Wednesday, October 27, 2010

वटवटीचं निकालपत्र

मी कधीही आत्मचरित्र लिहिणार नाही..... आत्मचरित्र का लिहिलं जात असावं? आपण किती 'बेस्ट' आहोत आणि तमाम पब्लिकला ते शेवटपर्यंत कसं कळलं नाही हा टाहो फोडण्यासाठी आत्मचरित्र लिहिलं जातं.
-वपु. 

--------

माझ्या सगळ्या हुश्शार, स्कॉली ब्लॉगु-ब्लगिनींनी आपापल्या ब्लॉगचे पहिले वादि साधारण मार्च/एप्रिल/मेच्या सुमारास साजरे केले. केले म्हणजे ते तेव्हाच होते अर्थात.. मला वाटतं त्या सुमारास जवळपास दर चार दिवसाआड कुठल्या ना कुठल्या ब्लॉगच्या वादिच्या पोस्ट्स येत असायच्या. थोडक्यात हुश्शार पोरांचं सगळं मार्चमधे असतं हेच खरं (विचित्र अर्थ काढल्यास डोळे वटारून पाहण्यात येईल : इति मी नाही तर मार्चातले ब्लॉ-ब्ल) आणि ऑक्टोबरचा महिना हा खास राखीव असतो तो या अशा आमच्यासारख्या रिपीटर* (यात श्लेष आहे. का ते नंतर सांगेन) , बॅकबेंचर, लेटलतीफ** (यातही श्लेष आहे. तोही शेष श्लेषाबरोबरच सांगेन.) ब्लॉग (आणि ब्लॉगर) साठी. थोडक्यात या ऑक्टोबरी ब्लॉगचा प्रथमवार्षिक निकाल लावायची वेळ आलीये तर. हे घ्या निकालपत्रच देऊन टाकतो कसं.

===============================================

सत्यवानाच्या वटवटीचे प्रथमवार्षिक निकालपत्र 

कालावधी : २००९-१०

महिना : (अर्थातच) ऑक्टोबर

दिनांक : २३ (च्यायला गडबड झाली. वाचत रहा. कळेल पुढे)

पूर्ण नाव : सत्यवान वटवटे

पाडलेली एकूण बाडं : ११०

छळ सोसणारे वीर : १३८

स्वतःहून स्वतःच्या मेलबॉक्सात वटवटीचा धोंडा पाडून घेणारे महा-वीर : ६६

मिळालेल्या एकूण प्रतिक्रिया, मतं, ओव्या, शिव्या-शाप वगैरे : ३७९७

मुदलातले प्रतिसाद : ~१८९८

सत्यावानाने त्यावर उलट-टपाली चढवलेलं व्याज : ~१८९८

जोडलेले मित्रमैत्रिणी, सुहृद : भर्पूर

मिळालेलं समाधान : चिक्कार

रस्त्याचा नकाशा पक्षि रोडमॅप उर्फ भविष्यकालीन योजना : मब्लॉवि त्यांच्या यादीतून हा ब्लॉग काढून हाकलून देत नाहीत तोवर लिहीत राहणे. आणि नंतरही लिहीत राहणे आणि त्याच्या नंतर आणि त्याच्या नंतरच्या नंतरही लिहीत राहणे. (वचने किम् दरिद्रता.. हाणा च्यायला)

एकुणातली प्रगती : (अ)समाधानकारक

सुधारणेला वाव : कैच्याकै जाम प्रचंड भारी

===============================================

मागे एकदा कुठेतरी "कवीला कविता वाचून दाखवण्यापुर्वी त्याची पार्श्वभूमी, उद्देश वगैरे समजावून सांगावा लागला तर तो कवितेचा आणि तस्मात् कवीचा पराभव आहे" अशा अर्थाचं काहीतरी वाचलं होतं. तशाच प्रकारे श्लेषाचा दुसरा (आणि पहिलाही) अर्थ समजावून सांगण्यात कोणाचा पराभव वगैरे आहे का ते माहित नाही बुवा. पण जनकल्याणार्थ आम्ही दोन्ही अर्थ सांगण्याचे योजिले आहे.

