Wednesday, January 5, 2011

तात्पर्य !

** सदर 'तात्पर्य' यापूर्वी 'शब्दगारवा २०१०' येथेही काढण्यात आलेले आहे याची चिकित्सक वाचकांनी नोंद घ्यावी. :)

----------------------------------------------------------------------------------------

कुठल्याही हिवाळी/दिवाळी इत्यादी इत्यादी इ-अंकांसाठी लिहायचं म्हटलं की माझ्या अंगात एकदम प्रचंड उत्साह संचारतो... किती आणि काय लिहू असं होऊन जातं... नवनवीन कल्पना सुचायला लागतात.. नवनवीन विचार मनात घोळायला लागतात.. नवीन लेख, नवीन विषय, नवीन कविता, नवीन कल्पना वगैरे वगैरे माझ्या डोक्यात अक्षरशः फेर धरून का कायसंसं म्हणतात तशा नाचायला लागतात. काय लिहू आणि काय नको असं होऊन जातं अगदी. मी बरंच कायकाय मस्त लिहायचं ठरवायला लागतो. काही लेख, कथा, कविता मनातल्या मनात वगैरे तयारही होऊन जातात, रात्री झोपताना कित्येक कल्पना नव्याने सुचतात. दुसर्‍या दिवशी सकाळी उठल्यावर त्या सगळ्या कल्पना फक्त कागदावर उतरवल्या की झाला लेख तयार.. अहाहा.. कस्सलं सही.. !!

दुसर्‍या दिवशी सकाळी उठल्यावर मी मोठ्या उत्साहाने लिहायला बसतो. काल सुचलेलं सगळं लिहून टाकायचं एकदाचं असं ठरवून झरझर लिहायला लागतो.

.
.
..
.
.
ए फॉSSर?
आप्प

बी फॉSSर?
बे

सी फॉSSर?
के

डी फॉSSर?
दाद
.
..
.
.
...
.
.
..
.

जानेवारी
दानॅनॅनॅ

फेब्रुवारी
पेमॅमॅमॅ

मार्च
माSS
.
.
..
...
.

चैत्र
तैत्त

वैशाख
बात्ता

ज्येष्ठ
देत्त
.
.
.
..
..
.

वन

तू SS

अरे वन म्हण ना वन

तू SS

बरं तू तर तू... माझं पांढरं निशाण !

थ्री SS
ती SS

फोर SS
पो SS
.
.
.
..
...
.
.
.लिहिता लिहिता आणि लिहून झालेलं वाचल्यावर माझं मलाच नीट कळत नाही की मी काय लिहिण्याचा विचार केला होता, काय विचार करत होतो, काय काय सुचलं होतं, काय लिहायचं होतं आणि प्रत्यक्षात मात्र मी काय लिहिलं आहे. मग अचानक नळी (ट्यूब व्हो !) पेटते. झोपायच्या आधी सुचलेल्या कल्पना आणि प्रत्यक्ष झोपायला जाणं याच्यामध्ये काहीतरी घडलेलं असतं. लेकाला झोपवताना त्याचा अभ्यास घेण्याच्या नावाखाली आम्ही बरंच काय काय बडबडलेलो असतो.

रात्री झोपताना लिहिलेलं/वाचलेलं (आणि बोललेलंही) सकाळी उठल्यावर चांगलं लक्षात राहतं अशा आमच्या शाळेतल्या बाई म्हणायच्या !

51 comments:

 1. हाहाहाहा.... लई गोड आहे हा बोबड्या... :D :D :D

  ReplyDelete
 2. हाहा सौरभ.. धन्स धन्स... माझ्याकडून आणि बोबडकांद्याकडूनही :)

  ReplyDelete
 3. hahahahah..........
  lai bhari laiiiiiii bhariiiiiii.......
  mazya maitrinini parva link pathavlyapasun tuza juna nava sagla vachtoy.........mhanun saglyachi daad aattach deto......
  maza navin varsha vinodi janar aas distay...

  ReplyDelete
 4. हेहे धन्यवाद धन्यवाद अनामिक... एक धन्यवाद तुम्हाला आणि एक तुमच्या अनामिक मैत्रिणीला :)

  ReplyDelete
 5. tvarit pratisadabaddal dhanyawad........
  tuze magche sagle blog vachtoy.....mhanun udti udti pratikriya.....
  laiiiiiiiiiii bhariiiiiiiiiiii...

