Thursday, May 6, 2010

चक्र

वडील : वाचलीस का त्या अझर मसूदची बातमी?
मुलगा : हो वाचली. वेळीच त्याला फासावर लटकावला असता तर कारगील युद्धातल्या हुतात्म्यांची अशी बेअब्रू झालेली पाहायला लागली नसती. आता त्याला सन्मानाने कंदाहारला सोडून यावं लागतंय !!
वडील : काय करणार. आपली न्यायव्यवस्थाच अशी आहे. दुर्दैव आपलं.. दुसरं काय..

**

मुलगा : चला. एकदाची फाशीची शिक्षा झाली त्या अफझल गुरुला.
वडील : प्रत्यक्ष फाशी दिली गेली की शिक्षा झाली असं म्हणायचं. तोवर ... !!
मुलगा : बाबा, संसदेवर हल्ला केला आहे त्याने. फाशी होणारच. नक्कीच.
वडील : ".."

**

मुलगा : चला. एकदाची फाशीची शिक्षा झाली त्या कसाबला.
वडील : अफझल गुरुच्या वेळीही असंच झालं होतं. आठवतंय? पण काय बदललंय अजून? सगळं आहे तसंच आहे.
मी : बाबा, पण कसाबच्या बाबतीत नाही असं होणार. शेकडो लोकांचे जीव घेतले आहेत त्याने.
वडील : ".."

**

वडील : वाचलीस का रे त्या अफझल गुरु आणि कसाबची बातमी?
मुलगा : हो वाचली. वेळीच त्यांना फासावर लटकवलं असतं तर संसद हल्ल्यातल्या आणि मुंबई हल्ल्यातल्या हुतात्म्यांची अशी बेअब्रू झालेली पाहायला लागली नसती. आता त्यांना सन्मानाने पाकिस्तानात सोडून यावं लागतंय !!
वडील : काय करणार. आपली न्यायव्यवस्थाच अशी आहे. दुर्दैव आपलं.. दुसरं काय..

**

मुलगा : हॅलो बाबा, कसे आहात तुम्ही आणि आई? सगळं ठीक आहे ना? किती भीषण आहे हे !! मुंबई, दिल्ली, बंगलोर, हैद्राबाद, पुणे, चेन्नई, कोलकाता, अहमदाबाद सगळ्या ठिकाणी एकाच वेळी हल्ला ??
बाबा (जुना मुलगा) : आम्ही ठीक आहोत देवाच्या कृपेने. पण कठीण आहे सगळं. मुंबई हल्ल्याच्या वेळी ३६ तास लढावं लागलं होतं. यावेळी नक्की आठवडाभर तरी लढावं लागेल. कारण मागच्या प्रसंगातून आपण काही शिकलो नसलो तरी ते मात्र शिकले असतील. अजून जय्यत तयारीने आले असतील.

**

आजोबा (जुना मुलगा) : हॅलो बाळा. बोल. कसा आहेस? कधी येतो आहेस तू?
नातू : नाही आजोबा. येणं शक्य नाही. प्रोग्राम बदलावा लागतोय. तेच सांगायला फोन केला होता. बातम्या बघितल्यात का? सहा विमानांचं अपहरण झालं आहे. त्यात अडकलेल्या लोकांना सोडवण्यासाठी २०२० च्या मुंबई, दिल्ली, बंगलोर वगैरे शहरांवर झालेल्या हल्ल्यात जिवंत पकडलेल्या १० अतिरेक्यांना पाकिस्तान, अफगाणिस्तान असं कुठेकुठे सोडून येणार आहेत आपले संरक्षणमंत्री, गृहमंत्री, परराष्ट्रमंत्री वगैरे वगैरे. त्यामुळे पुढचे ४८ तास भारतातले सगळे विमानतळ बंद आहेत. त्यामुळे आम्ही आमचं येणं थोडं पुढे ढकलतो आहोत. कदाचित पुढच्या महिन्यात वगैरे..
आजोबा : हो आत्ताच पाहिलं आम्ही. सांभाळून रहा रे बाबांनो.

