Thursday, September 23, 2010

फॅरनहीट, लुज चेंज, कॉन्स्पिरसी थिअर्‍या इत्यादी इत्यादी

हे वाचन, नेट.. माहितीचा खजिना... अनेक उलटसुलट मतं.. अनेक सत्य, अनेक दावे, अनेक भास, अनेक अफवा.. अनेक मतमतांतरं.. साले सगळे संदर्भच बदलून जातात.. पण आपलेच.. अनेकांना हे संदर्भ इटसेल्फच नवीन असतात.. त्यांची पुसटशीही कल्पना नसते, जाणीव नसते.. अगदी आपण पूर्वी होतो तसेच म्हणजे उलटसुलट माहितीचा खजिना आणि ते सत्यच आहे हे छातीठोकपणे सांगणार्‍या अनेक माहितीस्त्रोत आपल्यासमोर सत्य उलगडून ठेवण्यापूर्वी होतो तसेच.. अगदी तसेच..

मी 'वर्ल्ड ट्रेड सेंटर' म्हणजे वर्ल्ड ट्रेड सेंटरची जागा पहिल्यांदा २००५ च्या ख्रिसमसमध्ये बघितली. जागा कसली अवाढव्य खड्डाच तो. चारी बाजूंनी भक्कम जाळीच्या भिंती उभारून बंद केलेला. प्रचंड खोदकाम चालू होतं. भल्यामोठ्ठ्या क्रेन्स, ट्रक्स अन् कायकाय होतं तिथे. स्वेटर्स, जॅकेटच्या चार लेयर घालूनही त्या प्रचंड थंडीत कुडकुडत कुडकुडत इतर टुरिस्टस (तेव्हा मी नवीन यॉर्कात नसल्याने मी ही टुरिस्टच होतो) सारखाच त्या जाळीतून कसाबसा डोकावून 'इथे पूर्वी वर्ल्ड ट्रेड सेंटर होतं' असं कॅप्शन टाकता येईल अशा टाईपचे फोटो काढण्यासाठी जीवाची धडपड करत होतो. त्यानंतर जवळच असलेल्या ९/११ च्या घटनेविषयी माहिती देणार्‍या एका छोट्या सेंटरमध्ये गेलो. तिथे त्यावेळचे फोटोज, प्रचंड धूर, धुरळा, रस्त्याने धावणारे न्यूयॉर्कर्स, धावपळ करणारे पोलीस आणि अग्निशमनदलाचे लोक असे अनेकानेक फोटो लावले होते. जवळच थोडक्यात घटनाक्रम मांडला होता. तो विराट खड्डा बघून जेवढी विषण्णता आली नाही तेवढी हे फोटो बघून आली. सत्तेच्या, अहंकाराच्या, धर्मांधतेच्या, द्वेषाच्या, सुडाच्या अनिवार वासनेपायी कित्येक निष्पापांनी आपले जीव गमावले होते.

दरम्यान मायकल मूरचा फॅरनहाईट ९/११ बघण्यात आला. तसा मी तो आधीही बघितला होताच. पण काही संदर्भ नीट कळले नव्हते. कदाचित आता प्रत्यक्ष त्या ठिकाणाला भेट देऊन आल्यावर, काही वाचन केल्याने बर्‍याच गोष्टी नीट स्पष्ट झाल्या असाव्यात. त्यानंतर काही दिवस तर ९/११ च्या कॉन्स्पिरसी संदर्भात माहिती शोधण्याचा मला छंदच जडून गेला.. छंद कसला व्यसनच. त्या एकूण प्रकाराबद्दल बरंच वाचन केलं, अनेक लिंक्स पालथ्या घातल्या. त्याच काळात 'लुज चेंज' बघण्याचा योग आला. 'लुज चेंज' ही २००५ ते २००९ च्या दरम्यान रिलीज झालेल्या शॉर्टफिल्म डॉक्युमेंटरीजची एक सिरीज आहे. ही ९/११ च्या घटनेमागचे अनेक संदर्भ सांगते, अनेक पुरावे देते. अत्त्युच्च सरकारी पातळीवर या घटनेची आखणी कशी केली गेली होती आणि ९/११ चे हल्ले हे ओसामा बिन लादेन किंवा अल कायदाच्या १९ अतिरेक्यांनी केले नसून स्वतः बुश प्रशासनानेच कसे केले होते याबद्दलचे अत्यंत धक्कादायक निष्कर्ष मांडते. ही शॉर्टफिल्म सर्वप्रथम २००५ मध्ये प्रदर्शित झाली, त्यानंतर थोडे अजून मुद्दे मांडून २००६ आणि २००७ पुन्हा प्रदर्शित करण्यात आली. प्रत्येक रिलीजमध्ये अजून काही नवीन मुद्दे मांडून आपण आधी काढलेल्या निष्कर्षाचा पुनरुच्चार ही सिरीज करते.

प्रत्येक गोष्टीला, घटनेला, इतकंच काय तर माणसांच्या वागण्यालाही दुसरी बाजू असते यावर माझा पूर्ण विश्वास आहे. पण या प्रकारातली दुसरी बाजू इतकी काळी असेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. अनेक उलगडे झाले, अनेक गूढं उकलली, अनेक खुलासे झाले, अनेक भ्रम निमाले. अर्थात प्रत्येक मोठ्या घटनेच्या काही कॉन्स्पिरसी थिअरीज असतातच. अनेक गुपितं उलगडल्याचे दावे केले जातात. ९/११ बद्दलची कॉन्स्पिरसी थिअरीही तशीच काहीशी. 9/11 conspiracy theory असं गुगल केलंत की ढिगाने साईट्स आणि व्हिडीओज मिळतील. पण हे खरं असेल तर मात्र आपल्यासारख्या सामान्य लोकांच्या सामान्य कल्पनांना जोरदार सुरुंग लागणार एवढं मात्र नक्की. खाली दिलेले व्हिडीओज बघा. मुख्यत्वे 'लुज चेंज' आणि 'ग्रुसम ट्रुथ' वाले.. हे दोन्हीही व्हिडीओज प्रत्येकी ७०-८० मिनिटांचे आहेत. पण मिनिटाला एकेक अशा वेगाने एकेक रहस्य उलगडत जातं. अनेक घटना, तेव्हाची स्थिती, नव्याने मांडल्या जातात किंवा त्यांच्याकडे बघण्याचा एक नवीन दृष्टीकोन दाखवला जातो. हे दोन्ही व्हिडीओज थोडे मोठे असले तरीही नक्की बघाच. तसंच या व्हिडीओजमध्ये आलेले काही अतिशय महत्वाचे मुद्दे मी खाली थोडक्यात देतोच आहे.

९११ लुज चेंज :लुज चेंज : फायनल कट :९११ ग्रुसम ट्रुथ (911 Gruesome Truth) : यात ९/११ च्या दरम्यान घडलेल्या अनेक संशयास्पद घटनांचा उहापोह केलेला आहे.
Controlled Demolition of WTC-7 : या व्हिडीओमध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटर-७ वाला टॉवर कसा पद्धतशीरपणे स्फोटकांच्या सहाय्याने (जसं कंट्रोल्ड डिमोलिशनमध्ये केलं जातं त्याप्रमाणे) पाडला गेला यावर भाष्य केलं आहे.Newton's laws temporarily suspended : या व्हिडीओमध्ये न्युटनच्या गतिविषयक नियमांना अनुसरून टॉवर्सचं पडणं हे नैसर्गिक नसून ते स्फोटकांच्या सहाय्यानेच कसे पाडले गेले याचं विश्लेषण आहे. व्हिडिओकर्त्यांच्या म्हणण्यानुसार टॉवर्सच्या पडण्याच्या संदर्भातल्या सरकारच्या स्पष्टीकरणावर विश्वास ठेवायचा झाल्यास न्युटनचे गतिविषयक नियम तात्पुरते का होईना रद्दबातल ठरवावे लागतात.या सगळ्या व्हिडीओज मध्ये मांडलेले महत्वाचे मुद्दे मी इथे संकलित करतो आहे. अर्थात या व्हिडीओजमध्ये नसलेले पण आत्तापर्यंत अनेक वेळा उपस्थित केले गेलेले इतरही अनेक मुद्दे आहेत. उदा.

१. अमेरिकन शस्त्रास्त्र कंपन्यांनी प्रचंड प्रमाणात शस्त्रनिर्मिती केली होती. आणि जर का ती शस्त्रास्त्र वापरली गेली नसती तर त्या कंपन्या डबघाईला आल्या असत्या. त्यामुळे मुद्दामच हा ९/११ चा हल्ला घडवला गेला जेणेकरून या हल्ल्यानंतर अमेरिका आपोआपच युद्ध करण्यासाठी प्रवृत्त झाली आणि अमेरिकन नागरिकांचाही सरकारच्या निर्णयाला पाठींबा मिळाला.

