Friday, February 11, 2011

सुखी माणसाची गोष्ट..

उशिरा उठलो..

आंघोळ उरकली..

नाश्त्याला कल्टी दिली..

धावत स्टेशन गाठलं..

पायर्‍या उतरताना धडपडलो..

पास संपल्याने गेटवर अडकलो..

पास काढेपर्यंत ट्रेन गेली..

प्रत्यक्ष प्लॅटफॉर्मवर जाईपर्यंत पुढची ट्रेनही डोळ्यासमोरुन गेली..

पुस्तक काढावं म्हणून बॅगेत हात घातला तर पुस्तक घरीच विसरल्याचं लक्षात आलं..

ऑफिसच्या लॉबीतच बॉसने जंगी 'स्वागत' केलं..

चार भल्यामोठ्या प्रॉब्लेम्सनी हापिसात नाश्ता करण्याच्या बेतावर आणि प्रयत्नावर पाणी फेरलं..

एक कलिग सुट्टीवर, दुसरा ट्रेनिंगला. अजून चीडचीड..

चक्कर यायच्या बेतात आल्यावर हातातलं काम टाकून जेवण्यासाठी पळालो.

सँडवीचमध्ये मीठ जास्त.. त्याच्याशी भांडलो.

जागेवर परत आल्यावर पुन्हा एका कलिगशी भांडलो.


... साला काय एकेक दिवस असतो यार !!! (तरीही अर्धाच संपलाय आत्ताशी :( )


* ही पोस्ट उगाच कैच्याकै आहे. सोडून द्या..

39 comments:

 1. हा हा..तू सँडवीचबरोबर भांडलास चक्क...:P
  बाकी जुने डाऊनटाऊन मधले कामाचे दिवस आठवले रे...पास ट्रेन बॉसचा चेहरा..माझ्याकडचे मर्फी महाराज तुमच्याकडे आलेत बहुतेक...

  ReplyDelete
 2. aaj sukhee maaNasaachaa sadaraa ghaatalaa asasheel ;)

  ReplyDelete
 3. दिवस संपला कसा ते जास्ती महत्त्वाचं....सांगा बरं दिवस कसा संपला? :)

  ReplyDelete
 4. >>>>दिवस संपला कसा ते जास्ती महत्त्वाचं....सांगा बरं दिवस कसा संपला? :) +१०००

  ReplyDelete
 5. आशा आहे दिवसाचा समारोप आनंदी होता. :) काय??

  ReplyDelete
 6. चालायचंच.. सकाळी सकाळी आरसा पाहत जाऊ नकोस :D

  ReplyDelete
 7. जेवण खराब तर दिवस खराब

  ReplyDelete
 8. मला खात्री आहे दिवस आनंदातच संपला असणार ... काही झालं तरी विकेंड आहे बाबा :)

  ReplyDelete
 9. >>हा हा..तू सँडवीचबरोबर भांडलास चक्क...:P
  मलाही हाच पार्ट आवडला! :D

  ReplyDelete
 10. काहीही असो. घरी बायकोशी आणि हापिसात कलिगशी भांडणे महत्वाचे !!!

  ReplyDelete
 11. ह्मम्म्म...कैच्याकै आहे म्हणून सोडतोय.
  परत सँडवीचबरोबर भांडू नकोस ;)

  ReplyDelete
 12. अरारा, त्यात हा शुक्रवार असावा. मग काय वीकेंडला तुझा मूड सेट झाला असेल अगदी.
  बाकी सॅन्डविचबरोबर कसे भांडावे ते कळव. आमच्या कॅंटीनमध्ये अगदी चपातीपासून सलाड, बिर्यानीपर्यंत बर्‍याच लोकांपर्यंत मला माझ्या भावना पोहचवायच्या आहेत.