--

आणि चक्र चालूच राहतं !!!

य असल्या अफझुल्ल्यांवर कोर्ट कचेर्‍या करत खटले चालवत राहून शिक्षेच्या अंमलबजावणीची वाट बघण्यापेक्षा वाघनखांनी कोथळा बाहेर काढणे हा योग्य न्याय आहे ही शिवरायांची शिकवण आपण जोवर अंमलात आणत नाही तोवर हे असंच चालायचं !!

'ते' एव्हाना पुढच्या तयारीला लागलेही असतील. चला, आपणही लठ्ठ कातडीचा एक गच्च थर अंगावर चढवू आणि आपापली ढापणं लावून घेऊ. थोडक्यात ही (ही) फाशी होणे नाही कारण आता अशी होईल पुढील कारवाई.

प्रार्थना : हा सगळा कल्पनाविलास खोटा ठरावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना. परंतु पूर्वानुभव पाहता तो खोटा ठरेलच याची शाश्वती मात्र नाही दुर्दैवाने.. :(

45 comments:

 1. काही नाही होत त्याला फाशी इतक्यात. आपली न्यायव्यवस्था इतकी हतबल आहे की काय सांगू..काल त्याला शिक्षा झाली म्हणून फटाके वाजवले, पेढे बर्फ्या वाटल्या...पण कायद्याच्या पळवाटा आपणच त्याला खुल्या केल्यात..हाइ कोर्ट, सुप्रीम कोर्ट, मग राष्ट्रपतीकडे दयेचा अर्ज....झक मारली आणि त्याला जिवंत पकडला सोडायाच तरी नाही तर मारायाच तिथेच. त्याला पकडून काही फायदा तर झाला नाहीच वर आपलेच पैसे त्याच्यावर उडवले..

  ReplyDelete
 2. हो रे. खरं आहे अगदी. सगळं कायद्याच्या चौकटीत राहून झालं पाहिजे, आपण कसे न्यायाची वाट चोखाळणारे महान लोक आहोत हे दाखवण्याचा एवढा अट्टाहास असेल तर दाखवा बापडे पण दीडशेच्या वर लोक मारलेल्याला ६०० साक्षीदार लागतातच कशाला? आणि हे एवढं सगळं करणं अगदी अत्यावश्यकच आहे असं वाटतंय ना मग करा दिवसाचे २०-२० तास काम, चालवा खटले २४*७ आणि संपवा तो ८ दिवसांत. उगाच दीड वर्षं दळण दळायची आवश्यकता का होती? आणि जर न्यायालयाला वाटत असेल की आपण सर्वश्रेष्ठ आहोत, योग्य न्यायनिवाडा करणं हे आपलं काम आहे तर मग त्या शिक्षांची वेळच्या वेळी अंमलबजावणी होते हे ही बघा. त्यासाठी ज्या कोणावर दडपणं आणायची आहेत ती आणा, ज्या कोणाला कायद्याची भीती दाखवायची आहे त्यांना दाखवा पण शिक्षेची झटपट अंमलबजावणी करायला भाग पाडा.
  मी ऐकलं की करकरे यांच्या पत्नीने सांगितलंय की कसाबला चौकात फाशी द्या. आता त्यांच्या भावना महत्वाच्या की ज्यांना या हल्ल्यात साधं खरचटलेलंही नाही त्या न्यायाधीशाची/राष्ट्रपतीची परवानगी महत्वाची? जाउदे संताप होतोय नुसता.. !!!

  ReplyDelete
 3. अजून १० लोकं मोकळे फिरताहेत म्हणे.... त्यांचं काय???
  दहा कसाब मोकळॆ?? कशी धास्ती वाटते नां??
  आणि हो.. कसाब ला काही फाशी वगैरे होणार नाही. लिहून ठेवा आजच..
  एखाद्या मंत्र्याच्या मुलाला/मुलीला पळवून नेतील आणि मग ह्याला सोडतील.
  रबिना ला विसरलास का??

