Monday, May 3, 2010

मी आणि (माझंच) वय

 गेल्या वर्षी रूममेट बरोबर बसलो असताना तो फार गुंग होऊन त्याच्या लॅपटॉपमध्ये डोकं घालून बसला होता (म्हणजे नक्कीच ऑफिसचं काम करत नसणार).. बघितलं तर काहीतरी चित्रविचित्र आकार दिसत होते.

"हे काय नवीन?" मी (मोठ्ठ्याने) अज्ञान पाजळलं.
"अबे तू फार्मव्हिले नही जानता?" त्याने 'अरे ये पीएसपीओ नही जानता' च्या लयीत गोंगाट केला.

पण त्या पीएसपीओवाल्या बावळटाप्रमाणे (इथे बावळट हे वर्णन म्हणून वापरले आहे उपमा म्हणून नव्हे. थोडक्यात 'बावळट' हे पीएसपीओवाल्यास लागू होते, आम्हास नाही !!) गांगरून जाऊन, खांदे खाली पाडून, मनात आणि चेहर्‍यावर अपराधी भाव आणून 'नाही' असं म्हणण्याऐवजी मी गटण्याच्या थाटात छाती पुढे काढून, नाथा कामतच्या बेफिकीरीने 'नही' (आणि च्यायला फार्मव्हिले नही जानला म्हणून काय आभाळ कोसळा क्या, उग्गाचका नाटक वगैरे वगैरे) म्हणालो.

(यापुढचा (आणि मागचाही) सगळा संवाद हिंदीत झाला असला तरीही आपली वटवट मराठीत असल्याने संवाद अनुवादित करत आहोत.)

"अरे फार्मव्हिले हा एक गेम आहे. बहुतेक (हे 'बहुतेक' माझ्या पदरचं (शर्टचं) आहे. त्याने जे काय सांगितलं होतं ते 'नक्की' स्वरूपाचं होतं. परंतु ते आम्हास आता आठवत नाही.) फेसबुकात खेळायचा. म्हणजे एक शेत असतं. तिकडे झाडं लावायची, आपल्या शेताची हद्द वाढवत न्यायची."

(मी मनात) "खरंच हद्द झाली"
(मी जनात) "होका वा वा.. अरे पण हे खेळायचं कसं? आणि काय करायचं नक्की? त्यात एवढं इंटरेस्टिंग काय आहे?" 
(तो जनात)"ते तुला खेळल्याशिवाय समजणार नाही".. याबरोबर डायलॉगाच्या सोबतीला एक तीव्र तुच्छ कटाक्षही होता. (माझा पोपट होत असला तरीही वाचकांसमोर प्रसंग अधिकाधिक जिवंतपणे उभा राहावा यासाठी मी क्षणभर मानहानी पत्करायला तयार आहे !!!)
(तो मनात)"च्यायला, कुठून कुठून येतात हे लोक. खेळायला नको आणि हे कसं, ते कसं, इंटरेस्टिंग काय असले भुक्कड प्रश्न विचारत बसतात."
(मी जनात) "हो तेही खरं आहे म्हणा. असो. चालुद्या... चालुद्या तुमचं "

मी मनात काय म्हणालो हे खरं तर सांगणार नव्हतो तुम्हाला पण इलाज नाही (आठवा प्रसंगाची सच्चाई, जिवंतपणा वगैरे वगैरे.)
"वय झालं च्यायला !!!"


**

(हाही संवाद हिंदीत झाला असला तरीही आपली ........ अनुवादित करत आहोत.)


"तू येणारेस का 'अर्थ् - एन वाय सी' ला?" शुक्रवारी संध्याकाळी वीकांताच्या मुडात असताना सगळी आवराआवर करून ऑफिसमधून निघत असताना एका कलिगचा प्रश्न पाठीवर येऊन आदळला.