* वाला श्लेष -
अर्थ १ : सगळ्या हुश्शार पोरापोरींच्या मार्च-मे मधल्या ब्लॉगांनंतर आमचा ऑक्टोबरात आलेला म्हणून रिपीटर.
अर्थ २ : आमच्या गेल्या मार्चमध्ये उघडलेल्या आणि काही महिन्यांतच अगदी गतप्राण नाही तरी निष्क्रीय झालेल्या विंग्रजी ब्लॉगनंतर आलेला हा मराठी ब्लॉग म्हणून रिपीटर.

** वाला श्लेष -
अर्थ १ : अर्थ थोडाफार मगाससारखाच अर्थ म्हणजे उशिरा आलेल्या शहाणपणाप्रमाणे उशिरा सुरु केलेला म्हणून लेटलतीफ.
अर्थ २ (हा अर्थ जाम महत्वाचा आहे. नीट लक्ष देऊन ऐका) : २३ ला झालेल्या वादिचा निकाल आमच्या २७ आणि तुमच्या २८ ला जाहीर केला म्हणून लेटलतीफ.

** च्या अर्थ क्र २ चं स्पष्टीकरण : अनेक कारणांमुळे मला ब्लॉगचा वादि २३ च्या ऐवजी २९ ला आहे असं उगाचंच वाटत होतं. हापिसातलं एक मोठं/महत्वाचं प्रोजेक्ट २९ ला संपणार होतं, माझ्या एका कलिगचा २९ हा शेवटचा दिवस होता (आहे) आणि ........ माझा ट्रेनचा पास २९ ला संपणार आहे. ट्रेनच्या पासाचा आणि वादि विसरण्याचा खरं तर अर्थाअर्थी किंवा सरळ लावता येण्याजोगा संबंध नाही. कदाचित हास्यास्पदच वाटेल ते. त्यामुळे तो उलगडूनच सांगावा लागेल. काये की रोज सकाळी आणि संध्याकाळी पास त्या मशीनवर दाखवून स्टेशनात आणि स्टेशनातून बाहेर येताजाताना त्या डिस्प्लेवर 'लास्ट डे २९ ऑक्टोबर' असं मोठ्या आकारात दिसतं. समहाऊ त्याचं हॅमरिंग झालं असावं (आठवा हास्यास्पद).. थोडक्यात चहुबाजूंनी २९ च्या मार्‍यात सापडल्याने मला तोच दिवस ब्लॉगचा वादिही वाटायला लागला. गोबेल्सनीती म्हणतात ती हीच असावी बहुतेक. तर आज आता दोन दिवसच उरलेत म्हणून काहीतरी खरडून टाकायला म्हणून बसलो आणि सहज बघितलं तर पहिल्या पोस्टवर असलेल्या २३ ऑक्टोबर २००९ ने माझी विकेटच काढली. खरं तर हिटविकेटच. (गेल्या वर्षी २३ ऑक्टोबर २९ ऑक्टोबरला आली होती का हो?)

--------

परवा 'घर हरवलेली माणसं' वाचताना वपुंच्या या बाणेदार ओळी वाचून ब्लॉगच्या पहिल्या वादिच्या पोस्टीचं 'असं' आत्मचरित्र होऊ द्यायचं नाही किंवा कदाचित पोस्टच टाकायची नाही असंही मनात आलं होतं. पण वपुंनी त्यांचं आत्मचरित्र लिहिलं नसलं तरी अन्य कोणीतरी त्यांचं चरित्र लिहावं एवढे ते महान होतेच. पण आमच्या ब्लॉगची आत्मचरित्ररूपी प्रथम वादि-पोस्ट आम्ही लिहिली नाही तर ते कोणाला कळायचंही नाही त्यामुळे त्यातल्या त्यात हळू आवाजात हा 'टाहो' फोडायचा प्रयत्न केलाय. फार कर्कश नाही झालाय ना?

72 comments:

 1. हेरंबराय, आता वेग वाढवा पोष्टींचा :)
  तुझ्या लिखाणाचा तर मी पंखा, फ्यान, एसी हाय ते परत परत्न सांगायची गरज नाय..असाच लिहते रहा..
  अभिनंदन...खूप खूप खूप चुभेच्छा आरर्र्र्र्र्र्र शुभेच्छा (आदीनाथ आठवले एकदम.. ;) )

  ReplyDelete
 2. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! (ब्लोग ला हो!) वयाच्या मानानं भलतंच सुधृढ आहे की बाळ (पुन्हा ब्लॉगच). प्रगती असमाधानकारक का ते ? आम्ही तर भरभरून आनंद घेतला आणि तृप्त झालो तुमचे चौफेर लिखाण वाचून ...व्वा ! माझी पहिली प्रतिक्रिया ....असेच लिहित रहा....शुभेच्छा ! अजनबी दोस्त

  ReplyDelete
 3. हेरंबा,
  अशीच उत्तरोत्तर तुमच्या वार्षिक निकालपत्रात आकडे वाढत जावोत.