  ReplyDelete
 4. हो ना. तेही ऐकलं होतं मागे. पण नंतर कुठे काहीच ऐकलं नाही त्याविषयी. बातमी दडपली बहुतेक सरकारने. बातमी दडपतील पण त्यामुळे होणा-य परिणामांना कसे सामोरे जाणार?

  आणि हल्ली एक वेगळीच फॅशन आली आहे. सरकार काय करतंय असं विचारलं किंवा सरकारला त्यांच्या चुका (ब्लॉगवरून) दाखवल्या, आपल्या अपेक्षा सांगितल्या, त्यांच्या नाकर्तेपणाला नावं ठेवली की काही बुद्धिजीवी उलटे आपल्यालाच विचारतात की सरकार काय करतंय ते जाउदे, तुम्ही काय करताय.. उगाच नावं ठेवू नका स्वतः काहीतरी करा. !!

  मलाही खात्री आहे कसाबला फाशी होत नाही. निदान माझी नातवंडं येईपर्यंत तरी नक्कीच नाहीच !!!

  ReplyDelete
 5. ती रूबीना मुफ्ती मुहमंद सईद.........तिचीच बहीण काश्मीरात सध्या नॅशनल कॉन्फर्न्स च्या विरूध्द पार्टीची मुख्य आहे. नाव आठवत नाहीये.....ते रूबीना प्रकरण म्हणजे तू मारल्या सारखं कर आणि मी रडल्या सारखं करतो. तेव्हा पासूनच तर ह्या अपहरण करून अतिरेक्यांना सोडवुन घेण्याची फॅशन आली.

  ReplyDelete
 6. >> तेव्हा पासूनच तर ह्या अपहरण करून अतिरेक्यांना सोडवुन घेण्याची फॅशन आली.

  अगदी बरोबर अपर्णा. त्या रुबिना अपहरण प्रकरणाच्या वेळी तर मी खूप लहान होतो. तरीपण एखाद्या मंत्र्याच्या मुलाला/मुलीला पळवून नेऊन मागण्या पूर्ण केल्या जातात हे पक्कं डोक्यात बसलं.

  ReplyDelete
 7. हेरंब, आपण नुसता तळतळाट करुन काही उपयोग नाही.. फक्त दुसर्‍या हल्ल्याची वाट पाहायची...बस्स..

  ReplyDelete
 8. Completely Agree Heramb. These are the troubled times. The Constitution can not anticipate them. Govt. can't act amid freedom of media and so called Human rights activists as they overlook the threat to national security which is more important and rather engage in raising their TRP and popularity. If we have to wage war on these foreign infiltrators... certain civil rights, at least for sometime...must be...suspended.

  ReplyDelete
 9. हो ना आनंद. पण आपल्या हातातही काही नाही. त्यामुळे तळतळाट केल्याशिवाय रहावतही नाही.

  ReplyDelete
 10. सारंग, एकदम मान्य. पण प्रॉब्लेम हाच आहे की हे सगळे विचार/उपाय आपल्यासारख्या सामान्य माणसांनाच पटतात कारण ते आपल्याशी थेट निगडीत असतात. पण वरून कारभार हाकणार्‍या आंधळ्या सरकारला दिसत नाहीत कारण कितीही हल्ले झाले तरी त्यांच्या तुंबड्या भरण्याच्या कार्यक्रमात कुठलाही व्यत्यय कधीच येत नाही. भरडले जातो ते आपणच.

  असो. सध्या तरी (पुढची कित्येक वर्षं) कसाबच्या फाशीची वाट बघणं हेच हातात आहे आपल्या. :(

  आणि ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत रहा. आभार ...