(मी मनात : मी कथा लिहिणं बंद करणार आहे आता. उगाच (थोडं) अलंकारिक आणि मोठी मोठी वाक्यं वगैरे लिहिली जातात. बादवे, हे मनातलं आत्ता लिहितानाच्या प्रसंगातलं आहे. त्या वरिजनल प्रसंगात माझ्या मनात काहीही नव्हतं. प्रश्न कळलाच नव्हता तर मनात विचार तरी काय करणार?)

"कुठे?"
"अर्थ् - एन वाय सी"
"म्हणजे?" मी अवचितपणे पीएसपीओवाल्याचा 'कुंभमेळ्यात हरवलेला भाऊ' जन्माला घातला.
"अरे क्लब आहे. तिकडे शुक्रवारी 'बेसमेंट भांगडा' असतो. डीजे यो-सुशील येणार आहे. जबराट मिक्स करतो तो."
"अच्छा. नको पण. मला ते रिमिक्स झेपत नाही. मूळ गाणी बरी वाटतात. आणि तसंही मी नाचणार म्हणजे .. ख्या ख्या ख्या"
"अरे असा काय तू? 'रिमिक्स झेपत नाही' काय?"
".."
(तो मनात) "च्यायला बरा वाटायचा हा पूर्वी. पण  'अर्थ्-एन वाय सी', 'बेसमेंट भांगडा', 'डीजे यो-सुशील' माहित नाही म्हणजे कमाल झाली याची."
(तो जनात) "अरे, येऊन बघायचं एकदा. आपोआप आवडायला लागेल. डान्स, रिमिक्स सगळंच."
(मी मनात) "भाऊ, नाचता येतं मला. ते वरचं 'ख्या ख्या ख्या' औपचारिक होतं. पण रिमिक्सने तिडीक जाते बाबा डोक्यात. आणि त्या गाणं चिकटवा-चिकटवी, उचला-उचलीचं कसलं कौतुक रे? मला तर मुळीच नाही. वैतागच येतो उलट."
(मी जनात) "नको. जाउदे. पुढच्या वेळी बघू. तू जा."
(तो मनात) "बरं झालं येत नाहीयेस ते. बोर झालं असतं. तुला आणि आम्हालाही."
(तो जनात) "हरकत नाही. पण पुढच्या वेळी नक्की"
(मी जनात) "हो हो. एकदम नक्की"
(मी मनात) "वय झालं च्यायला. आता तर अगदी नक्कीच !!"

-- 

असे हे वयात येण्याचे आपलं सॉरी वय झाल्याचे अजून काही किस्से पुढच्या (वर्षीच्या) भागात !!

46 comments:

 1. घाबरू नकोस तुला कोणी काका, आजोबा म्हणणार नाहीस...आपल्यासाठी तू हेरंबच राहशील...तू लिहिते रहा वाढत्या (??) वयाचे किस्से..आम्ही सुद्धा वाढू की तुझ्यासोबत....आणि तू लहान झालास की लहानपण होऊ...हाय काय नाय काय :--)))

  ReplyDelete
 2. हा हा .. आभार सुहास.. वाचलो.. ;-)

  तू मनकवडा आहेस. का ते कळेलच पुढच्या पोस्टीत.. :)

  ReplyDelete
 3. हेरंब, एक प्रश्न.... तुला हे सगळं सुचतच कसं?? ;)

  ReplyDelete
 4. अभिलाष :)

  (मी जनात) अरे हे सगळे प्रसंग जसेच्या तसे घडलेले आहेत. वाईस जरा इनोदाची फोडणी दिली.
  (मी मनात) एकदम सोप्पंय. मेंदू बाजूला ठेवून काहीतरी टंकायचं ;-)

  ReplyDelete
 5. अरे वय हे (मोठ) होण्यासाठीच असत. आपण त्याच एवढ मनावर नाही घ्यायच.

  बाकी सुहासशी सहमत १+

  ReplyDelete
 6. आभार अपर्णा..

