Monday, April 11, 2011

स्ट्रेस बस्टर क्लब !

तो : हॅलो...... अरे बोल.. कशी आहेस? किती दिवसांनी ग !!

ती : हो रे. परवा राजसच्या वाढदिवसाला फोन करायचा राहूनच गेला ना. सॉरी रे..

तो : अग सॉरी काय त्यात.. चालायचंच..

ती : हो रे.. हल्ली जमतच नाही. प्रिता अजिबात बोलू देत नाही रे फोनवर.. पूर्ण वेळ तिच्याशीच खेळावं लागतं. अनडायव्हर्टेड अटेन्शन !!

तो : हाहाहा.. अग राजसचं काय वेगळं आहे का. त्याचंही सेम अगदी.

ती : हाहाहा. सगळे एकाच माळेचे मणी ! बाकी काय? कसा आहेस तू? राजस काय म्हणतोय? आणि अंकिता?

तो : आम्ही सगळे मजेत एकदम. विशेष काही नाही ग.... टिपिकल. याच्यामागे दिवस कसा संपतो तेच कळत नाही.

ती : अगदी अगदी सेम. प्रितामय आयुष्य आहे सध्या फक्त..... हॅलो... अरे हा रडतोय का? काय झालं रे?

तो : कसलं काय ग.. उगाच.. फोनवर बोलतोय ना मी.. त्याच्याशी खेळत नाहीये.. झाला अपमान साहेबांचा.. म्हणून मग आरडाओरडा चालू आहे. आणि अंकिता किचनमध्ये आहे. याला किचनमध्ये जायचं नाहीये. हॉल,मध्येच खेळायचंय.. म्हणून मी फोनवर बोलायचं नाही.

ती : हाहाहा.. ही बाई आत्ता झोपलीये म्हणून मी सुखात आहे. जरा टीव्ही, नेट, फोन वगैरे बघता येतं..

तो : टीव्ही, नेट, फोन?? किती तास झोपते ही दुपारी?? हेहेहे

ती : गपे... अरे बाबा.. तिन्ही थोडा थोडा वेळ किंवा एकेक दिवस एकेक असं म्हणतेय मी.

तो : हाहा.. माहित्ये ग.. जरा चंमतग.. !! अजून काय? परेश काय म्हणतोय?

ती : तोही मजेत एकदम. आज घरीच आहे..

तो : घरीच? का ग? सगळं ठीक ना?

ती : हो रे.. एकदम ठीक.. अरे आज त्याची डोळ्याच्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट होती दुपारी. ती झाल्यावर घरून काम करतोय.

तो : डोळ्याच्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट? का ग? काय झालं?

ती : अरे विशेष काही नाही... परवा त्याच्या डोळ्याला चमचा लागला.

तो : डोळ्याला चमचा?? काय ग हे? एवढा राग बरा नाही.. अजूनही सुधारली नाहीस तू..

ती : गपे.. माझा कसला डोंबलाचा राग. बाईसाहेबांनी मारला. का तर बाबा आल्याआल्या तिच्याशी न खेळता फोनवर बोलत होता.

तो : बापरे. मग?

ती : अरे विशेष काही नाही. तिच्या त्या खेळण्यातल्या किचन सेटमधलाच होता साधा. पण याच्या डोळ्यातून सारखं पाणी यायला लागलं. म्हणून मग मी म्हंटलं उगाच अंगावर काढू नकोस. ताबडतोब चेक करून घे कसा.

तो : अग गेल्या आठवड्यात सेम आमच्याकडे. मी घरी आलो आणि अर्जंट इश्यु होता ऑफिसचा.. म्हणून आल्या आल्या लॅपटॉप चालू केला तर राजसने काय करावं? एकेक करत त्याच्या दोन कार्स फेकून मारल्या मला आणि वर स्वतःच भोकाड पसरून मोकळा.. मग त्याला खाली फिरवून आणून, आईस्क्रीम खायला घालून आणलं, तासभर कडेवर घेऊन फिरवलं तेव्हा थांबला.