  ReplyDelete
 11. hmm.. parwa (parwach kaay! kharatar gele kityek mahine) dokyat asa vichar aala ki asha babtit khatalyacha nikaal asayla aadhi khatalach kasa asu shakato? je dolyanna disale, baatamyat eikale asha goshtinna purawa laguch kasa shakato? pan tu mhantos tech khare aahe.. me maaralyasarakhe karato, tu radalyasarakha kar.. naatak zale ki loke khush.. lokanna saway lawaychi asha natakachi.. itaki ki aapan aata khatrine fashi honar nahich asa mhanu lagaloy.. :(

  ReplyDelete
 12. kadhi kadhi tar mala watate ki apalyatalyach ekane kasetari karun asha lokanna thaar kele pahije; aani tevha apalyala lagech faashi hoil.. purawa nako ani khatala nako. ek changala maaNus baLi jaail pan jagatali ghaaN hi ghewun jaail..

  ReplyDelete
 13. aaNi ya sagalyaat height mhanje tya kasab cha vakeel. me kahi ha khatala follow kelela nahi pan jevha tyala doshi tharawanyat aale (tyaat tharawayche kaay hote, devala thaawuk!), tevha tyacha vakeel asa mhanala asa me eikale ki - to adnyani aahe, baccha aahe - vagaire. mala tar watate tya vakilachya kutumbala jari tyane maarale asate na tari ha vakil lobhapaayee asach mhanala asata. useless

  ReplyDelete
 14. मेघा, तुझ्या तिन्ही मुद्द्यांशी सहमत. हेच प्रश्न मलाही अनेकदा पडलेले आहेत. तुझ्या दुसर्‍या मुद्द्याविषयी थोडक्यात इथे लिहिलं होतं.

  http://www.harkatnay.com/2010/02/blog-post.html

  त्या वकिलाला लाज, देशाभिमान काही आहे की नाही हे काळात नाही. उलट त्याने असं करायला पाहिजे की चला नाहीतरी खटल्याचा फार्स करायचा आहेच ना, करुया.. कसाबला वकील दिला असं दाखवायचं पण प्रत्यक्षात केस लढताना त्याने कसाबची बाजू काहीच मांडायची नाही. उलटतपासणी नको, प्रश्न नको, मुद्दे नको आणि चर्चा नको. सरकारी वकील जे म्हणतील त्याला फक्त हो म्हणायचं. असा खटला चालला असता तर तो नक्कीच २-३ महिन्यात संपला असता. आणि सरकारला कसाबला त्याचे कायदेशीर हक्क मिअल्वून दिल्याचं समाधान आणि कसाबच्या वकिलाला देशाशी इमान राखल्याचं समाधान. !!

  ReplyDelete
 15. आम्हीं सहिष्णू आहोत... काय करायचे बाबा... एक गाल झाला दुसरा झाला... पाठ-पोट-हात-पाय...काही काळजी नको... तुम्ही आम्हांला मारत राहा आम्ही खटले चालवू... मग लहान वय म्हणून विचार करू... तुम्ही आमची लहान लहान बाळे तोवर मारत राहा... सरकारी खर्चाने पोसू- वकीलही देऊच...सगळे कसे कायद्याच्या चौकटीत राहूनच होईल... काळजीच नको.... तोवर तुम्ही कोणाचे अपहरण करून कसाबला सोडवता येईल ह्याची चर्चा करा.... अरे कोणीतरी त्या कसाबला तुरूंगातून रातोरात पळवा अन गेटवेला उलटा टांगा रे... आक्रोश, तळतळाट सारे करून डोळ्यांना भेगा पडल्यात आता ही नाटके बंद करा.कोणीतरी तरी न्याय करा...त्या हकनाक गेलेल्या जीवांचा व आज दिड वर्ष चाललेल्या या छ्ळाचा अंत करा. सहन होत नाही आता.