  ReplyDelete
 7. सचिन, आभार. नाही रे मनावर वगैरे नाही. असाच जरासा टीपी उगाच.. :)

  ReplyDelete
 8. सत्यवाना.....अरे माणसाने कस "चिरतरुण" असाव म्हणजे बग...."पिकल्या पानाचा....देठ की वो हिरवा".....असो तुझा हा टी.पी. चालू आहे हे माहीत आहे ....मस्त झाली आहे पोस्ट!!!

  ReplyDelete
 9. हा हा योगेश.. आभार..
  आणि हे पण पिकलेलं मुळीच नाही हे कळल्याबद्दल अजून आभार ;-)

  ReplyDelete
 10. वाह...खर म्हणजे सत्यवाना...जमेल जमेल..रिमिक्स वर हळु हळु नाचणे पण जमेल...आदितेय होतच आहे मोठा..तो नाचवेलच......काळजी नसावी...:फ

  ReplyDelete
 11. >>> मी अवचितपणे पीएसपीओवाल्याचा 'कुंभमेळ्यात हरवलेला भाऊ' जन्माला घातला.

  बापरे, मी जाम हसलो या वाक्याला..

  क्रमशःचे वेगवेगळे प्रकार शोधुन काढायला तू... फक्त क्रमशः लिहित नाहीस... लगे रहो

  ReplyDelete
 12. आभार माऊ.. हो ग. बरोबर आहे तुझं.. घरात आमचा डी-जे रोजच नाचवत असतो मला ;-)

  ReplyDelete
 13. हा हा.. आभार आनंद.. !!

  अरे कसलं क्रमशः. अगदी छोटी झाली पोस्ट आणि काहीच सुचत नव्हतं म्हणून उगाच पाणी घालून वाढवण्यापेक्षा सरळ असलं काहीतरी लिहून टाकलं शेवटच्या वाक्यात. आणि ही पोस्ट पब्लिश केली आणि ५ मिनिटात नव्या पोस्टचा विषय सुचला. पण टंकायला अजून वेळ मिळालेला नाही. डोक्यातच साठलंय अजून.. बघू. वेळ मिळाला की उतरवून काढतो. (हे म्हणजे मी उगाच एखादा मोठ्ठा सामाजिक प्रबंध लिहित असल्याच्या आवेशात बोलल्यासारखं वाटतंय :P)

  ReplyDelete
 14. हा हा... इतक्यात वय होऊन ना चाल बे रे! अजून लई इनोदी प्रसंग निभवायचे हायेत...बाकी ते रिमिक्स मला पण झेपत नाही. चांगल्या चांगल्या गाण्यांचा अन माझ्या डोस्क्याचा भुगा होतोयं. वय झाल्याची तीव्र लक्षणे आहेत सगळी :P... तन्वीला आयतेच फावलेयं.... सारखी मला म्हातारे म्हातारे म्हणून हाका मारते...:D

  ReplyDelete
 15. आपलं वय झालयं (म्हणजे साधारण तिशी नुकतीच १/२ वर्षापुर्वी ओलांडलीये किंवा अगदीच गेलाबाजार गाठलीये ) याची जाणिव करून घ्यायची अगदीच प्रबळ ईच्छा असेल ना तर आपल्या एखाद्या नुकत्याच दहावी संपून अकरावीत प्रवेशणाऱ्या भावंडाच्या आरकूटात प्रवेश कर... ही सगळी मित्रमंडळी जे बोलतात ते आपल्यावरच्या हवेत असे काही तरंगते की पकडून स्वत:च मेंदूपर्यंत पोहोचवावे लागते..... आणि मनात (मेंदू आणि मग वेगळे आहेत असे गृहित धरलेय इथे मी :) )जाणवते की आपले वय झालेय.... :D ... हृदयी शल्यबिल्य फारच सेंटि असाल तर, नसाल तर आपला ’च्यायला उगाच एखादी गोष्ट नही जानता म्हणून काय आभाळ कोसळा क्या, उग्गाचका नाटक वगैरे वगैरे’ चा ऍटिट्यूड मस्तच.