ती : अरे देवा.. आम्हाला तर बाहेर जायचं म्हणजे एक संकट असतं. ज्या दुकानात जाऊ त्या प्रत्येक दुकानातून हिला बाहुल्या, सॉफ्ट टॉईज, किचन टॉईज असं काय काय घ्यायला लागतं. अरे रोज रोज काय घेणार? ऑलरेडी दुकान झालंय आमच्याकडे खेळण्यांचं. हल्ली तर एकदा हिच्यासाठी फिरायला बाहेर जा आणि नंतर हिला घरी परेशकडे ठेवून सामान आणायला जा असं करावं लागतं.

तो : तरी सुखी आहात. आमची बाहेर जायची संकटं वेगळीच आहेत. नियमावली आहे म्हण. बाहेर गेलं की बाहेरच फिरायचं, कुठल्याही दुकानात जायचं नाही, रस्त्यात कोणी भेटलं तर बोलत थांबायचं नाही. रस्त्यात थांबलेलं आमच्या राजेसाहेबांना बिलकुल आवडत नाही. फिरायचं म्हणजे त्याला हवं त्याच रस्त्याने फिरायचं म्हणजे ज्या रस्त्यावर गाड्या सगळ्यात जास्त दिसतात त्याच रस्त्याने जायचं.. आता नेहमी त्याच रस्त्याने कसं जाणार ग? मग बाकीची कामं कशी होणार? म्हणून मग जरा वेगळ्या रस्त्याने गेलो की हा रस्त्यातच तमाशा करायला लागतो. आरडाओरडा काय करतो, उड्या काय मारतो... परवा तर रस्त्यात लोळला अक्षरशः.. लोकं बघायला लागली. अर्थात पूर्वी आम्हीच लोकं काय म्हणतील म्हणून त्याला उचलून घ्यायचो. आता तर पूर्ण कोडगे झालोय.. जे लोक चमत्कारिक नजरेने बघतात त्यांच्याकडे सरळ दुर्लक्ष करायचं किंवा मग तेवढ्याच चमत्कारिक नजरेने त्यांच्याकडे बघायचं. एवढाच पुळका असेल तर घ्या याला, सांभाळा आणि रडायचं थांबला की द्या आणून.

ती : हाहाहाहा... काय रे !! अरे तरी राजस स्ट्रोलरमध्ये तरी बसत असेल ना. आमच्याकडे तर हिला पूर्ण कडेवर घेऊन फिरावं लागतं. बाहेर पडायचं असलं की टेन्शनच येतं आम्हाला. परेशला तर जास्तच. सारखं खांद्यावर घेऊन हिंडावं लागल्याने त्याचे बिचार्‍याचे खांदे दुखायला लागतात. 

तो : अग परेश आणि मी एकाच नावेतले खांदे आहोत... गेल्या विकेंडला इथल्या जवळच्याच एका थीम पार्कमध्ये गेलो होतो आम्ही. म्हंटलं हा जरा मस्त खेळेल, मस्ती करेल.. तर कसलं.. साहेब दिवसभर आमच्या कडेवर.. संध्याकाळी तर खांदा आणि पाठ हे अवयव फक्त दुखण्यासाठीच असतात असं वाटायला लागलं आम्हाला.

ती : हाहाहा.. काय रे...

तो : पुढचं ऐक. आता दिवसभर एवढं दमल्यावर एखादं पोर पटकन झोपेल की नाही रात्री? तर आमच्या साहेबांचं उलटच. त्यादिवशी नेहमीपेक्षा उशिरा झोपला उलट. आमचं आपलं पापण्यांचं वेटलिफ्टिंग चालू आहे आणि साहेब कार फिरवत होते, सायकल चालवत होते.. तेही दोन वाजेपर्यंत.. आम्ही आपले कपाळाला हात लावून बसलेलो.