  ReplyDelete
 16. Gele kityek diwas kasab chya khatachyache he naatak paahun jeev tutat hotaa... kharetar tyachyawar khatala chalavane mhanaje hya hallyat bali gelelyachi kroor thattach aahe... To parakiy aakramak hotaa, aapalyaa deshawar hall karayachya drushtine aalelaa... tyane kaahi deshachya antargat kayadyanche ullanghan kele navhate ki tyachya war khatala chalvun tyala tyache kayadeshir hakk milvun dyavet....
  Lajjaspad aahe re he sagale....

  ReplyDelete
 17. @bhanas, kharach sagale disgusting aahe.
  "अरे कोणीतरी त्या कसाबला तुरूंगातून रातोरात पळवा अन गेटवेला उलटा टांगा रे... ' +1

  ReplyDelete
 18. आता खरच डोक्यावरून पाणी जातंय (आधीही जात होत)..
  खरच अस वाटतंय ना त्या हरामखोराला तुरुंगात घुसून गोळ्या घालाव्यात.
  जे होईल ते पाहून घेऊ.जास्तीत जास्त काय होणार अटक नंतर खटला मग काय.....

  ReplyDelete
 19. गपचुप मारलं पाहिजे यांना.
  खटला उभा करायचा, एकदोनका कोर्टात न्यायचा
  नंतर खतम. केस चालू आहे सांगायचं फक्त...
  मीडियापण साला नको तिथं घालतो कॅमेरे :(

  ReplyDelete
 20. विपर्यास कसा पहा, कायदे व्यवस्था इतरत्र बेधडक धुडकावून लावून सर्रास भ्रष्टाचार चालू आहे. पण अतिरेक्यांना शिक्षा देताना मात्र सर्व नियम पाळणार आम्ही. पाठीचा कणाच मोडला आहे तर करणार काय?

  ReplyDelete
 21. आपल्याकडील न्यायव्यवस्था गतिशील नाही, कसबाला फाशीची शिक्षा झाली खरी ,पण प्रत्यक्षात फाशी लवकर होणे कठीण , ,सरकारची पावले खंबीर असावी आता परीक्षा खरी गृहखात्याची आहे,

  ReplyDelete
 22. kasabala fashichi shiksha zali he vachalyavar mala agadi vatale hote ki tuzi hya baddal ek post nakki yeil. tya kasabala pakadalyavar lagech tyane sangitale hote ki tyana training kuthe dile, kase dile tyancha plan kasa tayar zala. he tyane kabul kele hote tevhach tyala shiksha vhayala havi hoti aani tyala jithe training milale te udavayala have hote.
  aata tyala shiksha zali khari pan tyane sangitalele training centre che kay tithe ajun anek kasab tayar hot asatil.

  ReplyDelete
 23. मला तुझी दया/कीव येते. **टा काहीही बदल होणार नाही हे माहीत असून दरवेळी तू असं तिडिकीने लिहतोस आणि आम्हाला झक मारुन वाचवं लागतं. आपण षंढ आहोत हे विसरायचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो त्याला खीळ बसते. एवढी कल्पनाविलास रंगवत बसायची खाज आहे तर जरा चांगल्या विषयावर लिही की, नेहमी आपल्या न्याय व्यवस्थेचे दळभद्रि विषय कशाला निवडायला हवे?
  आपलेच भारतीय दूतावासातले लोकं पाकिस्तानसाठी काम करतात त्याचे काही नाही आणि कसाबने आपल्या स्व:ताच्या देशासाठी काम केले तर त्याला फाशी? हा कुठला न्याय? आत्ता आपल्या हिजडया देशात कसाब सारखे तरुण नाहीत ही आपली नामर्दानगी आहे. मी तर म्हणतो कसाबकडे मानवतेच्या नजरेतून पाहिलं पाहिजे. लग्न लावून द्या त्याचं आणि त्याची पोरं पोसत बसा. हीच आपल्याला योग्य शिक्षा आहे. आणि जरी त्याला फाशी द्यायची वेळ आली तर कुणी आहे का ते काम करायला? कुणाच्या **त दम आहे इतका? हे वाच. http://news.rediff.com/report/2010/may/06/anniversary-26-11-who-will-hang-ajmal-kasab.htm

  ReplyDelete
 24. अरे भाऊ,
  त्या अफझलखानाची कबर जिथे सरकारकडून प्राणपणाने रक्षिली जाते, तिथे अफझल काय नी कसाब काय?