  ReplyDelete
 6. धन्यवाद रोहित.. :) आवर्जून प्रतिक्रिया दिल्याबद्दल आणि फॉलोअर झाल्याबद्दलही !! :)

  तुम्ही फॉलो करत असलेले ब्लॉग बघून तुम्हाला या ब्लॉगची लिंक कोणी दिली असावी याचा अंदाज आला..

  सविताताई, तुमचेही आभार !

  ReplyDelete
 7. cute!:-) hee one nantar two (tu) chee ghai malahee aThavatiye, somehow tyanna jenva pudhacha number mahit asato asel tenva te evadhe pitke asun suddha jordar statement kartaat jashee kahee mala mahitiye puDhacha and I refuse to repeat after you!:-)

  ReplyDelete
 8. आभार्स स्मिता.. अगदी अगदी सेम.. त्यांना असंच दाखवायचं असतं की मला बघ पुढचं ऑलरेडी येतंय.. मी कशाला तुझ्या मागे मागे म्हणू.. हेहे.. धम्माल...

  ReplyDelete
 9. ohhh ho so nice..
  तात्पर्य की ,
  आदितेय चे recordings Hit होतायेत..

  ReplyDelete
 10. अहो, आत्तापासून अभ्यास घेऊ नका!

  बहुधा मोठेपणी (म्हणजे जेव्हा अभ्यास करायची गरज जास्त असते तेव्हा) मग मुल-मुली अभ्यासाचा कंटाळा करतात!

  गाणी गोष्टी सांगायची हौस भागवून घ्या सध्या .. पुढे तो तुम्हाला हे काही करु देणार नाही .. त्यालाच मग खूप बोलायचं असेल :-)

  ReplyDelete
 11. दानॅनॅनॅ मदली पैली पोत्त मत्त दाली ले ;-)

  ReplyDelete
 12. Nice voice of little buddy,
  आतापासूनच पुढे जायची एवढी घाई आहे त्याला ह्याचा अर्थ तो तुला फारच लवकर मागे टाकणार असं दिसतंय !!

  ReplyDelete
 13. "दानॅनॅनॅ मदली पैली पोत्त मत्त दाली ले"

  +१२३४५६७८९०००००००००००००००००००००००००००००

  ReplyDelete
 14. छान,मस्त ,स्मरणशक्ती दांडगीआहे, ,

  ReplyDelete
 15. सुंदर मस्त छान

  ReplyDelete
 16. हा हा... बोबडकांदा एकदम मस्त मस्त.

  ReplyDelete
 17. दानॅनॅनॅ मदली पैली पोत्त मत्त दाली ले ;-) +++++

  ReplyDelete
 18. धन्स धन्स योग :)
  हेहे.. मला हे दुसरं तात्पर्य आवडलं.. :)

  ReplyDelete
 19. धन्स्स्स्स्स सुहास :)

  ReplyDelete
 20. नाही सविताताई, अभ्यास असं काही नाही.. त्यालाच पुस्तकं खूप आवडतात (सध्या तरी).. तो ही ABCD/numbers वगैरेची पुस्तकं घेऊन बसतो आणि आम्हाला ते म्हणायला लावून आमच्या मागे तो म्हणतो.. असं करता करता एक दिवस लक्षात आलं की त्याला a for apple पासून ते थेट Z पर्यंत सगळं येतंय.. आम्हालाही तेव्हा धक्काच बसला होता :) सुखद धक्का..

  सध्या गाणी गोष्टी हेही चालूच आहे.. बरंच काही चालु आहे थोडक्यात :) (हे माझ्याही आत्ता लिहिताना लक्षात आलं :) )

  ReplyDelete
 21. सिध्दाल्त, पैली नाई ले.. दुत्ली :)

  ReplyDelete
 22. Thanks Anee..
  लवकर पुढे गेला तर आनंदच आहे.. आरंभशूरता नसली म्हणजे झालं ;)

  तुझी प्रतिक्रिया मराठीत बघून मस्त वाटलं.