  पुढील वाटचालीस शुभेच्छा.

  ReplyDelete
 4. हॅप्पीवाला बड्डे <:)

  (एका वर्षात एवढी बाडं!!! भारी!!! दर ३-४ दिवसांत एक बाड. झक्कास!!!)
  पुढच्या वाढदिवसाला हेच आकडे दुपटीपेक्षा जास्त वाढोत... \m/\m/

  ReplyDelete
 5. अरे वा उत्तम निकाल :) पेढे कुठेत....

  सध्या तू पेढे देऊ शकत नाहीस ना मग एक फक्कड पोस्ट हवी!! :)

  अनेक अनेक शुभेच्छा आणि मनापासून अभिनंदन!!

  नेहेमीप्रमाणे ्पोस्टमधे सगळ्यात काय आवडले हे सांगायचा मोह होतोय
  >>>जोडलेले मित्रमैत्रिणी, सुहृद : भर्पूर
  हे जाम मस्त आहे!!!

  लिहीत रहा, वटवटत रहा!!!

  ReplyDelete
 6. हॅप्पी बर्ड्डे टू यू
  हॅप्पी बर्ड्डे टू यू
  हॅप्पी बर्ड्डे डिअर ब्लॉगु
  हॅप्पी बर्ड्डे टू यू.... अभिनंदन

  मुदलातले प्रतिसाद : ~१८९८
  सत्यावानाने त्यावर उलट-टपाली चढवलेलं व्याज : ~१८९८

  अफसोस, ये गलत जवाब है! आप दस हजार रुपये हार गये हैं! माझ्या अजून बर्‍याच प्रतिक्रियांना तू उत्तरं दिलेली नाहीस... ;-)

  ReplyDelete
 7. अभिनंदन!!! अभिनंदन!!! अभिनंदन!!!
  (बाकी ऑक्टोबरमधलं आपलं यश साजरे करून डॅंका पिटणारा तूच पहिला भेटलास. शाळा कॉलेजात जाणारी कार्टि तुझा आदर्श डोळ्यासमोर ठेवू दे नको म्हणजे मिळवलं ;-))

  ReplyDelete
 8. अभिनंदन ....!!!!!!! अभिनंदन ....!!!!!!! अभिनंदन ....!!!!!!! अभिनंदन ....!!!!!!! अभिनंदन ....!!!!!!!
  अप्रतिम ... खूप छान लिहिता तुम्ही ...
  तुमचा ब्लॉग बरेच महिने झाले वाचते आहे....आणि प्रतिक्रिया देण्यासाठी हाच दिवस योग्य वाटला....
  असो... तुमचा ब्लॉग अगदी जक्ख म्हातारा होवो...

  - श्रुती जोशी-कुलकर्णी
  पुणे

  ReplyDelete
 9. हेरंब,
  वादिच्या खूप खूप शुभेच्छा!
  असेच आणखी छान छान (तिरकस :)) लिखाण वाचायला मिळो अशी प्रार्थना.

  ReplyDelete
 10. प्रगती खूपच चांगली आहे यात असमाधान होण्यासारखं काय आहे ?

  असेच लिहित रहा :)
  वादिच्या खूप खूप शुभेच्छा!

  ReplyDelete
 11. अभि+नंदन+शुभेच्छा हेरंबा!

  ReplyDelete
 12. छान हेरंब, असंच उत्तम लिखाण येत राहू देत. अभिनंदन. अणि शुभेच्छा!

  ReplyDelete
 13. merit list madhe aalas, ajun kay havay re?? congrats!!!
  lihitach raha!!!!
  belated happywala badde !!!