  असो, पोस्ट मस्तच झालयं... आणि हो आपलं वय झाल्याची जाणिव आपली मुलं बर्र्र्रूओब्बर्र ( र ला र जोडलाय)करून देतात :)

  आणि त्ये शेतबित आम्हालाबी नाय जमत आनि त्ये मिक्श गानी नाय बा पटत... :)

  ReplyDelete
 16. sahi re.. ek number.
  vay zaalay he daakhavinyaachi (picture.. (malaa tari)) garaj naahi waatali.. aso.
  aataa aaditey barobar mix houn remix var naachayalaa laag. naahi tar pratyek veli navin ek kumbhmeLaa (ki tyaatalaa bhaau) ubhaa rahaayachaa :)
  PSPO chi ad hi kharech khup afalaatun aahe. tyaa maanaae aaj kaal ads lakshaat ch rahaat naahit. aaypeeyel (IPL) ne tar kacharaa ch karun taakalaa aahe.

  ReplyDelete
 17. haha! mast aahe (nehmipramanech!)
  baaki "मी अवचितपणे पीएसपीओवाल्याचा 'कुंभमेळ्यात हरवलेला भाऊ' जन्माला घातला." bhaaree aahe! parawach asa ek anubhav maladekhil aala. "housie" ki ashach kuthalyatari navacha poorNapaNe luck-based kheL (?) eka function chya nimittane kheLanyat aala. tevha majhya haataat te housie che card dilyawar me majhya maitrinila vicharala, he kai? tar ti mhane, te sangteel te number fold karayche.. pudhe chhanpaiki prashn hotach majha - "ka?" :P
  aani ho, farmville baddal +1.. facebook join kelyakelyach me status takalele.. "strict no to farmville" karaychi tar kharikhuri sheti karu mastpaiki! :D

  ReplyDelete
 18. श्रीताई, अभी तो मय जवानच हुं पण हे फार्मव्हिले आणि रिमिक्सवाले आणि अजून कोण कोण वाले भेटले की एकदम टक्कल पडल्यासारखं वाटतं :P
  बाकी ते रिमिक्स मलाही कधीच झेपलं नाही !!

  ReplyDelete
 19. तन्वी, तुझ्या ऑर्कुटच्या मुद्द्याशी एकदम सहमत. आपण (किंवा ते) परग्रहावरून आल्यासारखे वाटतो.. आणि ते तरंगलेलं मेंदूत पोचवून मनात त्याचा अर्थ लागेपर्यंत अजून भडीमार झालेला असतो !! अशा वेळी मला नेहमी तो F.R.I.E.N.D.S मधला 30th B'day वाला एपिसोड आठवतो. आणि अशावेळी 'च्यायला उगाच एखादी गोष्ट नही जानता म्हणून काय आभाळ कोसळा क्या'वाला अ‍ॅटीट्यूड एकदम भारी उपयोगी पडतो..

  >> आणि हो आपलं वय झाल्याची जाणिव आपली मुलं बर्र्र्रूओब्बर्र ( र ला र जोडलाय)करून देतात :)

  हे तर एकदमच मान्य. आणि त्यांच्यापुढे तर तो अ‍ॅटीट्यूड दाखवून पण उपयोग नाही.. :)

  चला श्येत आणि रीमिक्ष गाण्या बाबतीत पण पटतं तर आपलं.. :)

  ReplyDelete
 20. आभार महेश :)

  अरे काहीतरी टाकायचं म्हणून ते चित्र टाकलं. वय झालं म्हंटलं की माझ्या डोळ्यासमोर सर्वप्रथम असं काहीतरी येतं :)

  अरे डीजे यो-आदितेय तर ऑलरेडीच नाचवतोय मला त्याच्या स्वतःच्या रिमिक्स (वुईथ झंकार बिट्स) वर.. त्यामुळे तिथे (अजून तरी) कुंभमेळ्याचा भाऊ नाही :)

  खरंच रे जुन्या जिंगल्सची सर या नव्या बिनडोक अ‍ॅडसना मुळीच नाही.. आणि इकडच्या अ‍ॅडसतर इतक्या भयानक बिनडोक असतात की काही विचारता सोय नाही. कीव वाटते त्यांच्या बुद्धीची.