२. हल्ल्यानंतर होणार्‍या युद्धाच्या निमित्ताने आखाती देशांमधल्या तेलसाठ्यांवर अमेरिकेला कब्जा मिळवता आला.

३. युद्धानंतर अफगाणिस्तान, इराकमध्ये अमेरिकेच्या तालावर नाचणारं कठपुतळी सरकार स्थापन करण्यात आलं. जेणेकरून अमेरिकेचा त्या देशांवर पूर्ण कब्जा राहील.

४. युद्धसमाप्तीनंतर रस्तेबांधणी वगैरेंसारख्या विकासकामांची मोठमोठी कंत्राटं अमेरिकन कंपन्यांनाच मिळाली.

आता या व्हिडीओज मध्ये उल्लेखलेले महत्वाचे मुद्दे पाहू.

१. '९११ ग्रुसम ट्रुथ' वाल्या व्हिडीओनुसार हल्ला घडवला गेला तो अतिरेक्यांच्या मार्फत नव्हेच. कदाचित रिमोटच्या सहाय्याने विमानं चालवली गेली असावीत किंवा प्रवासी विमानांच्या ऐवजी कार्गो विमानं धडकावली गेली असावीत. पण काही झालं तरी सरकारने जाहीर केल्याप्रमाणे १९ मुस्लीम अतिरेक्यांनी ४ प्रवासी विमानांचं अपहरण करून ती या टॉवर्सन धडकावली हे दिशाभूल करणारं आहे. कारण ब्रिटीश प्रेसच्या न्यूजप्रमाणे त्या १९ अतिरेक्यांमधल्या तब्बल ७ छायाचित्रांशी साधर्म्य साधणारे स्थानिक तरुण पोलिसांना भेटले आणि त्यांच्या म्हणण्यानुसार "छायाचित्रात दाखवलेली व्यक्ती मी आहे. पण मी अतिरेकी नाही. मी सामान्य माणूस आहे. मी जिवंत आहे. माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही.".... पण त्यातल्या एकाही व्यक्तीची दाखल घेतली गेली नाही आणि हे प्रकरण सुरुवातीलाच दाबलं जाईल याची पुरेपूर खबरदारी घेतली गेली.

२. फिडेल कॅस्ट्रोला क्युबामधून निलंबित करण्यासाठी अमेरिकेने १९६० साली एक 'ऑपरेशन नॉर्थवूड्स' नावाची योजना आखली होती. त्या ऑपरेशनप्रमाणे

अ. वॉशिंग्टन डीसीवर बॉम्बहल्ले करून त्याचा आळ क्युबावर घ्यायचा.

आ. अमेरिकन सैनिकांनी क्युबन सैनिकांचे गणवेश परिधान करून 'ग्वांटानामो बे' येथल्या अमेरिकन नौदलाच्या तळावर (Naval base) हल्ला करायचा. जेणेकरून क्युबाशी युद्ध उकरून काढण्याचे अमेरिकेचे डावपेच यशस्वी होतील आणि अमेरिकन नागरिकही आपोआपच युद्धाला पाठींबा देतील.

३. तर या 'ऑपरेशन नॉर्थवूड्स'प्रमाणेच आत्ताही अफगाणिस्तान आणि इराकशी युद्ध करून तिथल्या तेलसाठ्यांवर कब्जे करणं आणि तिथे आपल्या मर्जीतली सरकारं स्थापणं हे अमेरिकेसाठी अत्यावश्यक झालं होतं. पण हे युध्द लादण्यासाठी तशीच काही सक्षम कारणं दाखवणं आवश्यक होतं. त्यामुळेच हा ९/११ चा घाट घातला गेला. नुसत्या अमेरिकन अर्थव्यवस्थेवरच नाही तर अमेरिकन सुरक्षायंत्रणेवरही हल्ला पुकारला गेला आहे असं दाखवणं आवश्यक होतं. त्यामुळे मग डब्ल्यू.टी.सी. बरोबरच पेंटागॉनवरही हल्ला केल्याचं भासवलं गेलं.

४. पण पेंटागॉनवर जसा हल्ला केला गेल्याचं सांगितलं जातं तसा हल्ला प्रत्यक्षात विमानाने करणं हे जवळपास अशक्य होतं. कारण

अ. पेंटागॉन हा अँण्ड्रयुज हवाई तळा (एअरफोर्स बेस) पासून फक्त १५ मैलांवर आहे. या हवाईतळावरील फायटर जेट्स वॉशिंग्टन डीसीला कुठल्याही प्रकारच्या हल्ल्यांपासून वाचवण्यासाठी सदैव पूर्णतः तयारीत असतात.

आ. पेंटागॉनच्या हवाईक्षेत्रात शिरणार्‍या कुठल्याही अनाहूत विमानावर थेट हल्ला होऊन ते क्षणार्धात नष्ट करण्यासाठीची यंत्रणा पेंटागॉनच्या बाहेर कार्यान्वित आहे.

इ. पेंटागॉनवर विमान धडकावणारा तथाकथित वैमानिक हानी हान्जोर हा अतिशय सामान्य दर्जाचा वैमानिक होता. ही माहिती त्याने जिथून विमान प्रशिक्षण घेतल्याचे पुरावे मिळाले आहेत त्या विमान प्रशिक्षण संस्थेकडूनच मिळाली. याच्यासारख्या सामान्य दर्जाच्या वैमानिकाला एवढं पद्धतशीरपणे आणि अचूकतेने पेंटागॉनवर विमान धडकायला जमणं हे सर्वस्वी अशक्य होतं. किंबहुना एखाद्या कसलेल्या वैमानिकासाठीही ही गोष्ट अतिशय अवघड होती.

ई. पेंटागॉनच्या भिंतीला पडलेलं भगदाड हे इतकं लहान आहे की तिथे विमानाने हल्ला झाला यावर विश्वास ठेवणं अशक्य आहे. विमानाने हल्ला झाला असता तर संपूर्ण भिंतच कोसळली असती.

या सर्व मुद्दयांचं तात्पर्य एकच की पेंटागॉनवर झालेला हल्ला हा विमानाने झालेला नव्हता तर मिसाईल्स वापरून करण्यात आला होता. किंबहुना अमेरिकेच्या स्वतःच्या फायटर जेटनेच हा मिसाईल हल्ला घडवून आणण्यात आला.

५. तज्ज्ञांच्या मते ट्विन टॉवर्समध्ये अनेक बोईंग विमानांचे हल्ले पचवूनही न कोसळता उभे राहण्याची क्षमता होती. त्यामुळे फक्त २ विमानांच्या हल्ल्याने एवढ्या बुलंद इमारती कोसळणं हे सर्वस्वी अशक्य होतं. थोडक्यात ट्विन टॉवर्स पाडण्यासाठी विमानं हे नुसतं दाखवण्याचं कारण आहे आणि ते पाडण्यामागचं खरं कारण म्हणजे टॉवर्सच्या आतून पेरली गेलेली असंख्य विस्फोटकं हेच आहे.

६. डब्ल्यूटीसी-७ च्या मागचं रहस्य तर फार मोठं आहे. ही ४७ मजली इमारत नॉर्थ आणि साउथ टॉवर्सपासून कमीत कमी ३०० फूट अंतरावर होती. हिला तर कुठलंही विमान वगैरेही येऊन धडकलं नव्हतं. तरीही अचानक संध्याकाळी आग लागून ही इमारतही पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे काही सेकंदात जमीनदोस्त झाली. या इमारतीत सीआयए, संरक्षण खातं, आय आर एस (टॅक्स डिपार्टमेंट), सिक्रेट सर्व्हिसेस (ज्यांच्यावर अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेची जवाबदारी असते) त्यांची कार्यालयं होती. तसंच या इमारतीत वॉलस्ट्रीटवरच्या अनेक कंपन्यांची चौकशी चालू होती. पण तरीही ही इमारत नक्की कशामुळे कोसळली हे नक्की कळलंच नाही. त्यामुळे याचं गुढ अजूनच जास्त आहे. या इमारतीच्या आजूबाजूच्या इमारती व्यवस्थित राहिल्या. मात्र ही इमारत सरळ खाली कोसळली. ती ही फक्त ६ सेकंदात. सरकारी स्पष्टीकरणाप्रमाणे ट्विन टॉवरच्या पडण्याने निर्माण झालेल्या प्रचंड उष्णतेमुळे या बिल्डिंगला आग लागून ती कोसळली. यावर या डॉक्युमेंटरीमध्ये जगभरातल्या इतर अनेक गगनचुंबी इमारतींची उदाहरणं दिली आहेत ज्यांना आगी लागल्या, आग अनेक मजल्यांमध्ये पसरली, आग विझवायला अनेक तास लागले पण तरीही त्यातली एकही इमारत कोसळली नाही. कोसळले ते फक्त ट्विन टॉवर्सच !!