ती : हाहाहा... विकेंडला पोरांना काय होतं देव जाणे. प्रिता तर बरोब्बर सहाला उठून बसते दर शनिवारी. आणि ती उठली की दुसर्‍या क्षणाला आम्ही उठलंच पाहिजे हा तिचा अलिखित नियम. आणि आम्ही तो मोडला की मग हाSSS  तमाशा.. आणि मग दोघांचीही झोपमोड. म्हणून आम्ही सरळ नंबर लावलेत शनिवारी झोपण्याचे. गेल्या शनिवारी परेशचा नंबर होता उठायचा. आणि तेव्हा तर ही बाय चक्क पाचला उठली रे पाचला. दहाला नाश्ता करताना डायनिंग टेबलवरच हा पेंगायला लागला तर ही टाळ्या वाजवत खिदळतेय.

तो : हाहाहा... बिचारा.. अग उशिरा झोपणं हा तर रोजचा नियम आहे राजससाहेबांचा.. न पाळून सांगतोय कोणाला? सकाळी स्वतः आरामात नऊला उठतो आणि आम्ही आमची सातला उठतानाही मारामार. मग ऑफिसला उशीर. हल्ली तर बॉस विचारतही नाही मला का उशीर झाला म्हणून. "राजस पुन्हा उशिरा झोपला का काल?" एवढंच विचारतो.

ती : हाहाहा.. अरे वा. तुझ्या बॉसला चक्क नाव बिव माहित्ये लेकाचं??

तो : हाहा अग तो तर अजून एक किस्सा आहे.

ती : आता काय अजून?

तो : अग मागे एकदा सकाळी सहाला माझा सेल वाजला. यावेळी कोण कॉल करतंय म्हणून मी धडपडत बघितलं तर चक्क बॉसचा फोन. काहीतरी अर्जंट एस्कलेशन आलं असेल असं समजून मी पटकन फोन घेतला. तर बॉस उलट मलाच विचारतो की तू मला आत्ता कॉल केला होतास का..?? मी म्हंटलं छे !!! मी तर झोपलो होतो. तर म्हणतो की कॉल तर तुझ्याच सेलवरून आला होता. मग माझ्या सगळं लक्षात आलं. हा भाई चक्क लवकर उठून बसून माझ्या सेलशी खेळत होता आणि कुठलीही बटनं दाबत होता. आणि मधेच बॉसला कॉल लागला असावा. म्हणून मग मी त्याला पटकन सॉरी म्हंटलं आणि म्हंटलं की "राजसने खेळताना चुकून लावला असावा.".. तो पण हसायला लागला..

ती : हाहाहा.. काय रे हे.. कमाल आहे.. खरंच यांचे किस्से संपता संपायचे नाहीत. कधी कधी तर इतका वैताग येतो ना काय करावं कळत नाही. वाचन, फिरणं, आपले इतर छंद यांना वेळच मिळत नाही. छंद कसले साधा झोपायला वेळ मिळत नाही.

तो : हो ना. आणि एवढं सगळं करून पुन्हा किंचित काहीतरी बिनसलं की हे पुन्हा भोकाड पसरायला मोकळे. कधीकधी असला वैताग येतो ना. एक द्यावी ठेवून असं वाटतं. 

ती : काय?? तुम्हाला पण?

तो : हाहाहाहा..

ती : किती दिवसांनी बोलतोय रे आपण. आणि पोरं सोडून दुसरा विषय नाही. काय हे !!! हाहाहा..

तो : आयला पण पोरांना शिव्या घालायला काय मजा येतेय ग !! स्ट्रेस बस्टर आहे एकदम. आपली कार्टी एवढी बिलंदर असल्याने चालतंय. दुसर्‍या कोणाशी बोलताना हे असलं बडबडलो तर उद्धार करतील लोक. 

ती : यु सेड इट.. खरंच मोकळं वाटतंय अगदी...

तो : मला वाटतं आपण दर विकेंडला बोललं पाहिजे.. पुढचा आठवडाभर मुलांना सांभाळायची शक्ती येण्यासाठी.. हाहाहा.. 

ती : अगदी अगदी.. खरंच..

तो : मी तुला नक्की फोन करतो पुढच्या विकांतात...

ती : हो नक्की...........

...
..
.