  ReplyDelete
 25. Kalaji nasawi Heramb.. are special court kadhatil hey Atirekyansathi thodya diwasanni .. karan hey lok asach atirekyanchya wadhila hatbhar lawat rahnar... mag kay khup sare atireki .. aani khup sare khatale...warshanu warsha chalaliy aapali dhakalgadi.....

  ReplyDelete
 26. श्रीताई, हा तळतळाट, या हाका, हा आक्रोश ज्यांनी ऐकला पाहिजे ते उलट कसाबच्या बाबतीत कसा न्याय झाला, त्याला त्याचा न्यायाचा अधिकार कसा मिळाला (I'm glad that Kasab is getting a fair trial : इति चिदुभाऊ), आम्ही कोर्टात ६०० साक्षीदारांच्या साक्षी कशा घेतल्या याचे गोडवे गाण्यातच मग्न आहेत.. त्या गोंगाटात हा आपला तळतळाट त्यांच्या कानावर जाणं या जन्मी तरी शक्य नाही.

  >> अरे कोणीतरी त्या कसाबला तुरूंगातून रातोरात पळवा अन गेटवेला उलटा टांगा रे...

  अगदी अगदी सहमत !!!!!!

  ReplyDelete
 27. >> To parakiy aakramak hotaa, aapalyaa deshawar hall karayachya drushtine aalelaa... tyane kaahi deshachya antargat kayadyanche ullanghan kele navhate ki tyachya war khatala chalvun tyala tyache kayadeshir hakk milvun dyavet....

  अगदी बरोबर मैथिली !!!! हाच तर मुद्दा आहे. एवढा साधा, सोपा, बेसिक मुद्दा या महान वकील/न्यायाधीश/सरकार यांच्या सुजलेल्या मेंदूत कसा शिरत नाही हाच प्रश्न आहे. कसाब हा देशद्रोही नाही (उलट पाकिस्तानच्या दृष्टीने देशप्रेमीच आहे) कारण तो आपल्या देशाचा नागरिक नाही. तो सरळ सरळ आपला शत्रू, वैरी, हेर (काय वाटेल ते म्हणा) आहे. त्याला कायदेशीर हक्क द्यायला आपण बांधील नाही. त्याला शत्रूसारखीच वागणूक मिळाली पाहिजे. पण हे जेव्हा या मुर्दाड कायदेपंडितांना कळेल तो भारतासाठी सुदिन !!!

  ReplyDelete
 28. सागर, खरंय. खरंच झाला पाहिजे असा हल्ला. पण एक माहित्ये का.. अशा हल्यात जो पकडला जाईल त्याच्यावर रातोरात खटला चालवून दोन दिवसात फाशीची शिक्षा देतील हे बाजारबुणगे !!!

  ReplyDelete
 29. नचिकेत, अरे गुपचूप कशाला.. उलट सगळ्यांसमोर भर चौकात हालहाल करून मारलं पाहिजे. कळूदेत त्याच्या बॉस लोकांना की पुन्हा असे हल्ले केलेत तर कसं कुत्र्याच्या मौतीने मारू आम्ही तुमच्या लोकांना ते. जाऊदे बास झालं स्वप्नरंजन !!! :(

  ReplyDelete
 30. निरंजन, तेचतर दुर्दैव आहे!! सगळे कायदे, नियम सोयीस्करपणे वापरायचे, वाकवायचे.. जे हल्ल्यात मारले गेले, शहीद झाले त्यांच्या न्याय्य हक्कांविषयी काय याबद्दल कोणीच काही बोलायला तयार नाही :(