७. तेरेसा वेलीझ नावाची ट्विन टॉवरमधल्या नॉर्थ टॉवरच्या ४७व्या मजल्यावर बसलेली कर्मचारी म्हणते "सगळीकडून स्फोटांचे प्रचंड आवाज येत होते. सर्वत्र बॉम्ब पेरलेत असं वाटत होतं आणि कोणीतरी अतिशय सुसूत्रतेने रिमोट च्या सहाय्याने त्या बॉम्बसचा स्फोट करत होतं."

८. ९:५९ ला साउथ टॉवर १० सेकंदात कोसळला. २९ मिनिटांनी नॉर्थ टॉवरही बरोबर १० सेकंदात सरळ खाली आला. ट्विन टॉवर्सला आग लागली तेव्हा सगळ्यात आधी तिकडे पोचले ते न्यूयॉर्क सिटीचे अग्निशमन दलाचे जवान. आग विझवण्याच्या प्रयत्नात असताना त्यांनाही तिथे बॉम्बसचे आवाज ऐकू आले. इमारत पाडण्याच्या दृष्टीनेच बॉम्बस पेरले होते असं त्यातल्या अनेकांनी खात्रीपूर्वक सांगितलं.

९/११ च्या काही महिने आधीच्या महत्वाच्या घडामोडी.

१. २४ ऑक्टोबर २००० : पेंटागॉनमध्ये दोन प्रशिक्षणांचा एक वर्ग घेतला गेला ज्यात बोईंग ७५७ चा हल्ला झाला तर तो कसा रोखायचा/परतवायचा याचं प्रात्यक्षिक दिलं गेलं. असा हल्ला लवकरच होऊ शकतो अशा शक्यताही वर्तवल्या गेल्या.

२. ४ जुलै २००१ : ओसामा बिन लादेनला दुबईमध्ये विशेष हॉस्पिटलमध्ये भरती करून त्याला ट्रीटमेंट दिली गेली. त्यासाठी तिथला संपूर्ण कर्मचारी वर्ग बदलला गेला. लादेनला भेटण्यासाठी सीआयएचे स्थानिक प्रमुख स्वतः तिथे गेले होते.

३. २४ जुलै २००१ : लॅरी सिल्व्हरस्टन या डब्ल्यूटीसी-७ च्या मालकाने ती इमारत ३.२ बिलियन डॉलर्सना (अंदाजे १५०० कोटी रुपये ) ९९ वर्षांसाठी भाडेपट्टीने दिली. तसंच त्या इमारतीचा अंदाजे तेवढ्याच किंमतीचा विमा उतरवला ज्यात अतिरेकी हल्ल्यांपासून होणार्‍या नुकसानाबद्दलच्या तरतुदीचा प्रामुख्याने अंतर्भाव होता.

४. ६ सप्टें २००१ : युनायटेड एअरलाईन्सच्या शेअरवर ३१५० 'पुट' ऑप्शन लावले गेले जे सर्वसामान्य दिवसाच्या तुलनेत चौपट अधिक होते. कुठल्याही कंपनीच्या समभागावर पुट ऑप्शन अशा वेळी लावला जातो ज्यावेळी तो समभाग कोसळणार अशी बाजाराची खात्री असते.

५. ७ सप्टें २००१ : बोईंग कंपनीच्या समभागावर २७२९४ 'पुट' ऑप्शन लावले गेले जे सर्वसामान्य दिवसाच्या तुलनेत पाचपट अधिक होते.

६. १० सप्टें २००१ : अमेरिकन एअरलाईन्सच्या समभागावर ४५१६ 'पुट' ऑप्शन लावले गेले जे सर्वसामान्य दिवसाच्या तुलनेत अकरापट अधिक होते.

(हल्ल्यांमध्ये वापरली गेलेली विमानं बोईंग कंपनीने बनवलेली आणि वरील दोन विमान कंपन्यांच्या मालकीची होती याला योगायोग मानणं हा भाबडेपणा ठरावा.)

७. १० सप्टें२००१ : पेंटागॉनमधल्या अनेक महत्वाच्या व्यक्तींनी आपली दुसर्‍या दिवशीची उड्डाणं रद्द केली.

८. १० सप्टें२००१ : सॅन फ्रान्सिस्कोचे मेयर विली ब्राउन यांनाही असाच एक फोन येऊन त्यात त्यांना दुसर्‍या दिवशीचं त्यांचं उड्डाण रद्द करण्यास फर्मावण्यात आलं होतं. कालांतराने तो फोन स्वतः कोंडोलिसा राईस (बुश प्रशासनाच्या तत्कालीन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार) यांनी केला असल्याचं उघडकीस आलं.

९. १० सप्टें २००१ : पाकिस्तानातल्या एका हॉस्पिटलमध्ये ओसामा बिन लादेन याला विशेष देखरेखीखाली काळजीपूर्वक ठेवण्यात आलं.

१०. अँण्ड्रयुज हवाईतळावरची अनेक फायटर जेट्स अलास्का आणि उत्तर कॅनडाला एका तथाकथित ऑपरेशन मिशनसाठी हलवण्यात आली.

११. पेंटागॉनपासून फक्त १५ मैलांवर असलेल्या याच अँण्ड्रयुज हवाईतळावरून अनेक विमानांच्या तुकड्या १८० नॉटीकल मैलांवर असलेल्या नॉर्थ कॅरोलायनाला एका तथाकथित प्रशिक्षण कार्यक्रमासाठी हलवल्या गेल्या. अशा तर्‍हेने फक्त चौदा विमानं पेंटागॉनच्या संरक्षणासाठी शिल्लक राहिली.

१२. पेंटागॉनवर कोसळलेलं विमान ज्या पद्धतीने धडकाल्याचं सांगितलं जातं अगदी त्याच पद्धतीने पण एक अतिशय छोटंसं विमान काही वर्षांपूर्वी कोसळलं होतं. त्यावेळी ते जमिनीवर कोसळताना आसपासच्या हिरवळीवर प्रचंड मोठ्या खुणा उमटल्या होत्या. तसेच आजूबाजूचे इलेक्ट्रिसिटीचे खांब उखडले गेले होते. पण त्या विमानापेक्षा कैक पटीने मोठं असूनही पेंटागॉनवर आदळलेल्या विमानाच्या बाबतीत असं काहीच घडलं नाही.

१३. पेंटागॉनवर बोईंग ७५७ कोसळलं असं सरकारतर्फे सांगितलं जात असलं तरीही कुठेही ७५७ सारख्या मोठ्या विमानाचे अवशेष सापडले नाहीत. त्यावर सरकारतर्फे असं स्पष्टीकरण दिलं गेलं की प्रचंड उष्णतेमुळे विमानाचे सर्व अवशेष वितळून गेले. क्षणभर या दाव्यावर विश्वास ठेवायचा म्हटला तरी जर त्या ठिकाणची उष्णता एखाद्या मोठ्या विमानाला वितळून टाकण्याएवढी अतिप्रखर होती तर मग फोरेन्सिक टीमला एकूण १८९ मृतांपैकी १८४ लोकांची प्रेतं कशी सापडली? एखाद्या जेटला वितळवून टाकण्याची क्षमता असणार्‍या उष्णतेत ती प्रेतं जळून खाक कशी झाली नाहीत?

१४. बोईंग विमानाचं इंजिन हे स्टील आणि टीटानियम पासून बनवलेलं असतं. त्यात प्रत्येकी ६ टनांची अशी दोन इंजिन्स असतात. तसंच त्या विमानांचं इंधन हे केरोसिनसदृश असतं.या दोघांचाहि मेल्टिंग पॉईंट २२०० डिग्रीच्या (फॅरनहाईट) वर आहेत. समजा या सगळ्या गोष्टी वितळून गेल्या असत्या तरी निदान या दोन प्रचंड अवाढव्य इंजिन्सचे अवशेषतरी नक्कीच मिळाले असतेच. याउलट एका अतिशय छोट्या विमानाच्या काही फुटी इंजिनाचे अवशेष सापडले. "ते अवशेष बोईंगचे नक्कीच नाहीत" असं बोईंगचं इंजिन बनवणार्‍या हनिवेल आणि रोल्सरॉईस कंपन्यांनी स्पष्टपणे सांगितलं.