  ReplyDelete
 14. वाढदिवसाच्या शुभेच्छा! खूप मोठ्ठा हो! (हे ब्लॉगला म्हटलंय)

  तुझी ‘वटवट’ अगदी मनातून आलेली असते, ते प्रत्येक पोस्टीतून जाणवतं. असंच वाचायला मिळू दे आम्हाला!

  ReplyDelete
 15. >>> रस्त्याचा नकाशा पक्षि रोडमॅप उर्फ भविष्यकालीन योजना : मब्लॉवि त्यांच्या यादीतून हा ब्लॉग काढून हाकलून देत नाहीत तोवर लिहीत राहणे. आणि नंतरही लिहीत राहणे आणि त्याच्या नंतर आणि त्याच्या नंतरच्या नंतरही लिहीत राहणे. (वचने किम् दरिद्रता.. हाणा च्यायला)

  ख्या ख्या खी खी....

  अरे माझ्यासारखे पंखे असल्यावर असं होऊच शकत नाही... टेक अ बो मि. वटवटे सत्यवान...

  ReplyDelete
 16. हेरंब निकालाच्या आधी सुट्टी असते म्हणून इतके दिवस थांबला होतास का??? :) झक्कास आहे निकाल पण पुढच्यावेळी जास्त मार्क (पक्षी: पोष्टा) हव्यात .....चल निमुटपणे पुढची पोस्ट लिहायला बस...:)
  रच्याक "मब्लॉवि त्यांच्या यादीतून हा ब्लॉग काढून हाकलून देत नाहीत तोवर लिहीत राहणे" हे एकदम हटके वाटल बघ...ज्यांनी ज्यांनी आपल्या ब्लॉगला सुरुवातीचे ग्राहक मब्लॉविच्या पेठेत मिळवले त्यांनी त्यांनी आदर्श ठेवावा असं लिहून गेलास दोस्त....

  अरे हो...बड्डे चे गुद्दे मारायचे राहुनच गेले....चल केक पाठव आता....:) वादिहाशु..............

  ReplyDelete
 17. सुहास, हाबार्स हाबार्स.. तुम्हा सगळ्यांच्या प्रतिक्रियांमुळे तर लिहिण्याचा उत्साह वाढतो..

  >> आता वेग वाढवा पोष्टींचा :)

  अरे नेहमीच वेळेशी कुस्ती चालू असते आणि मी नेहमीच हरणार्‍या पार्टीत असतो. :) तरी वेग वाढवण्याचा प्रयत्न नक्कीच करीन.. आणि या महिन्यात मी लिहिलं बरंच पण पोस्ट नाही करता आलं ब्लॉगवर... का ते पुढच्या पोस्टमध्ये सांगतो :)

  ReplyDelete
 18. प्रिय अजनबी दोस्त, आपल्या शुभेच्छांबद्दल मनःपूर्वक आभार. अहो प्रगती पूर्णतः समाधानकारक नाही कारण अजून बरंच लिहायचं होतं, नियमित लिहायचं होतं पण ते जमलं नाही. पण पूर्णतः असमाधानकारकही नाही कारण जेवढं झालं तेवढं चांगलंच झालं. त्याबद्दल खंत नाही.. हे असं समाधानकारक आणि असमाधानकारकच्या अधेमध्ये असल्याने अ कंसात टाकलाय :)

  असो.. पुन्हा एकदा प्रतिक्रियेबद्दल आणि शुभेच्छांबद्दल आभार.

  ReplyDelete
 19. सचिन, शुभेच्छांबद्दल अनेक आभार रे. आकडे वाढवायचे प्रयत्न आहेतच. पण निदान काठावर पास होणार नाही याची मात्र ग्यारंटी ;)

  ReplyDelete
 20. सौरभ धन्स धन्स.. अरे जानेवारी ते जून पर्यंत बरंच आणि बर्‍याच वेगाने लिहिलं त्यानंतर जरा मंदावलो. पण त्यामुळेच एकूण आलेख जरातरी सुदृढ दिसतोय :)

  शुभेच्छांबद्दल मनःपूर्वक धन्यु..

  ReplyDelete
 21. तन्वे, खू खू धन्स.. तुम्हा सगळ्यांच्या प्रतिक्रिया आणि प्रोत्साहनामुळेच तर लिहायला मजा येते.

  आणि येणार येणार.. नवीन पोस्टीही येणार लवकरच.. फक्कड आहेत की नाही ते मात्र तुम्ही ठरवायचं ;) ... पुन्हा एकदा आभार.