  ReplyDelete
 21. धन्स मेघा.

  हौझी पूर्वी मी हौशीने खेळायचो. हल्ली कंटाळतो. (वय झाल्याचं अजून एक लक्षण?? :( ) .. तुझा तो प्रश्न ऐकून तुझी मैत्रीण जनात आणि मनात काय म्हणाली असेल हे मी समजू शकतो :P

  अग ते फार्मव्हिले मला अजाबात झेपत नाही. आणि लोकं त्याच्यावर तासनतास चर्चा करत असतात.. !! म्हणून तर मी हल्ली फेसबुकात पण जाणं बंद केलं ऑलमोस्ट :)

  ReplyDelete
 22. आमच्या ऑफीसमध्येपण फार्मव्हिलेचा सुकाळ आहे सध्या. मी फेसबुकवर नाही त्यामुळे मला काही तो प्रकार माहीत नव्हता. पण मध्यंतरी सगळी लोकं लंचनंतर जांभया द्यायचं सोडून मनापासून काय काम करतात हे पाहायला गेलो तर सगळे हरीतक्रांतीचे जनक होऊन बसलेले.

  बाकी वाढत्या वयावर काय बोलणार. चालायचचं.

  ReplyDelete
 23. अरे इथे तर लोकांना विषय नाही दुसरा.. सदान् कदा ती शेतीवाडी. अरे कित्येक मराठी सायटींवर पण त्यांनी या शेतीवाडीच्या डिस्कशनचे नवे धागे उघडले आहेत.. आता बोल !!

  >>बाकी वाढत्या वयावर काय बोलणार. चालायचचं.

  काय बोलणार. त्यावर उपाय इल्ले :(

  ReplyDelete
 24. ओ बाबा, तुम्हाला काही समजतंच नाही. ही फॅशन आहे हो.... असं ऐकायचे दिवस यायचे आहेत..... मोठं व्हावंच लागतं, फक्त वय होऊ न देता मोठं व्हायचं.कळत न कळत मोठं होतंच असतो आपण!

  ReplyDelete
 25. वय वाढलं आणि म्हातारं झाल्यासारखं वाटायला लागलं कि ह्यु हेफनर किंवा विजय माल्ल्याकडे बघावं...

  ReplyDelete
 26. He...he... :D
  Post as usal mastach...
  Aani nahi re nahi jhaley tuze vay..Nahitar mi tula KAKA naste ka mhatale... !!! Me tula dada mhanate mhanaje mazya community nadhala samajate... So, Take a chill pill...[aani ho Remix mala suddha nahi aavadat.. pan Farmville kharech interesting aahe...Try it out..Hirval ugav aani kayamacha hirava( evergreen) ho... :)]

  ReplyDelete
 27. माणूस वयाने मोठा झाला तरी मनाने तरुण असतो,

  ReplyDelete
 28. हेरंब,
  जनात मनात ची पद्धत खूपच आवडली. :) माझ्या अंदाजे तुम्ही तिशीत असाल. इतक्या लवकर वय झाल्याची चिंता तर आमच्या वयाचे व्हाल तेव्हा काय?

  ReplyDelete
 29. हो ते आहेच. "तुम्हाला काही कळतच नाही" प्रकरण चालू व्हायचंय अजून. ही पिढी तर तेही अजूनच लवकर सुरु करते की काय देव जाने :)

  >> मोठं व्हावंच लागतं, फक्त वय होऊ न देता मोठं व्हायचं.कळत न कळत मोठं होतंच असतो आपण

  लाखातलं बोललात..!

