Thursday, May 27, 2010

कंटाळा पुराण - तृतीयोध्याय

काही कारणांनी ग्रंथालयात जाऊन जुन्या पोथ्या, पुराणं चाळण्याचा योग नुकताच आला. चाळता चाळता अचानक या जिव्हाळ्याच्या विषयावरचं पुराण नजरेस पडलं. पुराणाचं नाव होतं "कंटाळा पुराण" !!! आपल्या एवढ्या आवडीच्या विषयावर एखादं पुस्तक आणि तेही चक्क पुराण असेल याची तोवर कल्पनाही नव्हती. थोडक्यात "पुराणकाळीही लोक कंटाळत असत तर".. !! या कल्पनेने जेवढं हायसं वाटलं तेवढाच आनंदही झाला. हे पुराण निश्चित कधी लिहिलं गेलं असावं हे स्पष्ट होत नाही. परंतु काही उल्लेखांवरून ते फार तर पाचशे-सहाशे वर्षांपूर्वीचं असावं असा अंदाज बांधता येतो. गंमतीचा भाग म्हणजे या पुराणाचा फक्त 'तिसरा अध्याय'च उपलब्ध आहे असं कळलं. अधिक चौकशीनंतर याचा हा एवढा एकच अध्याय लिहिला गेला असून त्याच्या 'मागे-पुढे' काही नाही अशी मौलिक माहितीही मिळाली.

या पुराणात त्यावेळच्या समाजातल्या ढोंगीपणावर, अन्यायावर, खोटेपणावर कडक ताशेरे ओढण्यात आले आहेत. अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यात आली आहे. कोणीही कुठलेही उच्च-नीच असे भेद मानण्याचे कारण नाही कारण सर्वांच्या हृदयी 'तो'च वसत असतो असा महान संदेश स्पष्ट शब्दांत देण्यात आला आहे. तो आश्चर्यकारकरित्या आपल्या आजच्या समाजाला आणि आपल्या अनेक अपसमजांना चपखलपणे लागू होताना पाहून मती कुंठीत होते. अर्थात एवढं उच्च दर्जाचं, प्रबोधनपर लेखन असूनही आपल्या आद्य धर्मग्रंथांत, वेद/पुराणात या पुराणाला स्थान कसे दिले गेले नाही याचे राहून राहून आश्चर्य वाटते. जाणकारांच्या मते वेद, पुराण हे 'अपौरुषेय' आहेत म्हणजेच ते कुठल्याही व्यक्तीच्या तोंडून जन्माला आलेले नसून प्रत्यक्ष भगवंताच्या तोंडून जन्माला आले आहेत. त्यामुळे ते अपौरुषेय आहेत. तो नियम या 'कंटाळा पुराणा'ला लागू केला असता ते अपौरुषेय या व्याख्येत बसत नाही. परंतु टीकाकारांच्या मते 'अपौरुषेय' चा हा नियम ही फक्त एक पळवाट आहे. तेव्हाच्या समाजाचं तंतोतंत चित्रण आणि रुढी, परंपरा, विषमता यांच्यावर चढवलेला हल्ला सहन न झाल्याने या ग्रंथाला धर्मग्रंथाचा दर्जा दिला गेला नाही.

खरे खोटे कंटाळेश्वर जाणे. आपण थेट 'कंटाळा पुराण' काय आहे ते प्रत्यक्षच बघू.

----------------------

|| आद्य कंटाळेश्वर प्रसन्न ||

कंटाळा पुराण - तृतीयोध्याय

"कंटाळा पुराण - तृतीयोध्याय" असे वदल्याने संभ्रमित होणे नसे. आम्ही यापूर्वीच लेखनास आरंभ करण्याचा विचार केलेल्या प्रथमोध्यायाचा अतीव कंटाळ्यामुळे प्रत्यक्षात प्रारंभ झालाच नाही. द्वितीयोध्यायाचा आरंभ करून केवळ '|| आद्य' अतःपर लेखणीतून उतरवून झाल्यावर त्या अपरंपार कंटाळ्याने आम्हास  द्वितीयोध्याय लिहिण्यापासून रोखले. अंतिमतः आवश्यक शारीरिक आणि मानसिक बळ संग्रहित करून निग्रहाने तृतीयोध्याय प्रसवण्याचे अंत:करणी ठसविले. हे 'कंटाळा पुराण' त्या आद्य कंटाळेश्वराच्या चरणी सादर...