  ReplyDelete
 31. काका, आपल्याकडच्या न्यायव्यवस्थेच्या गतीला कूर्मगती म्हणायलाही जीवावर येतं. गृहखातं काय नवीन करणार आहे? जे अफझल गुरुच्या बाबतीत केलं तेच पुन्हा करणार. आता चिदंबरम ओरडत सुटेल की कसाबचा नंबर तिसावा आहे. तोवर आम्ही त्याला फाशी देऊ शकत नाही !!!

  ReplyDelete
 32. हेमाली, खरंय ग. या एका कसाबला दोषी ठरवून फाशीची शिक्षा देताना (अंमलात आणताना नव्हे) नाकी नउ आलेत यांच्या. अजून कसाब तयार करण्याच्या त्या कारखान्यांमधून अजून कित्येक कसाब तयार झाले असतील आणि भारतात येऊन दाखलही झाले असतील.

  जोवर हे लोक किंवा त्यांच्या घरातले/नातेवाईक असे किडा मुंग्यांसारखे मरत नाहीत तोवर यांना नाही शुद्ध येणार !! (त्यांच्या घरातले किडा मुंग्यांसारखे मरावेत अशी अभद्र इच्छा नाही फक्त उदाहरण म्हणून सांगितलं.)

  आपल्या हातात काही नाही. आपण असंच जीव मुठीत धरून जगायचं.. !!

  ReplyDelete
 33. सिद्धार्थ, त्या लिंकमधला हा उतारा वाचला आणि त्या सो कॉल्ड ऑफिशियल पर्सनच्या नरडीचा घोट घेण्यासाठी काय प्रक्रिया आहे याचा विचार करावासा वाटायला लागला. कदाचित त्यालाही कसाबबरोबर फाशी देता येईल का देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली असा विचार करायला लागलो. हा षंढपणाचा कळस आहे. आणि आपल्या कायद्यात हे असं लिहिलं असेल तर मी उघडउघड लोकशाही/कायदेप्रक्रिया यांचा निषेध करतो. !!!

  "It is a tough job, officials point out, as there can be no room for error. "Right from preparing the noose to pulling the lever, utmost care has to be taken. The noose cannot be too tight since the convict should not feel any pain. There is a specific manner in which the noose has to be knotted for this purpose. The manner in which the noose is knotted depends on the weight of the person. The lever cannot be pulled very hard as it may severe the head of the person from the body," explained the officials."

  ReplyDelete
 34. खरंय विद्याधर, शिवरायांचा वारसा सांगायची काय त्यांचं साधं नावही उच्चारायची लायकी नाही या घुबडांची !! त्या अफझुल्ल्याच्या कबरीशेजारीच यांचंही दफन केलं पाहिजे. मारा हव्या तेवढ्या गप्पा आतल्या आत !!

  ReplyDelete
 35. लीना, खरंच. या देशात स्पेशल ट्रीटमेंट हवी असेल तर तुम्ही गांधीटोपीतले खादीधारी बगळे तरी हवेत नाहीतर मग अतिरेकी तरी. या दोघांचाच विशेष मान राखला जातो आपल्याकडे. बाकी सामान्य माणूस मेला किडामुंग्यांसारखा तरी यांना काय फरक पडतोय. शंभर मेले तर पुढचे हजार तयार आहेतच मरायला.. :(

  ReplyDelete
 36. अरे ह्या च्यूदूच्या लुंगीला आग लावा रे.
  http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5903570.cms

  एकदा का भारतीय म्हणून जन्माला आलं की उरलेल्या आयुष्यात त्याहून लाजीर् वाणी घटना घडण्याची वेगळी गरज नाही.