  ReplyDelete
 22. संकेत (आपटे), धन्यवाद भाऊ.. एकदम मान्य.. तुझ्या (बर्‍याच नाही रे) काही प्रतिक्रियांना उत्तरं द्यायची राहिली आहेत अजून. अरे पण तू धडाधड पोस्टी वाचून प्रतिक्रिया देण्याचा धडाकाच लावलास (ज्यामुळे एक ब्लॉगर म्हणून मला खूप खूप खूप आनंद झाला.. त्यापुढे दहा हजार काय लाख रुपये हरण्याचं दुःख काहीच नाही ;) ). त्यामुळे त्या प्रतिक्रियांच्या सुखद वावटळीत मी अडकून गेलो :) .. तुझ्या उरलेल्या प्रतिक्रियांनाही उत्तरं देतो लवकरच :)

  आभार्स पुन्हा एकदा.

  ReplyDelete
 23. धन्स धन्स धन्स सिद्धार्थ :)

  >> बाकी ऑक्टोबरमधलं आपलं यश साजरे करून डॅंका पिटणारा तूच पहिला भेटलास.

  हेहेहे.. काय करणार आलीय भोगासी.

  >> शाळा कॉलेजात जाणारी कार्टि तुझा आदर्श डोळ्यासमोर ठेवू दे नको म्हणजे मिळवलं ;-))
  आणि आपली पोरं कॉलेजात जायला लागेपर्यंत कदाचित ऑक्टोबरचं 'पुरेसं'ग्लोरिफिकेशन झालेलं असेल ;)

  ReplyDelete
 24. धन्यवाद आल्हादशेठ :)

  ReplyDelete
 25. माऊ, अनेक आभार्स.

  ReplyDelete
 26. धन्यवाद.. धन्यवाद.. धन्यवाद... धन्यवाद.... धन्यवाद श्रुती :) .. तुम्ही दिलेल्या एवढ्या मनमोकळ्या प्रतिक्रियेबद्दल अनेक अनेक धन्यवाद. अगदी योग्य दिवशी प्रतिक्रिया दिलीत :)

  ब्लॉग जक्ख म्हातारा होणार म्हणजे मग मीही.. आयला बॅकग्राउंडचा फोटू बदलायला लागणार.. असो.. कैच्याकै बडबडतो मी ;)

  तुम्ही नियमित वाचक आहात त्यामुळे स्वागत करायचा प्रश्न नाही :) अशीच नियमित भेट देत रहा.. !

  ReplyDelete
 27. अनेक आभार सोनाली. देवदयेने आपल्या आजूबाजूला गांधी, पवार, देशमुख, परुळेकर, ब्रिगेड, अरुंधतीबाई अशी बरीच जनावरं वावरत असतात. या लोकांची तोंडं जोवर चालू राहणार तोवर आपल्या तिरकस लेखनाला आणि ब्लॉगला मरण नाही ;)

  ReplyDelete
 28. विक्रम धन्यवाद. अरे असमाधान म्हणजे रूढार्थाने नाही रे. वरती अजनबी दोस्तच्या प्रतिक्रियेला उत्तर दिलंय बघ.. त्यात मला काय म्हणायचंय ते कळेल. पुन्हा एकदा धन्यवाद.

  ReplyDelete
 29. बाबा, खूप धन्य+वाद....... तिघांनाही ;)

  ReplyDelete
 30. अपर्णा, शुभेच्छा आणि प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक आभार.

  ReplyDelete
 31. संकेत, मेरीट लिस्ट.. हेहेहे... :)
  शुभेच्छांसाठी खूप आभार रे.

  रजनीदेवांना आमचा MIND IT नमस्कार कळव रे बाबा ;)

  ReplyDelete
 32. गौरी, खूप आभार्स.. ब्लॉगतर्फेही ;)

  वटवट तर चालूच राहणार.. तुम्ही सगळे आवडीने वाचताय हे बघून अजूनच आनंद होतो. धन्स ..

  ReplyDelete
 33. वा.. अभिनंदन रे...

  छळ सोसणारे वीर : १३८ च्या ऐवजी १३९ झाले.. :)

  आता महिन्याला किमान १५ पोस्टा हव्या...