म्हणती कंटाळा | जीवाचा हा चाळा |
त्याजला जिव्हाळा | लावू नये ||१||

करेल तो घात | सोडा त्याची साथ |
देई त्याला मात | तोचि स्वामी ||२||

भावार्थ : (किंचित का होईना कं चा अंमल असल्याने दोन्ही श्लोकांचे भावार्थ एकत्रित देत आहोत !!) आजच्या जगात सदैव कंटाळ्यास आणि कंटाळणार्‍यांस नाही नाही ते बोलून, त्यांचा उपमर्द करून, त्यांना कंटाळ्यापासून फारकत घेण्याचे सुचवले जाते. त्याविषयी हे वरील दोन श्लोक आहेत. 

कोणी म्हणो काही | कं जात नाही |
तो वसो राही | अंतर्यामी ||३||

भावार्थ : अशा लोकांना उद्देशून महाराजांनी 'कोणी म्हणो काही | कं जात नाही |' असे ठामपणे सांगितले आहे.

अशा लोकांना उद्देशून महाराजांनी पुढील श्लोकांमध्ये अधिक विस्ताराने लिहून एकेका मुद्द्याचा व्यवस्थित परामर्श घेतला आहे. महाराजांचे एकच सांगणे आहे. "आळस, वीट आणि त्याचे इतर अनेक सुहृद ही कंटाळ्याचीच अपत्ये आहेत. आणि यातले कुठले ना कुठले अपत्य हे प्रत्येक प्राणीमात्रात अंशरुपाने का होईना आढळतेच. त्यामुळे निव्वळ कंटाळ्यावर आणि कंटाळणार्‍यांवर टीका करण्यात काहीच हशील नाही की त्यात कुठलाही पुरुषार्थ नाही."


आठवा 'आळस' | कंटाळ्याचा भास |
देई अर्थ खास | कंटाळ्याला ||४||

कंटाळ्या ऐवजी | येई मुखामाजी |
खरा खरा आजि | 'वीट' आला ||५||

कधी म्हणो जातो | 'वैताग'च येतो |
अर्थ उमटतो | कंटाळ्याचा ||६||

हिंदीचिया मुखी | येते सुखासुखी |
देतो जेव्हा हाकी | "'पक' गया यार" ||७||

कधी कंटाळ्याचे | वाजती पडघम |
म्हणती 'बोरडम' | आंग्ल भाषी ||८||

म्हणे सत्यवान | 'कं' महान |
त्याचीच तहान | लागो राहे ||९||

भावार्थ : घसा दाटून आल्याने आणि भावनांचा कल्लोळ उफाळल्याने आणि मुख्य म्हणजे वरील श्लोकांचा भावार्थ समजावून सांगून महाराजांचा उपमर्द करण्याची इच्छा नसल्याने येथेच विरमतो. 

असा हा महान 'कं' आचंद्रसूर्य नांदो !!

26 comments:

 1. लय झ्याक !

  ReplyDelete
 2. हा हा हा.. श्लोक लय भारी. आज्याबात कंटाळा न करता पाठ करायलाच हवेत ;-)

  ReplyDelete
 3. व्वा!! श्लोक वाचून खल्लास झालो..पुन्हा बार भरला
  ठोठोठोठोठोठोठोठो...........

  ReplyDelete
 4. फक्त वाचन. कमेंट/टायपिंग चा द्यायचा कं.