१५. पेंटागॉनवर आदळलेल्या विमानाचे अवशेष पाहिले असता ते जे विमान धडकलं असं सांगितलं जातं त्यातल्या कुठल्याही भागांशी साधर्म्य सांगत नाहीत.

१६. पेंटागॉनचे कर्मचारी एक अजस्त्र वस्तू निळ्या आवरणाखाली झाकून नेताना दिसले. पण त्यात काय होतं याचा कधीच उलगडा झाला नाही.

१७. जर पेंटागॉनवर धडकलेलं विमान जागच्या जागी वितळून गेलं असेल तर ही जगाच्या उड्डाण इतिहासातली अशा स्वरुपाची पहिली घटना असेल. पेंटागॉनच्या बाहेरच्या संरक्षक भिंतीला एक १६ फुटाचं भगदाड पडलं. जर ७५७ सारखं एखादं १५५ फूट लांब, ४४ फूट उंच, १०० टन वजन असलेलं विमान जर ताशी ५३० मैलाच्या वेगाने येऊन धडकलं तर फक्त १६ फूटाचं भगदाड पडतं यावर कसा विश्वास ठेवायचा?

१८. पेंटागॉनवरच्या हल्ल्याच्या वेळी पेंटागॉनच्या वेस्ट साईडला काम करत असलेली एप्रिल गॅलप नावाची एक स्त्री खूप जखमी झाली. तिच्या म्हणण्यानुसार ती हॉस्पिटलमध्ये असताना सुटाबुटातले काही लोक तिला भेटायला येत असत. त्यांनी कधीही त्यांची नावं सांगितली नाहीत किंवा ते कुठल्या सरकारी खात्यात काम करतात तेही सांगितलं नाही. ते फक्त म्हणत असत की नुकसानभरपाई घे आणि तुझं तोंड बंद ठेव. तसंच ते सतत, वारंवार हेच म्हणत असत कि लक्षात ठेव पेंटागॉनवर जे आपटलं ते विमान होतं. ती पुढे म्हणते "पण मी तर तिथे विमान बघितलं नाही. एवढंच काय तर विमानाचे अवशेषही बघितले नाहीत. हे विमान प्रकरण निव्वळ लोकांची दिशाभूल करण्यासाठी पद्धतशीरपणे पसरवलं जातंय असं नक्की वाटतं."

१९. घटना घडल्यानंतर तिथे काम करणाऱ्या अनेकांना तिथे विस्फोटकसदृश वस्तूंचे वास आले.

२०. सरकारतर्फे पुरावा म्हणून प्रदर्शित केल्या गेलेल्या अधिकृत व्हिडीओमध्ये कुठेही बोईंग ७५७ आढळत नाही.

२२. हल्ल्याच्या पूर्वी चार दिवस जो पेंटागॉनचा एरियल व्ह्यू घेतला गेला होता त्यात पेंटागॉनच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेरच्या हिरवळीवर एक पांढरा मोठा पट्टा दिसतो. चार दिवसांनी बरोब्बर त्या पट्ट्याने आखलेल्या मार्गावरून येऊन विमान धडकलं.

२३. अतिप्रखर उष्णतेमुळे विमानांचे ब्लॅकबॉक्सेसही वितळून गेले/सापडले नाहीत असं सांगितलं जातं. परंतु अनेक प्रवाशांचे पासपोर्टस मात्र सापडले !!!!!!!!

२४. काही महिन्यांपासून मिळत असलेल्या बॉम्बच्या धमक्यांमुळे आणि अफवांमुळे ट्विन टॉवर्सचं सुरक्षा कार्यालय अधिक सजग होउन काम करत होतं. परंतु ११ सप्टेंबरच्या बरोब्बर चारच दिवस आधी तिथली सुरक्षा कमी केली गेली. तिथली श्वानपथकं इतरत्र हलवली गेली.

२५. १५ जुलै २००१ ला न्यूयॉर्कमधल्या चारशे फूट उंचीच्या दुसऱ्या महायुद्धाच्या काळातल्या दोन टाक्या कंट्रोल्ड डीमोलीशनच्या सहाय्याने पाडण्यात आल्या. स्थानिक नागरिकांनी अनेक तक्रारी करूनही त्याचं स्पष्टीकरण किंवा कारणही दिलं गेलं नाही किंवा ते कामही थांबवलं गेलं नाही. त्या का पाडल्या गेल्या याचं कारण कोणाला कधीच कळलं नाही. ती ११ सप्टेंबरची रंगीत तालीम होती का?


थोडक्यात :

१. ११ सप्टेंबरचा अमेरिकेवरचा हल्ला हा अतिरेकी हल्ला नसून बुश प्रशासनाने स्वतःच आखणी आणि अंमलबजावणी केलेला एक मोठ्ठा कट होता.

२. या हल्ल्यांमुळे अनेक संबंधितांनी आपापली उखळं पांढरी करून घेतली.

३. अमेरिकेचा इराक आणि अफगाणिस्तानवर हल्ला करण्याचा मार्ग मोकळा झाला आणि त्याला अमेरिकन नागरिकांच्या पाठिंब्याचं बळही मिळालं

४. अमेरिकेचं भवितव्य हातात असलेल्या लोकांनी हजारो निष्पाप जीव आणि करोडो डॉलर्सचा बळी देऊन स्वतःचे स्वार्थ आणि राजकीय लालसा पूर्ण केल्या.

ही आणि अशी अनेक धक्कादायक विधानं, मतं या व्हिडीओज मध्ये आहेत. व्हिडीओ बघून झाल्यावर डोकं अक्षरशः सुन्न होऊन जातं? खरंच हे असं झालं असेल का असं सारखं वाटत राहतं. अर्थात कुठल्या बाजूवर विश्वास ठेवायचा हे आपापल्या मर्जीवर आहे. कोणाला कुठली बाजू पटते हे ज्याच्या त्याच्या मनावर, दृष्टीकोनावर आहे. पुन्हा सांगतो. प्रत्येक गोष्टीला दुसरी बाजू ही असतेच. आणि एखादी गोष्ट खूप मोठ्या पातळीवर म्हणजे अनेक लोकांच्या जीवनावर परिणाम करणार्‍या पातळीवर घडलेली असेल ज्यात अनेक व्यक्ती, संपत्ती, स्वार्थ, सत्ता गुंतलेल्या असतील तर त्या गोष्टीतली दुसर्‍या बाजूला नेहमीच 'कॉन्स्पिरसी थिअरी'चं लेबल लागतं. आपल्या २६ नोव्हेंबरच्या मुंबई हल्ल्यांविषयी आणि करकरे, कामटे, साळसकर यांच्या मृत्यूबद्दलही अशीच एक 'कॉन्स्पिरसी थिअरी' सांगितली जातेच. अगदी अमेरिकेच्या 'मॅन ऑन मून' किंवा 'अपोलो-१३' बद्दलही अशाच थिअर्‍या आहेतच. कुठल्या बाजूवर विश्वास ठेवायचा हे ज्याचं त्याने ठरवायचं.

टीप : वर लिहिलेल्या मुद्द्यांपैकी एकही मत हे माझं नाही किंवा अर्थातच मी शोधलेलं नाही. पण जी वस्तुस्थिती म्हणून सांगून सर्वसामान्य माणसांची दिशाभूल केली जाते त्यापेक्षा ही दुसरी बाजू, त्यातले मुद्दे, ती मतं मला जास्त पटतात, जास्त जवळची वाटतात. म्हणून ते मांडण्याचा प्रयत्न केला. खरं तर ११ सप्टेंबरलाच पोस्ट टाकायचा प्रयत्न होता पण पोस्ट लिहिताना थोडी शोधाशोधी करताना असंख्य व्हिडीओ, साईट्स पुन्हा नव्याने सापडल्या आणि त्या बघून, त्यातले महत्वाचे मुद्दे टंकायला जास्त वेळ लागला.

60 comments:

 1. ह्म्म, नाईस वन !! काही महिन्यापुर्वी मी माझ्या मित्रासोबत हे सगळे व्हीडीओझ आणि वर्ल्ड ट्रेड टॉवर कॉन्स्पिरसी यावर बरच वाचलं आणि पाहिलं होतं,....

  त्याच वेळी प्रदर्शित झालेल्या डॉनी डार्को या चित्रपटात ही एक विमान एका बिल्डिंगमधे घुसते असे दाखवले होते....


  संकलन छान आहे !!