  ReplyDelete
 30. हा हा.. प्रोफेटा, हे एकदम भारी.. अरे पण अजून मी मल्ल्या किंवा हेफनर एवढाही म्हातारा नाही रे. पुढे मागे (म्हणजे तीसेक वर्षांनी) बघू :)

  ReplyDelete
 31. धन्स स्वप्नील :-) .. वाढत्या वयाच्या वाढत्या शुभेच्छा वाढत्या वयाच्या माणसाकडून मिळाल्यावर बरं वाटलं ;-)

  आणि ब्लॉगवर स्वगत. असाच भेट देत रहा..

  ReplyDelete
 32. मैथिली, बाप रे.. काका..?? नको नको..!! काका मला वाचवा!! बरं झालं दादा म्हणतेस तेच. (उपसूचना, या ब्लॉगलेखकाला प्रतिक्रियेतही का होईना काका संबोधणा-यांच्या प्रतिक्रिया डिलीट केल्या जातील हो SSS)..

  तुमच्या कम्युनिटीत आल्याने हायसं वाटलं जरा. :)

  असं म्हणतेस? बरं बघू फार्मव्हिलेची शेती करायचा योग कधी येतो ते :)

  ReplyDelete
 33. आभार काका, हो तसा मी मनाने (आणि वयानेही) तरुण आहे हे तर महित्येच तुम्हाला :)

  ReplyDelete
 34. धन्यु निरंजन :-)

  तसं नाही. तसा मी तिशीतला तरुणच आहे अजून पण आजूबाजूची जनता, त्यांच्या आवडीनिवडी बघितल्या की उगाच वय झाल्यासारखं वाटतं :)

  बादवे, मला अरे-तुरे चालेल, आवडेल :)

  ReplyDelete
 35. Haay mai kya karu mujhe buddha mil gaya :(

  ReplyDelete
 36. बुढ्ढी को और क्या मिलेगा !!

  (तमाम वाचक वर्गास आवाहन, माझ्या राहण्या, जेवण्याची-खाण्याची सोय करा रे कोणी.. ;-))

  ReplyDelete
 37. ते तुला खेळल्याशिवाय समजणार नाही...
  सोबतीला एक तीव्र तुच्छ कटाक्ष

  :P :D

  ReplyDelete
 38. ekdam zakas.....ani ekadam.sahi [.च्यायला फार्मव्हिले नही जानला म्हणून काय आभाळ कोसळा क्या].......aavadal...bandhu

  ReplyDelete
 39. आभार नचिकेता. ते लिहिताना तूच होतास डोळ्यासमोर.. gameking !! ;-)

  ReplyDelete
 40. :D .. आभार दर्शना.. अग फार्मव्हिले आवडत नाही/खेळत नाही म्हटल्यावर लोक असेच वेड्यासारखे बघतात :)

  ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत रहा.

  ReplyDelete
 41. शिनुने वाचलं नाही वाटतं हे??? ती एकदम मोठ्ठी शेतकरीण आहे..:)
  मागे माझ्या एका मैत्रीणीने असंच मला शेतीला शेजारीण हवीय म्हणून accept कर म्हणून वीट आणला होता..मी म्हटलं खरी झाडं लाव की गं एखादं?? असो...फ़ार्मविलेमुळे लोकं खरी झाडं लावतील का अशा चिंतेत मी होते काही दिवस तेव्हाच लक्षणं जाणवली होती..सो यु सी लाइक मांईड्स..:)

  ReplyDelete
 42. नाही बहुतेक. वाचलेलं दिसत नाहीये. नाहीतर एव्हाना शेजारधर्माची-रिक्वेस्ट पाठवली असती :)

  बापरे फ़ार्मव्हिलेमुळे ख-या झाडांची चिंता केलीस म्हणजे खरी पर्यावरणवादी आहेस ;)

  आणि लक्षणांतही लाइक मांईड्स आहोतच आपण :D

  ReplyDelete
 43. उगाच का तुम्हाला न्यायाधीश केले... हेहे... जनात... मनात... आणि कंसात सुद्धा... :)

  ReplyDelete
 44. हा हा .. कंसात सुद्धा हे भारी होतं..

  ReplyDelete