  ReplyDelete
 34. आनंद, हाहाहा.. शक्यतो असं होऊ न देण्याचा प्रयत्न आहेच. बो राहू दे.. ही 'जादू की झप्पी' घे :)

  ReplyDelete
 35. हा हा अपर्णा. आयला हो ग.. खरंच हेच कारण सांगायला पाहिजे होतं ;) .. अजून मार्क? तुमच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली गुदमरणार आहे ही नवीन पिढी ;) उग्गच कैच्याकै ग. लक्ष देऊ नकोस ;)

  अग मब्लॉविमुळे तर आपण लोकांना माहित झालो सुरुवातीला.. नाहीतर आपली काय आयडेंटिटी आहे?.. आणि केक तयार आहे. पण गिफ्ट मिळाल्याशिवाय पाठवणार नाही ;)

  ReplyDelete
 36. आभार रोहण्णा उर्फ सेनापती उर्फ खाणापती :)

  हो रे.. आज सकाळी १३९ दिसले एकदम :) .. महिन्याला १५ पोस्टा? अरे माझं नाव हेरंब ओक आहे महेंद्र कुलकर्णी नाही ;)

  ReplyDelete
 37. अरे नाव हेरंब ओक आहे म्हणूनच महिन्याला १५ पोस्ट्सची अपेक्षा आहे. महेंद्र कुलकर्णी नाव असतं तुझं तर हा आकडा ३० वर गेला असता... ;-)

  ReplyDelete
 38. हा हा हा.. हे बी बाकी आक्षी खरं बगा. ;)

  ReplyDelete
 39. nice style of celebration....

  aata tar 1 li zali..nikal aalay..
  2..3..4..5...... kititari nikal havet asech aamhala.. saglyat awdata blog..

  Belated Happy Birthday..

  ReplyDelete
 40. मनपूर्वक अभिनंदन......

  ReplyDelete
 41. हेरंब
  ब्लॉगच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा! ही वटवट अशीच चालू राहो !!
  निरंजन

  ReplyDelete
 42. अभिनंदन!!! वादी निकालपत्र देऊन साजरा करण्याची कल्पना आवडली.
  तुमचा ब्लॉग मी बरेच दिवसांपासून वाचत आहे. तुमची लिखाणाची शैली मला शिरीष कणेकरांसारखी वाटते आणि मला कणेकरी लेखन आवडते. So Once again Congratulations!!!!

  ReplyDelete
 43. Heramb,

  Happy anniversary,

  I know it is late but better late than never.

  with regards & lots of wishes.

  Thanks....

  ReplyDelete
 44. पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा

  ReplyDelete
 45. संदर्भ: माझ्या प्रतिक्रियेला दिलेलं उत्तर

  ठीक आहे. मग आपण एक काम करूया. मी तुझ्या प्रत्येक लेखावर एक नाही, चार-चार प्रतिक्रिया देतो. तू मला एक लाख रुपये पाठव. कारण एक लाख जाण्याच्या दुःखापेक्षा प्रतिक्रियांमधून मिळालेला आनंद जास्त असेल. त्यामुळे प्रतिक्रियांमुळे तू खूश आणि पैशांमुळे मी खूश.... हीहीही

  ReplyDelete
 46. खुप खुप शुभेच्छा आणि अभिनंदन...पेढे पाठव रे लवकर...

  ReplyDelete
 47. धन्यवाद योग.. बापरे.. एवढे निकाल लागतील का सांगू नाही शकत. पहिला लागला हेच खूप आहे :) तरीही प्रयत्न करूच :)

  इतक्या छान प्रतिक्रियेबद्दल अनेक आभार.

  ReplyDelete
 48. खूप धन्यवाद सविताताई.

  ReplyDelete
 49. लीना, मनापासून आभार. !!

  ReplyDelete
 50. निरंजन,
  मनःपूर्वक धन्यवाद.. जमेल तितका काळ वटवट चालू ठेवायचे मनात आहेच :)

  ReplyDelete
 51. प्रज्ञा, खूप खूप आभार. अजाणतेपाणी का होईना पण तुम्ही शिरीष कणेकरांच्या चाहत्यांची नाराजी ओढवून घेत आहात असं वाटत नाही का तुम्हाला? ;).. हेहेहे.. चराज चंमतग )

  जोक्स अपार्ट.. खरं सांगतो.. ही खूप मोठी पावती आहे माझ्या लिखाणाला. खूप बरं वाटलं.

  ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत रहा नेहमी.

  ReplyDelete
 52. mynac दादा,

  अरे स्वतःच्या ब्लॉगच्या वाढदिवसाची पोस्ट उशीरा टाकणार्‍याला कशाला बिलेटेड विशेस? उलट वेळेतच आहेस तू ;)

  प्रतिक्रियेबद्दल अनेक आभार.

  ReplyDelete
 53. गौरव, मनःपूर्वक आभार.

  ReplyDelete
 54. अरे बापरे संकेत.. तू छोट्या छोट्या गोष्टी फारच मनावर घ्यायला लागलास रे ;) :P

  ReplyDelete
 55. धन्यवाद मंदार.

  ReplyDelete
 56. अरारारा... छोटी गोष्ट. श्या! मला वाटलं या जागतिक मंदीच्या काळात मला थोडी आर्थिक मदत होईल... ;-)

  ReplyDelete
 57. देवेन, खूप खूप आभार.. गिफ्ट मिळालं की पेढे पाठवतो रे ;)

  ReplyDelete
 58. अरे कसली जागतिक मंदी? ती तर केव्हाच संपली. हे वाच..

  http://abcnews.go.com/Business/Economy/story?id=7564649&page=1

  ReplyDelete
 59. वा भाऊ, एवढ्या लवकर लिंक शोधलीत पण? लईच फाष्ट काम हाय तुमचं. :-)

  ReplyDelete
 60. हेहेहे.. केक खाने (बचाने) के लिए हम कही भी जा सकते है ;)

  ReplyDelete
 61. great m RSS feed reader today i got to see new post good luck for future

  i ill b ur follower now

  ReplyDelete
 62. प्रिय अनामिक, प्रतिक्रियेबद्दल अनेक आभार. आणि फॉलोअर झाल्याबद्दल डब्बल आभार. :)

  ReplyDelete
 63. सत्यवाना...प्रतिक्रिया द्यायला उशीर होतो आहे त्यासाठी क्षमस्व....तुझी वट्वट अशीच प्रगती करत राहो यासाठी शुभेच्छा!!

  ReplyDelete
 64. मौज्या, अरे क्षमस्व काय.. वेडा आहेस का..? तू हापिसात किती राबतो आहेस माहित्ये मला. तरीही धावपळीतून वेळ काढून आवर्जून प्रतिक्रिया दिल्याबद्दल खुप्प आभार ! :)

  ReplyDelete
 65. >हेरंबराय, आता वेग वाढवा पोष्टींचा
  अरे सुहास, आधिच त्याच्या पोष्टी वाचताना खास वेळ काढावा लागतो. तू आणि त्यात चिथव..
  हेरंब,
  जरा सावकाश लिही(आमच्यासारख्या कासवांसाठी)पण नियमित, अखंड लिहित रहा..
  अनेक अनेक शुभेच्छा!

  ReplyDelete
 66. मीनल, तू आज खासच वेळ काढला आहेस. तुझ्या प्रतिक्रियांनी मेलबॉक्स भरून गेला की माझा बाये.. :)

  >> हेरंब,
  जरा सावकाश लिही

  चला कोणीतरी आहे बरोबर तर.

  आपला,
  कासव वाचकांसाठी लिहिणारा कासव ब्लॉगर :P

  ReplyDelete
 67. मला नाही वाटत तुझे लिखाण शिरीष काणेकर सारखे आहे.. मुळात कुठल्याच लेखकाचे लिखाण कोणासारखे असते ह्यावर माझा विश्वास नाही. प्रत्येकाची एक शैली असतेच की...

  आणि हो काणेकर चे लिखाण मला दरवेळी आवडेल याची शाश्वती मी देऊ शकत नाही पण तुझ्या लिखाणबाबत देऊ शकतो... ही आहे की नाही अजून मोठी पावती... :D

  ReplyDelete
 68. रोहण्णा, आभार्स रे.. शैलीची कल्पना नाही पण जमेल तसे चिमटे काढत लिहीत असतो..तुम्हा सार्‍यांना आवडतं. अजून काय हवं?

  आणि हो.. खरंच खूप मोठी पावती दिलीस.. खूप मोठ्ठे धन्यवाद..

  ReplyDelete