  ReplyDelete
 2. हेरंब अतिशय मेहनत करून पोस्ट लिहीलीस..
  मी जेंव्हा ही Documentary पहिली होती तेंव्हा असंख्य विचार डोक्यात आले होते...खरच का राजकीय लोक एवढ्या खालच्या पातळीवर जाऊ शकतात?
  हा हल्ला म्हणजे एक मोठे रहस्य आहे....

  ReplyDelete
 3. >>हेरंब अतिशय मेहनत करून पोस्ट लिहीलीस.. +१००
  अरे मी माझ्या एका मुस्लिम मित्राशी असाच बोलत होतो, तेव्हा त्यानं मला अशाच अनेकानेक कॉन्स्पिअरसी थिअर्‍या सांगितल्या. माझं डोकंच भणाणून गेलं होतं. तेव्हापासून मी ह्या विषयावर बोलणं टाळतो. पण आज तुझी पोस्ट वाचली आणि सगळे विचार परत ताजे जाहले! :)
  मस्त!

  ReplyDelete
 4. >>हेरंब अतिशय मेहनत करून पोस्ट लिहीलीस.. +१०००००००
  तेलसाठ्यासाठी हे सर्व झालं अशी कल्पना तर होतीच पण या पातळीवर हे असेल असं नव्हतं वाटलं.... अतिशय धक्कादायक.

  ReplyDelete
 5. तू खूप शोधाशोध केलेली दिसते आहेस. विषयच तसा आहे म्हणा. त्यांच्या ९/११ सारखीच आपल्या २६/११ लाही दुसरी बाजू आहेच.

  तुझ्या लेखातील :
  मुद्दा क्र. ७, १३ पहिल्यांदाच वाचते आहे. जबरदस्त धक्का बसला.
  मुद्दा क्र. १८ - एप्रिल गॅलप अजूनही जीवंत आहे का? सकाळी जॉगींगला वगैरे बाहेर पडल्यावर पुन्हा घरी आलीच नाही असं झालं नसेल, अशी आशा आहे.

  अमेरिकेच्या चंद्रावर स्वारीची सुद्धा दुसरी बाजू दाखवणारे व्हिडीओज उपलब्ध आहेत.

  वि.भि.प्रमाणेच मी सुद्धा वादग्रस्त विषयांवर बोलायचं टाळते. डोकं भणाणतं. थांबता येत नाही. म्हणूनच ’पडसाद’ ब्लॉगवर हल्ली फार काही लिहीत नाही.

  ReplyDelete
 6. >>अतिशय मेहनत करून पोस्ट लिहीलीय - धन्यवाद +१०००००००
  पोस्ट ऑफ द ईयर, म्हणेन मी तर... !

  ही एवढी माहिती माझ्या पहिल्यांदाच वाचनात आली... सुन्न झालो यार...कधी वेळ मिळाला तर "मुंबई" आणि "मुन ऑन मुन" वरही लिही...


  धन्स रे धन्स!

  ReplyDelete
 7. वा: जबरी....
  हेरंबचे या विषयावर पोस्ट लिहीणे सुद्धा एका कॉन्स्पिरसीचाच भाग आहे.. हे हे हे !!

  ReplyDelete
 8. प्रचलित आणि त्यामुळे शिळी झालेली जी कारणमीमांसा आहे त्यापेक्षा वेगळा (आणि अर्थात गुप्त आणि अधिक सनसनीखेज खुलासा म्हणून गाजेल असं) काहीतरी थीअराईझ करणं ही बेसिक ह्युमन टेन्डन्सी आहेच..अगदी फिजिक्स सारख्या मूलभूत शास्त्रातही हे दिसतं.

  झकास लिहिलं आहेस. बाबा प्रोफेटने लिहिल्या प्रमाणे नव्या नव्या खूप conspiracy theories दिसामांजी येतच आहेत. तोटा नसावा..

  ReplyDelete
 9. १ वर्षापुर्वी हे सगळं पाहीलं होतं...
  अमेरीकेची अर्थव्यवस्था यावरही एक डोक्युमेंटरी पाहीली आणि आपण का जगतोय असा प्रश्न पडू लागला...
  हे सगळं पटतं पण ते मासेस पर्यंत कसं पोहचणार??
  हे सगळं जरी खरं असलं तरी त्याच्यावर कुणीही काहीही करु शकत नाही...
  जगा...सत्याचा शोध घ्या.. स्वत: त्रास करुन घ्या.. मन खिन्न करा...
  फक्त जगा...

  ReplyDelete
 10. प्रचंड अभ्यास केला आहेस रे. खूप सार्‍या गोष्टी आत्ताच कळल्या. या आधी एका मित्राने ह्या मागे बुश प्रशासनाचा हात असलेल्या अश्याच वीडियोची लिंक पाठवलेली. हेच वीडियो असावेत पण ते पहाण्याचे पेशन्स नव्हते. पोस्ट मध्ये मांडलेले पेंटॉगॉन हल्ल्या वरचे मुद्दे पूर्ण पटतात. टिव्हीवर देखील जे दाखवले गेले होते त्यातून देखील पेंटॉगॉनवर बोईंग आदळल्याचे वाटत नाही.
  असो हे सगळं वाचून स्वता:च्या स्वार्थासाठी देशाला आणि निष्पाप नागरिकांना वेठीस धरणारे हरामी राजकारणी फक्त भारतातच आहेत ही शरमेची भावना जरा कमी झाली.

  ReplyDelete
 11. >>अतिशय मेहनत करून पोस्ट लिहीलीय +१

  खुप जबर्‍या पोस्ट आहे...

  >>हे सगळं जरी खरं असलं तरी त्याच्यावर कुणीही काहीही करु शकत नाही...
  जगा...सत्याचा शोध घ्या.. स्वत: त्रास करुन घ्या.. मन खिन्न करा...
  फक्त जगा..+१०००००

  ReplyDelete
 12. हया बद्दल हवेतच ऐकुन होतो.तु मेहनत घेउन एकदम डिटेलात समजावुन दिलस.अमेरिका हे करु शकते,अस मला तरी वाटते.धन्स रे...

  ReplyDelete
 13. हेरंब..गंमत अशी की आपण एकदा अशा थिअरीत घुसलो की हळूहळू आपली विचारशक्ती मेणासारखी वितळते. प्रतिप्रश्न बंद पडतात.

  सगळी चिकित्सा अति बोअरिंग ठरेल. म्हणून एकच तुकडा घेऊन पाहू.

  ४. ६ सप्टें २००१ : युनायटेड एअरलाईन्सच्या शेअरवर ३१५० 'पुट' ऑप्शन लावले गेले जे सर्वसामान्य दिवसाच्या तुलनेत चौपट अधिक होते. कुठल्याही कंपनीच्या समभागावर पुट ऑप्शन अशा वेळी लावला जातो ज्यावेळी तो समभाग कोसळणार अशी बाजाराची खात्री असते.

  ५. ७ सप्टें २००१ : बोईंग कंपनीच्या समभागावर २७२९४ 'पुट' ऑप्शन लावले गेले जे सर्वसामान्य दिवसाच्या तुलनेत पाचपट अधिक होते.

  ६. १० सप्टें २००१ : अमेरिकन एअरलाईन्सच्या समभागावर ४५१६ 'पुट' ऑप्शन लावले गेले जे सर्वसामान्य दिवसाच्या तुलनेत अकरापट अधिक होते.
  (हल्ल्यांमध्ये वापरली गेलेली विमानं बोईंग कंपनीने बनवलेली आणि वरील दोन विमान कंपन्यांच्या मालकीची होती याला योगायोग मानणं हा भाबडेपणा ठरावा.)


  एक. हे पुट ज्या संख्येने आहेत (पाचपट, अकरापट) असे इतके पट ते एरवी कितीदा वाढतात?
  इतर नॉन एव्हिएशन कंपन्यांच्या पुट ऑपशन्सची काय स्थिती होती. जनरल डिप्रेशन होते का?
  दोन. त्याउपर एक वस्तुस्थिती क्लीअर होतेय की खूप लोकांना खूप आधीच हा अंदाज आला होता. त्यातले अनेक युएस मार्केट मध्ये होते. "षड्यंत्र" हे चार आठ दिवस आधीपासूनच षटकर्णी नव्हे तर सहस्रकर्णी पसरलेले असताना ते "षड्यंत्र" म्हणून उभे राहून यशस्वी होऊच शकत नाही. आणि झालेच तर इतकी वर्षे लपून राहून अजूनही संदिग्ध राहू शकत नाही.

  असो. पण विषय मनोरंजक..आणि मांडलास खूप मस्त..

  ReplyDelete
 14. धक्कादायक नाही असं मी म्हणेन, कारण अमेरिकेच्या बाबतीत हे असं काहीही होऊ शकतं.
  मेहनत घेउन लिहिल्याबद्दल अभिनंदन.