  ReplyDelete
 13. हेहे.. अग सँडवीचवाल्याच्या पारड्यात माझ्यापेक्षा निदान ६०-७० किलो वजन जास्त असणार.. त्यामुळे फक्त सँडवीचशीच भांडावं लागलं ;)

  ReplyDelete
 14. तृप्ती, माझ्या अंगावर विराजमान झाल्यावर सदरा पार्टी बदलतो.. ;)

  ReplyDelete
 15. अनघा, एकदम परफेक्ट.. दिवस छान संपला.. कारण नेहमीपेक्षा २ तास लवकर संपला :)

  ReplyDelete
 16. तन्वी, १२० मिनिटांची कमाई केली दिवसअखेरीस :)

  ReplyDelete
 17. यस श्रीताई.. तुला तर माहिती आहेच :)

  ReplyDelete
 18. आनंदा, तुझ्याशी चॅटिंग केल्यानंतर झालं हे सगळं !! ;)

  ReplyDelete
 19. गौरव, लाखोंकी बात !

  ReplyDelete
 20. गौरी, यस्स.. १२० मिनिटं प्लस अख्खा विकांत :)

  ReplyDelete
 21. हेहे बाबा.. अपर्णाला कारण सांगितलंय बघ :)

  ReplyDelete
 22. विक्रांत.. अगदी बरोबर.. फक्त घरचा राग (घरी काढण्याची टाप नसल्याने) बाहेर फसफसून वाहतो ;)

  ReplyDelete
 23. सागरा, आधीची पोस्ट धरायची होती. ती वाचलीस का? :)

  ReplyDelete
 24. सुहास, खरंच कैच्याकै होतं सगळं.. तुफ्फान डोकं फिरलं होतं.. म्हणून ब्लॉगवर बरसलो ;)

  ReplyDelete
 25. हा हा सिद्धार्थ.. सोपं आहे.. एकमेव नियम.. सँडवीचवाला (उर्फ सलाड, बिर्यानीवाला) आपल्यापेक्षा किमान ६० किलो अधिक भरलेला असावा.. आपोआप डिशशी भांडता येतं. (भांडावं लागतं ;))

  ReplyDelete
 26. sukhee manasa tuza sadara milala asat tar bar zal asat...

  ReplyDelete
 27. हर्षद, वर म्हटल्याप्रमाणे माझ्या अंगावर विराजमान झाल्यावर सदरा पार्टी बदलतो.. ;)

  ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट डेट रहा.

  ReplyDelete
 28. हेरंब, तुझा, अपर्णाचा, श्रीताईचा मेल आय डी मल पाठव ना जरा. तिन्ही सापडत नाहीयेत.

  ReplyDelete
 29. a true 'red letter day'. sagaLyana kadhee na kadhee anubhavayala miLaNara, like it or not...puN shukrawar asel tar yeNarya 2 chaan divasankade baghun nidan sampavata yeto ha sukhee maNasacha divas...

  ReplyDelete
 30. lol... i hope second half day was better... ;)

  ReplyDelete
 31. हाहा स्मिता.. खरोखर असा एखादा डोकं फिरवणारा दिवस उजाडतो आणि सगळ्या दिवसाचा मूड निघून जातो. अर्थात तो शुक्रवार असल्याने नंतर बराच सुसह्य होता :)

  ReplyDelete
 32. हाहा सौरभ.. हो सेकंड हाफ जSSSरासा बरा होता.. :) आणि नंतर तर विकांतच.. हेहे..

  ReplyDelete
 33. वेगवेगळ्या तऱ्हेने कां होईना प्रत्येक सुखी माणसाच्या गोष्टीत असे दिवस असतातच....

  ReplyDelete
 34. बरोबर देवेन. ये तो होताही है. पण कधीकधी जाम वैताग येतो मात्र.

  ReplyDelete
 35. असा त्रास मी अजूनतरी कधी करून घेतलेला नाही... :) कामावर गेलो की मी महिनाभर ना रे!!! :D

  ReplyDelete
 36. हो रे.. तुझी मजा आहे रोहणा.. एकदा गेलास की महिनाभर 'सुखी माणूस' ;)

  ReplyDelete