  ReplyDelete
 5. lay bharriii.....
  No words to explain....
  Jay Kantaladhish baba Satyavaan...!!!

  ReplyDelete
 6. अरे होमपीच की हे आपले... धरुन फट्याक एकदम... :)

  कंटाळेश्वर कंटाळदास स्वामी आता तूम्ही कंटाळ्बोध लिहाच... अनेक भरकटलेले जीव कंटाळा पंथाला सुखाने लागतील मग...

  कसला जबरी श्लोक आहे हेरंबा मानले तूला!!!

  ReplyDelete
 7. ॐ कंटाळमदः, कंटाळमिदं, कंटाळात कंटाळमुदच्यते।
  कंटाळस्य कंटाळमादाय, कंटाळमेवावशिष्यते॥

  ह्या श्लोकात कंटाळाच्या ऐवजी कंसही चालेल...थोडक्यात काहीही चालेल...म्हणूनच मला वाटतं हा श्लोक 'पूर्ण' आहे! मानलं आपल्या ऋषीमुनींना! आणि ऑफकोर्स तुझ्या लेखाला!

  ReplyDelete
 8. लय भारी. ajun kai ^C cha pan kan .....:)

  Aparna

  ReplyDelete
 9. आनंद, पाठ नाही झाले तरी चालतील.. आपण तर जगतो ते श्लोक :)

  ReplyDelete
 10. भारत, ठोठोठोठोठोठोठोठो उर्फ गडगडाटी धन्यु !!

  ReplyDelete
 11. सचिन, कं म्हणता म्हणता त्यामानाने बरंच टंकलास की :)

  ReplyDelete
 12. धन्स मैथिली.

  >> No words to explain <<

  No words च्या ऐवजी Not worth टाकलंस तरी काही हरकत नाय ;)

  ReplyDelete
 13. अग म्हणून तर मी नेहमी होम पीचवरच बॅटिंग करतो. यॉर्कर, बॉडीलाईन काहीही आले तरी सीमापार करता येतात ;)

  कंटाळबोध... हा हा आयडियेची कल्पना चांगली आहे. पण तूही कं पंथातलीच आहेस हे विसरू नकोस. तूच सुरुवात कर कंटाळबोध लिहायला.. किंवा आपल्या दोघांतला जो कोणी आधी कं चा (तात्पुरता) त्याग करेल तो लिहायला कंटाळबोध घेईल.. कस्से ?? ;)

  ReplyDelete
 14. हा हा धन्स.. बाबा.. !!! कसला श्लोक टाकला आहेस !! कंटाळबोध लिहिण्यात मदत करू शकणारा अजून एक कंटाळपंथी गवसला आपल्या रुपाने. ;)

  ReplyDelete
 15. धन्यु अपर्णा..

  >> ^C cha pan kan <<

  वा वा.. कंटाळपंथ: वर्धिष्णू !!!

  ReplyDelete
 16. फार कंटाळवाणी झालीये पोस्ट.... :P

  ReplyDelete
 17. सागरा, म्हणजे कं पंथ वाढवण्याचा हेतू सफल झाला तर. :)

  ReplyDelete
 18. हेरंबा, मस्तच रे! आत्ताच ऐकल्याने मला अजूनच मजा आली. बाकी ’कं’ ची लागण वाढतेयं. कं,कंटाळ्याचा व कं,कंसाचाही... हा हा...

  ReplyDelete
 19. लई भारी ,सुंदर

  ReplyDelete
 20. हा हा श्रीताई.. दोन्ही कं ची लागण चांगलीच वाढते आहे :)

  ReplyDelete
 21. एकदम मस्त भिडु...हयासाठी माझ्यासारख्या समस्त ’कं’ बाधीत लोकांतर्फ़े मन:पुर्वक आभार... :)

  ReplyDelete
 22. हा हा.. आपण सारेच 'कं' पंथी !!

  ReplyDelete
 23. ले खू छा आ, प पू श लि कं आ अ ही अ प्र...

  ReplyDelete