  ReplyDelete
 15. हेरंब अतिशय मेहनत करून पोस्ट लिहीलीस. हे अगदी खरे

  असे तर्क काढायचे ठरले तर कोणत्याही गोष्टीत माणूस काढू शकतो.

  पण मला ते पटत नाही

  आपले ब्रीगेडीसुद्धा असाच काहीतरी 'वेगळ' मत मांडत असतात तेही 'पुरावे' देऊन त्यांच्यात आणि यात काही फरक वाटत नाही

  असो वाचनीय पोस्ट

  ReplyDelete
 16. हेरंबा अरे किती अभ्यास केलास रे....खरय पोस्ट ऑफ द ईयर!!
  मानलं तूला!!

  पुन्हा एकदा वाचावी लागणार आहे ही पोस्ट!!!

  ReplyDelete
 17. मेहनत व वाचन याची उत्तम सागड ,वाचनीय अप्रतिम सुंदर ,

  ReplyDelete
 18. आभार दीपक.. खरंच रे.. ही कॉन्स्पिरसी थेअरी बघितली की एकदम डोकं भणभणून जातं..

  हो आठवतोय मला तो डॉनी डार्को मधला प्रसंग..

  आणि हो ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत रहा ब्लॉगला

  ReplyDelete
 19. हो सागर.. बऱ्यापैकी वाचलं/पाहिलं या पोस्टसाठी.. त्यामुळे तर ११ दिवस उशीर झाला ना :) .. आणि एवढ्या खालच्या पातळीवर जर कोणी जाऊ शकत असेल तर ते म्हणजे फक्त राजकीय नेतेच.. बाकी कोणालाच जमणार नाही असली घाण करायला.. खरंच हा हल्ला म्हणजे एक खुप मोठं रहस्यच आहे.

  ReplyDelete
 20. आभार बाब्या.. वेळ गेला खरा पण मजा आली लिहिताना.. अरे जसा समाज तशा थिअर्‍या.. त्या समाजाबरहुकुम बदलत राहणार.. आपल्या (!!!) ब्रिगेडी लोकांचे ब्लॉग्स बघितले तर त्यांच्या तर एकेका अक्षरात एक भली मोठी थिअरी दडलेली असते ;)

  ReplyDelete
 21. आनंदा, मलाही सुरुवातीला फक्त तेलसाठ्यासाठीच सगळं झालं असंच वाटावं. (किंवा आपल्याला फक्त असंच वाटायला लावावं यामागेही त्यांची काहीतरी थिअरी असेल ;) ).. पण एकेक डॉक्युमेंटरीज बघत गेलो, वेबपेजेस वाचत गेलो आणि उडालोच.. तुला जमेल तेव्हा फॅरनहाईट आणि लुज चेंज नक्की नक्की बघ.. अजूनही चिक्कार मुद्दे मांडले आहेत त्यात.. मला काही सगळे मुद्दे देता आलेले नाहीत इथे.. आभार्स रे..

  ReplyDelete
 22. हो कांचन.. वर म्हटलं तसं शोधाशोध बरीच केली. पण फॅरनहाईट आणि लुज चेंज आधीच बघितले होते. लेख लिहिताना पुन्हा थोडक्यात बघावेत आणि मग ११ सप्टेंबरलाच लेख लिहावा असा विचार होता.. पण एकेक नवीन नवीन साईट, विकीपेज, व्हिडीओ सापडत गेले आणि मी त्यात अक्षरशः गुंतून गेलो. खरंय ग.. सगळेच मुद्दे धक्कादायक !! तू म्हणतेस तसंही झालं असेल एप्रिल गॅलपचं.. बिचारी..

  अमेरिकेच्या चंद्रस्वारी कशी खोटी आहे याबद्दलचे बरेच मेल्स मागे फिरत असायचे. काहीतरी तथ्य असणारच त्यात (असं आपलं मला तरी वाटतं.) ..

  खरंय. वादग्रस्त विषय टाळलेलेच बरे.. पण कधी कधी मधेच छेडायलाही बरे वाटतात :) .. लिहीत जा ग तू 'पडसाद' वरही..

  ReplyDelete
 23. दीपक उर्फ भुंगोबा, खूप खूप आभार्स रे..

  >> पोस्ट ऑफ द ईयर, म्हणेन मी तर... !

  बाप रे.. हरभऱ्याच्या शेतात मनसोक्त भटकंती केली मी ;) .. जोक्स अपार्ट पण अशा प्रतिक्रिया लिहिण्याचा हुरूप अजून वाढवून जातात.. इतक्या छान प्रतिक्रियेबद्दल इस्पेश्यल आभार्स..

  अरे मीही त्या डॉक्युमेंटरीज बघून असाच सुन्न झालो होतो.. रोज सकाळी ऑफिसला जाताना बघतो रे वर्ल्ड ट्रेड सेंटरचा खड्डा आणि मग हेच सगळं दिसत राहतं डोळ्यासमोर !!

  बघू.. जमलं तर २६/११ आणि 'मॅन ऑन मून' वरही लिहितो लवकरच..

  ReplyDelete
 24. आभार्स संकेताण्णा.. माइंड इट ;)

  अरे या विषयावर कशाला मी तर काहीही लिहिणं हाही एका कॉन्स्पिरसीचाच भाग आहे. (पुढची पोस्ट वाचून कळेल तुला ;) )

  प्रतिक्रियेबद्दल पुन्हा एकदा आभार आणि ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत रहा ब्लॉगला

  ReplyDelete
 25. तुझ्या दोन्ही प्रतिक्रियांबद्दल आभार नचिकेत. दोन्हींना एकत्रच उत्तर देतो. मी लेखात म्हटलं त्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीला दुसरी बाजू असतेच. चूक/बरोबर हे फारफार सापेक्ष झालं. त्यामुळे पहिली/दुसरी हे जास्त योग्य. तर अशा कॉन्स्पिरसी थिअरीज किंवा षडयंत्रांची तथाकथित उकल ही काही जणांना पटू शकते काही जणांना अजिबात पटू शकत नाही. प्रत्येकाने आपल्याला जी बाजू पटते ती घ्यायची. आता तू मांडलेल्या पुट ऑप्शनवाल्या मुद्द्यांवरच बोलायचं झालं तर माझ्या मते तरी ते तसे दुय्यम मुद्दे आहेत. कदाचित चुकीचे, भंपक, उगाच घुसडलेले, बनावट असतीलही.. पण इतर महत्वाच्या मुद्दयांचं काय? जसं कंट्रोल्ड डिमोलिशन, किंवा अख्खं बोईंग वितळून जाणं वगैरे गोष्टी मला तरी न पटणाऱ्या आहेत. अजून एक सांगतो. कदाचित मी लिहिलेले हे मुद्दे विस्कळीत किंवा आउट ऑफ कॉन्टेक्स्ट वाटत असण्याची शक्यता आहे. कारण व्हिडीओज तसे खूप मोठे आहेत आणि सगळ्यांनाच कदाचित पूर्णच्या पूर्ण बघायला जमणार नाहीत म्हणून मी मुद्दाम निवडक मुद्दे वेचून इथे दिले इतकंच. तुला जमलं तर ते दोन्ही व्हिडीओज सावकाश वेळ काढून बघ. कदाचित बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळतील असं वाटतं. मिळतीलच अशी खात्री नाही पण तरीही.. आणि तरीही तुला ते पटलं नाही तरी ठीक आहे की.. ते तुझं मत आहे आणि त्याचा मला पूर्ण आदर आहे. :)

  ReplyDelete
 26. आका, खरंय.. हे सगळं खरोखरीच विषण्ण करून टाकणारं आहे. सुन्न होऊन जातो आपण !! पण काहीच इलाज नाही.. आपण काहीच करू शकत नाही.. :(

  ReplyDelete
 27. खूप आभार सिद्धार्थ.. प्रचंड वगैरे असं काही नाही रे.. पण हो बरेच व्हिडीओज, साईट्स बघितल्या. पण मजा आली लिहिताना. आणि तसाही हा माझा खूप आवडता विषय आहे त्यामुळे वाटलं नाही काही..

  >> हेच वीडियो असावेत पण ते पहाण्याचे पेशन्स नव्हते.

  अरे असंच होतं बऱ्याचदा. पेशन्स संपतात किंवा मग वेळ तरी.. म्हणून मुद्दाम त्यातले महत्वाचे मुद्दे टंकून इथे टाकले. वाचून पटकन होतात म्हणून :)

  >> असो हे सगळं वाचून स्वता:च्या स्वार्थासाठी देशाला आणि निष्पाप नागरिकांना वेठीस धरणारे हरामी राजकारणी फक्त भारतातच आहेत ही शरमेची भावना जरा कमी झाली.