  ReplyDelete
 23. धंत धंत आल्लाद..

  ReplyDelete
 24. काकू, असं वाटतंय तरी खरं..

  ReplyDelete
 25. हेहे श्रीताई.. धन्स धन्स :)

  ReplyDelete
 26. मंदाल, दन्नु दन्नु :)

  ReplyDelete
 27. च्यो च्वीट .... :)

  ReplyDelete
 28. गोsssssड... किती दिवसान्नी असं (टिपीकल बायकी.. माझ्या नवऱ्याच्या भाषेत ;) ) गोड म्हणावं वाटतय... पोस्ट वाचताना मला ते फावडं हातात घेऊन बर्फ बाजूला सारणारा शुरवीर आदि डोळ्यासमोर येत होता सारखा :)

  ईशान लहान होता ना म्हणजे 1-1 1/2 वर्षाचा त्याला ’ए फॉर ऍपल’ शिकवलं तर पठ्ठ्याने पुढे ’झेड फॉर झॅपल ’ पर्यंत एका दमात म्हटलं होतं.... मधे मी थांब म्हणतं होते तरी कार्ट थांबलं नाही ते आज किती वर्षांनी आठवलं :)

  पोस्ट भन्नाट... बोबडकांदा सुपर भन्नाट :)

  ReplyDelete
 29. हा हा तन्वे.. चालेल.. हे बायकी गोsssssड ऐकण्याची सवय झालीये मला :)

  झेड फॉर झॅपल .... हा हा हा हा.. सहीये इशान :)

  प्रतिक्रियेबद्दल धन्स आणि 'गोsssssड' बद्दल बोबडकांद्याकडून सुपर धन्स !!

  ReplyDelete
 30. अ‍ॅबित...मत्त मत्त...

  तुला शुभरात्रीचं accented शुभवॉत्री कसं वाटतंय...

  ReplyDelete
 31. मस्त आहे रे रेकॉर्डिंग...
  चांगली शाळा घेत होतास...:P

  ReplyDelete
 32. अ‍ॅबित .. हेहे.. र सायलेंट आहे आमचा ;)

  शुभवॉत्री ...हाहाहा.. लोल.. झक्कास.. accented शुभवॉत्री म्हणणारा आरुष डोळ्यापुढे उभा राहिला ...

  ReplyDelete
 33. धन्स सागर... कोण कोणाची शाळा घेत होतं काय माहित :P

  ReplyDelete
 34. टी फ़ोर टॉंकू.

  खूप खूप टॉंकू.

  ReplyDelete
 35. हा हा गंगाधरजी.. धन्यवाद..
  टॉंकू टॉंकू.. आवडलं :)

  ReplyDelete
 36. हाथ के बदले हाथ, आँख के बदले आँख, स्मायली के बदले स्मायली

  :)

  ReplyDelete
 37. हाहा.. जबर्‍या.. बाकी नेहमीप्रमाणे आदितेय रॉक्स...

  ReplyDelete
 38. आभार आनंदा.. त्याचं रॉकणं चालूच असतं सारखं :)

  ReplyDelete
 39. कसला गोड बोबडकांदा आहे. तोच तुला शिकवतो बहुधा.

  ReplyDelete
 40. हाहा कांचन.. अगदी अगदी.. गुरु आहे माझा तो ;)

  ReplyDelete
 41. काय छान वाटतं आदितेयचं बोलणं ऐकताना. मजा आली :-)

  ReplyDelete
 42. धन्यवाद संकेत.. आता तर त्याच्या दुप्पट/तिप्पट बडबडत असतो. दिवसभर फक्त बडबडतच असतो :))

  ReplyDelete
 43. Heramb,
  khup aawadale tumche post... aani ha audio tar atishay cute aahe...
  q-rabbit
  q-rabbit
  q-rabbit
  q-rabbit .. khup aawadala...
  malahi 2 varshacha mulga aahe.. tyamule Adidev chya goshti tar khupach jawalchya aani anubhavlyasarkhya vatatat... cute, cute, khupach cute...
  Adidev motha zalyawar (teenager vagaire, kivva to baba zalyawar vagaire) tyala suddha kiti maja yeil he aiktana...

  ReplyDelete