  ReplyDelete
 37. अरे तो चिदु नतद्रष्टच आहे. वाचलं मी हे काल. आधी त्याने ही मुक्ताफळं उधळलीच होती. त्यामुळे ही नवीन मुक्ताफळं वाचून विशेष आश्चर्य वाटलं नाही. या सगळ्यांच्याचा मापाचे फाशीचे दोर बनवण्याची वेळ आली आहे. !!!

  ही आधीच मुक्ताफळं इथे वाच.

  http://www.hindustantimes.com/newdelhi/Proud-that-even-Kasab-is-getting-fair-trial-Chidambaram/506385/H1-Article1-506476.aspx

  ReplyDelete
 38. उडवा रे या %#&ला कोणी तरी......

  ReplyDelete
 39. सागर, उडवलाच पाहिजे त्याला. पण त्याला जो उडवेल त्याला मात्र आठ दिवसात फासावर लटकावेल आपलं सरकार आणि न्यायालय :(

  ReplyDelete
 40. अगदी असेच होईल.... जिथे हवी तिथे शेपूट आत आणि नको तिथे... ही मुक्ताफळे म्हणजे चिघळलेल्या जखमांवर अजून घाव...उद्या म्हणेल भारतावर इतके हल्ले होतात हेच किती गर्वाचे लक्षण आहे... वाचवत नाही आता...

  ReplyDelete
 41. श्रीताई, हेच तर दुर्दैव आहे ना आपलं :( .. मला तर वाटतं त्या कसाबबरोबरच देशद्रोही विधानं या सगळ्या असल्या हलकटांनाही फासावर लटकवलं पाहिजे. पण शक्य नाही ते कारण कसाबला अजून ५० वर्षं तरी फाशी होत नाही :(

  ReplyDelete
 42. जाऊ दे... मी काही बोलतच नाही... माझ्या सर्व शिक्षा तूला ठावूक आहेतच...

  आणि सिद्धार्थ काही दिवसांपुर्वीच ७२ वर्षाच्या एका निवृत्त जल्लादाने कसाबला फाशी देण्याचे काम मला सोपा असे निवेदन सरकारला दिले आहे... तशी तयारी सुद्धा ते करत आहेत...

  ReplyDelete
 43. हो रे चौरंग, टकमक टोक, हत्तीच्या पायी, तोफेच्या तोंडी देणे याच शिक्षा हव्यात.... !!!!!!!

  ही ७२ वर्षांच्या जल्लादाविषयीची बातमी माहित नव्हती रे.. पण पुढे काही झालं का?

  ReplyDelete
 44. लेख आवडला. मतं पटली. प्रतिक्रिया देण्याची इच्छा आहे, पण देणार नाही. कारण देऊन काही फायदा नाही. दर वेळी असं काहीतरी वाचल्यावर माझं रक्त गरम होतं, पण काही फायदा नाही! आपल्या राज्यकर्त्यांच्या षंढपणाच्या बातम्या दुसर्‍याच दिवशी वाचायला मिळतात. आणि मग आणखी धुसफूस होते. हे गुन्हेगार आणि राजकारणी वृद्धापकाळाने आणि आपल्यासारखी तथाकथित सभ्य, पांढरपेशी माणसं आतल्या आत धुमसून, ब्लड प्रेशर वाढून, हार्ट ट्रबलनेच मरणार!!!!!

  ReplyDelete
 45. खरंय रे.. म्हणून मी पण हल्ली या विषयांवर लिहिणं जरा कमीच केलंय. काहीही होत नाही.. आपण फक्त आपलं रक्त आटवत राहतो !

  >> हे गुन्हेगार आणि राजकारणी वृद्धापकाळाने आणि आपल्यासारखी तथाकथित सभ्य, पांढरपेशी माणसं आतल्या आत धुमसून, ब्लड प्रेशर वाढून, हार्ट ट्रबलनेच मरणार!!!!!

  १०१% सहमत.. दुर्दैवाने :(

  ReplyDelete