just better scribbler may be :-) .. Thanks again.

  ReplyDelete
 32. म्या काय बोललो व्हतो तुला? आता तरी पटलं का ? ;-)

  ReplyDelete
 33. हाहा.. यास्सर.. पटेश पटेश !!

  ReplyDelete
 34. बाबा सत्यवान की जय हो. सध्याच्या स्पर्धेच्या जगात समाधानी राहाणं फार कमी लोकांना जमतं. मला स्व:तला अपेक्षा आणि समाधान ह्याची सांगड घालणे आताशा नाही जमत. सहाजिकच मनस्ताप होतो. अपेक्षानां अंत नाही आणि मला पुढे जाऊन कुठे थांबायचे नक्की माहीत नाही.

  ReplyDelete
 35. बरोबर सिद्धार्थ. अरे ते कथेत सांगणं सोपं आहे. पण प्रत्यक्षात वेळ येते तेव्हा जमत नाहीच.. प्रचंड त्रास होतोच. पण अशा वेळी कसं आणि काय करायला हवं याचा एक आयडियल विचार म्हणून ही कथा जन्माला आली असावी.

  >> अपेक्षानां अंत नाही आणि मला पुढे जाऊन कुठे थांबायचे नक्की माहीत नाही.

  मलाही !! :(

  ReplyDelete
 36. आवडलं आणि पटलंही. मात्र अनपेक्षित शेवट करून तू आमच्या अपेक्षा उंचावल्या आहेत :D
  मनाचा श्लोक आठवला, जगी सर्वसुखी असा कोण आहे.

  ReplyDelete
 37. आभार नॅकोबा.. पटतं पण आचरणात आणताना अवघड जातं असा प्रकार आहे तो :( ..
  शेवट आवडला हे वाचून बरं वाटलं. :)

  >>मनाचा श्लोक आठवला, जगी सर्वसुखी असा कोण आहे.

  अगदी खरं आहे !!

  ReplyDelete
 38. shevat khupch chhan kelas. asech lihit raha.shubheccha.

  ReplyDelete
 39. वा मित्रा... फार सुंदर.. "Pluto's Ghost" म्हणून एक कविता होती अभ्यासात .. तिची आठवण झाली .. खरच, अजाण पणे आपण हातच सोडून पळत्याच्या मागे धावत सुटतो आन हातात जे आहे त्याकडे लक्षही देत नाहीं..
  really, an eye opener post.. keep it up..

  ReplyDelete
 40. हेरंब स्वामी,
  मस्त गोष्ट! जाम आवडली :)

  ReplyDelete
 41. आभार :-) .. शेवट आवडला हे वाचून बरं वाटलं. !!

  ReplyDelete
 42. आभार अमित. किंवा (बहुतेक) अ‍ॅरिस्टोटलची 'माणसाला किती जमीन लागते' वाली गोष्ट..

  पण हे हातात असलेल्यावर समाधानी राहता येणं ही पण कठीण बाबा आहे म्हणा. !!

  ReplyDelete
 43. निरंजन.. आभार !!

  तुम्ही सगळ्यांनी मला गुरुदेव, स्वामी करून टाकलंत .. नुसतं हेरंब बरं आहे :-)

  ReplyDelete
 44. साधी,सरळ,सूटसुटीत, सोपी.....खूपच मस्त.....समाधानी आयुष्य जगायच कस हे सांगुन गेलास.....स्पर्धेच्या युगात आज काल माणूस जगायच विसरून गेलाय....

  अपेक्षा' मधला 'अ' काढून टाक आणि उरलेला 'पेक्षा' हा मी कोणापेक्षा किती अयशस्वी, दु:खी आहे हे बघण्यापेक्षा कोणापेक्षा किती 'सुखी, आनंदी, यशस्वी, समाधानी' आहे हे बघण्यासाठी वापर. जे तुझ्यापेक्षा दु:खी आहेत त्यांना तुझ्यापेक्षा सुखी करण्याच्या प्रयत्नाला लाग. यश, समाधान अजून वेगळं काय हवं मग?


  ज्यांना हे समजल त्यांना आयुष्य कळल......

  ReplyDelete
 45. आभार योगेश. हो ना या गडबडीत, धावपळीत आपल्याला नक्की काय हवंय हेच विसरून गेलो आहोत आपण..

  तेच थोडं कथारुपात मांडण्याचा प्रयत्न केला :)

  ReplyDelete
 46. मस्त सुंदर शेवट चागंला केला .जागी सर्व सुखी असा कोण आहे ,

  ReplyDelete
 47. Mast ch jamley re Heramb. Gosht he madhyam ch jabardast ahe ani tu vapar pan mastch kela ahes hya madhyamacha. Ajun yeu de...

  Amol Kanitkar

  ReplyDelete
 48. आभार काका..

  >>जगी सर्व सुखी असा कोण आहे
  अगदी खरंय..

  ReplyDelete
 49. अरे वा. चक्क अमोल कानिटकर .. क्या बात है. आभार.. !!

  आणि कथा माध्यमाचा परिणामकारक वापर करणार्‍यांत तुझा नंबर फार वर आहे :)

  ReplyDelete
 50. Khupach sahi zali aahe gosht. shevatacha bhag sundar.

  ReplyDelete
 51. धन्स हेमाली..

  ReplyDelete