  अगदी अगदी.. फक्त आपल्या इथे पावलोपावली होणारा भ्रष्टाचार यांच्या इथे अत्यंत उच्च पातळीवर होतो इतकाच काय तो फरक...

  ReplyDelete
 28. आभार यवगेशा.. तुमच्या सगळ्यांच्या 'खूप मेहनत' वाल्या प्रतिक्रियांमुळे आता मला खरंच मी खूप मेहनत वगैरे केल्यासारखं वाटायला लागलं आहे ;) :P

  खरंय रे.. आपल्या हातात काही नाही.. फक्त जगा :(

  ReplyDelete
 29. आभार देव. जमलं तर ते व्हिडीओज बघ नक्की. अजूनही बरंच काही सांगितलं आहे त्यात..

  >> अमेरिका हे करु शकते,अस मला तरी वाटते

  अगदी अगदी... मलाही.. उलट अमेरिका'च' हे करु शकते असं मला वाटतं !!!

  ReplyDelete
 30. आभार मंदारा.. हम्म खरंय रे... च्यामारिका काहीही करू शकते.. कुठल्याही थराला जाऊ शकते !!

  ReplyDelete
 31. आभार विक्रम. हम्म खरंय.. कदाचित तसं नसेलही... पण जे 'आहे' असं भासवलं जातंय त्यापेक्षा हे जे 'असू शकेल' वलं व्हर्जन मला तरी जास्त जवळचं वाटलं.. इतकंच..

  पण मला मात्र याची आणि ब्रिगेडची तुलना पटली नाही. ९/११ च्या बाबतीत अनेक तज्ज्ञांनी जे त्या त्या क्षेत्रातले दिग्गज आहेत, मोठमोठ्या विद्यापीठांचे प्रोफेसर्स आहेत, तंत्रज्ञ आहेत, पत्रकार आहेत अशा लोकांनी अनेक पुरावे देऊन हे मत मांडलं आहे. आणि त्यातल्या एकाही व्यक्तीचा दुसरीशी काहीही संबंध नाही तरीही.. ब्रिगेड वाले काय एकमेकांच्याच पाठी खाजवत असतात. आणि तेही काहीही पुरावे न देता !!

  ReplyDelete
 32. तन्वे, तू पण आलीस का भुंगाबाच्या मदतीला मला हरभऱ्याच्या झाडाच्या शेंड्यावर चढवायला? :)

  असो. पण आभार. अभ्यास असा काही नाही.. आवडीचा विषय त्यामुळे व्हिडीओ बघताना, लिहिताना मजा आली !!

  अनेक अभार्स ग.

  ReplyDelete
 33. काका, खूप आभार.. विषयच तसा प्रभावी आहे.

  ReplyDelete
 34. हेरंबमित्रा,

  न पटण्याचा प्रश्नच नाही रे..तुझ्या लेखाविषयी नव्हेच तो पॉईन्ट..

  पुट ऑप्शनचा मुद्दा कदाचित दुय्यम किंवा चुकीचा असेलही असं तू म्हणालास.. Conspiracy theory चं हे खास वैशिष्ट्य आहे. मूळ ताकद असलेल्या एक दोन मुद्द्यांसोबत एकशे एक किंवा एकशे आठ अशा संख्येने दुय्यम मुद्दे उभारलेले असतात. ताकदीच्या मुद्द्यांनी संशयाला जागा केली की दुय्यम मुद्दे संख्येने जास्त असल्याने ते मनातल्या भेगेत घुसून अगदी सिमेंट करून टाकतात ...खात्रीच पटवतात. दुय्यम मुद्दे म्हटले तर "अरेच्च्या हो की..खरच.." असे असतात आणि त्यांना कठोर परीक्षेतून जावं लागत नाही. पण इफेक्ट मात्र जबरदस्त असतो.

  जजेस ना किती विचार करून निर्णय द्यावे लागत असतील हे यातून कळतं..
  शिवाय माझा लिमिटेड पॉईन्ट इतकाच की आल्टर्नेट थियरी आणि paranoia यात फरक कळला म्हणजे झाले.
  नाहीतर अभ्यासपूर्ण वेगळा विचार आणि ब्रिगेडी थियरीज यातले अंतर कमी होण्याची भीती. (१०१ किंवा १०८ मुद्द्यांच्या उदाहरणासाठी "ताजमहाल नव्हे शिवमंदिर" वगैरे थियरीज वाचाव्यात. मजा येते.)

  एक इन्टरेस्टिंग मुद्दा मांडत होतो मी फक्त. तुझा लेख खूप डीटेल आणि अभ्यासपूर्ण आहे त्याविषयी टिप्पणी नाहीच.. ते तर उत्तमच..

  ReplyDelete
 35. मागाहून लक्षात आला योगायोग..

  "ताजमहाल नव्हे शिवमंदिर" वाले श्री. ओक हे तुझे कोणी लागत असतील तर मनापासून माफी..केवळ गम्मत म्हणून उल्लेख केला आहे..

  ReplyDelete
 36. खरच जबरदस्त... इंग्रजीतुन व्हिडिओ पाहणे आणी आपल्या कोणितरी सांगणे यात खुप फ़रक आहे.

  वाचुन सुन्न झालो. जे मेले त्यांचा आणि ज्यांना (पुढे अफगाणमध्ये) मारले (अगदी अमेरिकन सुद्धा) त्या बिचायांचा काय दोष ?

  सत्य हे कल्पनेपेक्षा भयानक असते का ? :-(

  व्हिडिओ बघुन पाहतो, समजले तर ;)

  धन्यवाद

  ReplyDelete
 37. नचिकेता, अरे मान्य आहे. तुझा मुद्दा माझ्या लेख पटण्या न पटण्याविषयी नव्हता याची मला कल्पना आहे. तू मांडत असलेला 'कॉन्स्पिरसी थिअरी' कडे वेगळ्या दृष्टीने बघण्याचा मुद्दाही मला पटला, आवडला. पण तरीही एवढे सगळे योगायोग जुळून येणं हे मला तरी अशक्य वाटतं. काहीतरी जबरदस्त प्लानिंग होतं की ज्यात कदाचित शेकडो लोक गुंतले असावेत. अर्थात मला तरी असंच वाटतं. तू व्हिडीओज बघ एवढंच मी पुन्हा सांगेन.

  आणि पु ना ओकांबद्दल, त्यांचे लेख म्हणजे कधीकधी विनोदीच वाटतात. अभ्यास कमी आणि विनोद जास्त. थोडक्यात गणिताचं उत्तर आधीच ठरवायचं आणि मग त्याप्रमाणे स्टेप्स मांडायच्या असं काहीसं.

  आणि चिंता नाही. फक्त आमचे आडनाव बंधू आहेत.. माझे काका, आजोबा वगैरे वगैरे कोणी नाही.. आणि असते तरीही माझं त्यांच्या लिखाणाविषयीचं मत किंचितही बदललं नसतं. !!

  ReplyDelete
 38. विजय, खूप धन्यवाद.. बर्‍याचदा पूर्ण व्हिडीओ पाहणं जमत नाही. वेळेअभावी म्हणा किंवा इतर काही कारणांनी म्हणा त्यामुळे मुद्दामच त्या २-३ व्हिडीओज मधले जास्तीत जास्त महत्वाचे मुद्दे इथे देण्याचा प्रयत्न केला. खरंच जे हजारो निरपराध मृत्युमुखी पडले त्या बिचार्‍यांचा काय दोष?? :((

  खरंच सत्य हे कल्पनातीत असतं हेच खरं !!

  ReplyDelete
 39. हेरंब,
  हे माझे वराती नंतरचे प्रचंड उशिराचे घोडे आहेत पण तरीही त्यांना पळवल्या शिवाय मला राहवत नाही म्हणून पळवतोच.
  नेमक्या दि.६,७ आणि १० तारखेलाच पुट ऑप्शन च्या ऑर्डर त्या हि एवढ्या मोठ्या प्रमाणात प्लेस केल्या गेल्या हा एक मार्केट प्लेयर म्हणून माझा अनुभव पाहता मला निव्वळ योगायोग अजिबात असू शकत नाही असे माझे मत आहे.अरे अगदी आपल्या मार्केट मध्ये सुध्धा अशा नि ह्या प्रकारच्या कंड्या पूर्वी सुध्धा केल्या गेल्या आहेत नि ह्या पुढेही होत राहणार आहेत.त्या मुळे नंतर बाजार पडल्या वर नि खास करून त्या कंपन्यांचे शेयर पडल्यावर ते पुट घेणाऱ्यांचे उखळ किती पांढरे झाले असेल नि ते राईट करणार्यांचे किती दिवाळे निघाले असेल ह्याची कल्पना करता येत नाही आणि रहाता राहिली हि गोष्ट मग उघड का झाली नाही किंवा ह्याची फार चर्चा तेव्हा का झाली नाही तर ते घेणाऱ्याने झटपट स्क़्वेअर ऑफ करून ते राईट करणार्याचा अंत बघितला नसेल कारण त्यालाही (त्यांनाही)सर्व कल्पना असणारच आहे कि आपण काय करतोय आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ह्या गोष्टी साठी नचिकेत म्हणतो त्या प्रमाणे फार लोकांना सामावून घ्यायची अजिबात गरज नसते.

  ReplyDelete
 40. mynac दादा,

  सर्वप्रथम एवढ्या तपशीलवार प्रतिक्रियेबद्दल खूप आभार आणि ब्लॉगवर स्वागत. तू वरातीमागचे घोडे म्हणत असलास तरी उलट ते रेसच्या घोड्यांच्या गतीने पळताहेत :) ... अरे मलाही नचिकेतच्या प्रश्नाला उत्तर देताना असंच काहीसं म्हणायचं होतं पण माझं शेअर मार्केटमधलं (अ)ज्ञान आडवं आलं. पण तू अगदी योग्य शब्दात टेक्निकली परफेक्ट अशी प्रतिक्रिया दिली आहेस. त्याबद्दल पुन्हा एकदा आभार. मीही थोडाफार खेळलोय बाजारात पण तुझ्यासारखा कसलेला प्लेयर नाही रे. :) असो.

  अशीच भेट देत रहा ब्लॉगला. खूप आभार.

  ReplyDelete
 41. अरे सॉरी..ही पोस्ट वाचायची राहून गेली रे :(
  अतिशय मुद्देसूद लिहल आहेस. फॅरनहाईट मी बघितला आहे आणि त्यात मांडलेले मुद्दे त्यांनी पुराव्यासकट पटवून पण दिले होते..खूप मेहनत केलीस तू ही पोस्ट लिहायला...लुज चेंज नक्की बघेन. हॅट्स ऑफ :)

  ReplyDelete
 42. अरे चालतं रे.. सॉरी काय त्यात. तशीही ही पोस्ट खुपच मोठी आणि थोडी रटाळही झाली होती असं मलाच वाचताना वाटत होतं.. त्यामुळे कितीजणांना आवडेल ही शंकाही होती..

  तू लुज चेंज नक्की बघ. जाम सही आहे. त्याने असले एकेक मुद्दे मांडलेत ना की ९/११ खरंच घडलं होतं का असं वाटायला लागतं आपल्याला..

  ReplyDelete
 43. धक्कादायक आहे, पण अविश्वसनीय नक्कीच आहे, असे काही काही पूर्ण वेगळे interpretations माझ्या डोक्यात चालू असतात, off the record बोलण्या सारखे आहेत, publicly खूपच bold होईल,आणि माझ्याकडे काही पुरावे नाहीत तर तर्क आहेत.

  आपल्या समाजात बराच वर्ग फक्त adult stuff बोलणं म्हणजे परिपक्वता समजतो, पण राजकारणाच्या बाबतीत मात्र अगदी बालिश आणि भाबडे विचार ठेवतो.

  आपण हे धक्कादायक निष्कर्ष मराठीत सर्वांना उपलब्ध करून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.

  मी आधी आपले काही लेख वाचले आहेत, त्यामुळे हा सखोल लेख बघून फारसे आश्चर्य वाटले नाही.

  ReplyDelete
 44. oopss मला म्हणायचं होतं अविश्वसनीय नक्कीच नाही!

  ReplyDelete
 45. मी न्यू जर्सी ला रहातो. तुझी पोस्ट वाचल्यापासून फेरेनहाईट शोधतोय. तुला कुठे ऑनलाइन मिळाली तर मला sanket.sadawarte@gmail.com या ID वर इन्फोर्म करशील का please?

  ReplyDelete
 46. संकेत, प्रतिक्रियेबद्दल आभार.

  या लिंकवर ट्राय करून बघ

  http://www.youtube.com/watch?v=chj5R0Izt9s&feature=related

  ReplyDelete
 47. Mala Hi post avadali ahe .. Khuapach viacharpurvak susutrbaddha likhan ahe .
  Can i share this link.
  Pravangi Nasel tari kalavae
  Thanks,

  ReplyDelete
 48. धन्यवाद व्यंकटेश. माझं नाव देऊन लिंक शेअर करण्यास माझी हरकत नाही. धन्यवाद..

  ReplyDelete
 49. हेरंब ,
  अभिनंदन अतिशय अभ्यासू लेख
  मला वाटते आपल्या मराठी भाषेत हे सर्व पहिल्यांदाच कोणी तरी इतके छान समजावून सांगीतले अन त्याबध्द्ल लिहीले आहे.
  शेवटी सत्तापिपासू राजकारणी कुठल्याही स्तराला जाऊ शकतात.
  त्या बिन लादेन ला ज्या प्रकारे मारले अन त्याचे प्रेत जसे गायब केले हे ही एक गुढच आहे
  पण हे नक्की के अमेरिका सर्व जगावर आपली काळी सावली टाकत आहे. त्या बिचार्‍या अफगाणी जनतेने काय घोडे मारले होते यांचे अन अचानक इराकवर हल्ला करुन त्यांच्या तेलावर हे अधिपत्य गाजविणारे कोण ?
  माझी एक तुर्कि मैत्रिण सांगत होती की आता syria and turkey going to war अन अमेरिकन तिथेही आपले कठपुतली सरकार आणणार .
  काही अमेरिकन क्लायंट शी बोलतानाच कळते की ते खुप फ्रस्ट्रेट वाटतात त्यातील काही माझे मित्र झाले . judging by the t actions of the American Government & Military that I believe the next war (and currently most important) America wage is likely to be against its' own citizens.
  तुझ्या पुढील लेखासाठी शुभेच्छा !
  ~

  ReplyDelete
  Replies
  1. वहिदा, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद आणि उत्तर द्यायला उशीर झाल्याबद्दल क्षमस्व. आधी रशिया आणि मग अमेरिका/तालिबान यांच्यामुळे अफगाणिस्तानने जे हाल भोगले आहेत त्याला सीमाच नाही :(

   असो. ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत रहा.

   Delete
 50. मायला, ही पोस्ट मी आधी का वाचली नाही? कसलं आहे झब्री. मी AE911TRUTH.ORG पाहताना योमुने सांगितलं मला या पोस्टबद्दल.

  ReplyDelete
  Replies
  1. धन्यवाद पंकज. लुज चेंज नक्की बघ. जामच भारी आहे !

   Delete
 51. >> मायला, ही पोस्ट मी आधी का वाचली नाही? कसलं आहे झब्री. + 1

  ReplyDelete
  Replies
  1. गौरी :).. तू ही नक्की बघ.

   Delete
 52. हेओ _/\_
  अत्यंत आभ्यसपुर्ण लेख. पीडीएफ प्रिंट घेतली आहे. व्हिडिओज मागेच घेतले होते. उत्कंठा वाढली आहे. लवकरच बघेन.

  ReplyDelete
  Replies
  1. धन्यवाद दिपक. नक्की बघ. जबरदस्त माहिती आहे त्यात. डोकं चक्रावून जातं.

   Delete
 53. >> मायला, ही पोस्ट मी आधी का वाचली नाही? कसलं आहे झब्री. +100

  ReplyDelete
 54. मी पण हल्लीच एक american zietgeist नावाचा video बघितला. त्यात पण असलच काय काय आहे..
  त्यांनी तर अजून मागे जाऊन पहिल्या अन दुस-या महायुद्धांची अशीच कारणमीमांसा केली आहे..
  त्यांचा मते lucitania and pearl harbour या दोन्ही घटना घडवून आणलेल्या आहेत..

  ReplyDelete
  Replies
  1. धन्यवाद आनंद.

   हो मी पर्ल हार्बरच्या सत्यासत्यतेबद्दल ऐकलं आहे. lucitania ची कल्पना नाही. पर्ल हार्बर मुद्दाम घडवून आणण्यात आलं होतं असं बऱ्याच दुव्यांवर/व्हिडीओ मध्ये पाहायला मिळतं.

   Zeitgeist- moving forward बद्दल ऐकलंय. बघितला नाहीये पण. आता लवकरच बघतो. धन्यवाद.

   आणि हो. ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत राहा !

   Delete