अरे एक मिनिट.. परेश म्हणतोय की तो करेल तुला फोन. त्यालाही बोलायचंय म्हणतोय. हाहाहा..

तो : हाहाहाहाहा !!!!!!!! अगदी अगदी हेच एक्झॅकली अंकिता म्हणाली मला. हाहाहाहाहा !!! ठीके. परेशला सांग अंकिताला फोन करायला. आपण नंतर बोलू. च्यायला त्या 'फाईट क्लब' सारखा 'स्ट्रेस बस्टर क्लब' काढूया आपण चौघे मिळून... हाहाहाहा...

42 comments:

 1. अण्णा हजारेंपासून प्रेरणा घेऊन (पोस्टचे) उपोषण सोडल्याबद्दल अभिनंदन. युवराजांनी तुमच्यादेखील सगळ्या मागण्या मान्य केल्या असाव्यात अशी अपेक्षा आहे.
  बाकी आदितेय महाराज मोठेपणी हे पोस्ट वाचतील तेंव्हा हे आपल्याबद्दल लिहालेलं आहे अशी शंका देखील येऊ नये म्हणून पात्रांची नावे बदललेली दिसतात.

  ReplyDelete
 2. वटवटे इस बॅक...इतका उपवास नको धरत जाऊस यार :) :)

  आदीला काय सांगणार रे, जेव्हा तो ही पोस्ट वाचेल तेव्हा... टेल टेल... ;-)

  ReplyDelete
 3. हा हा हा हा
  मस्त.बर वाटल तुझी पोस्ट वाचून
  तरी बर राजस च्या स्नानाचा विषय नाही काढलास .

  ReplyDelete
 4. सिद्धार्थ +
  आयला ह्यानं सगळंच मनातलं लिहिलंय

  ReplyDelete
 5. चला, वटवट पुन्हा सुरू झाली तर. किती घाबरवतोस रे!
  >> एवढाच पुळका असेल तर घ्या याला, सांभाळा आणि रडायचं थांबला की द्या आणून.
  हाहाहाहाहाहा!

  ReplyDelete
 6. युवराज आदितेयांचा विजय असो ...बस्स... ;)

  ReplyDelete
 7. मस्त मस्त! :D
  शहाण्यांनो, निदान फोन तरी आहे तुमच्याकडे! डोंबिवलीला आमच्याकडे तो पण नव्हता! आणि हे मोबाईल प्रकरण तर तेव्हा नव्हतंच! म्हणजे बघ! स्ट्रेसचं काय होत असेल! :)
  माझी जगदंबा माझं तेव्हा काय करत असेल! :p

  ReplyDelete
 8. चला एकदाच उपोषण संपल...आनंद वाटला.

  सिद्ध +१

  आदितेय मोठा झाल्यावर ह्या सगळ्या पोस्ट त्याच्यापर्यंत नक्की पोहचवल्या जातील ;)

  ReplyDelete
 9. हा हा हा हा!!!!
  जबरा !!!!

  ReplyDelete
 10. हे हे हे...

  हसु आवरतच नाही...

  माझ्याकडे दोन लेकरं आहेत अशीच...बदमाश्...एक तीन वर्षाचं..आणि दुसरं सात महिण्यांचं...

  ही क्लबची आयडीया भन्नाट आहे रे...

  माझी मेबंरशीप आत्तापासुनच...

  ReplyDelete
 11. मस्त छान अनुभवाची सिदोरी चांगली वाटली,

  ReplyDelete
 12. उपोषण.. ख्याख्या.. अरे पोस्ट्सचं अपचन व्हायला लागलं तेव्हा म्हंटलं काहीही झालं तरी आज लिहून टाकायचंच. ही पोस्ट लिहितानाही २-३ ब्रेक्स घ्यावे लागले आहेत. एकदा त्याला पाणी हवं म्हणून, एकदा त्याला लगेच झोपायचं होतं म्हणून आणि एकदा असंच काहीतरी. त्याच्या बाजूला झोपण्याचं नाटक केल्यावर बऱ्याच वेळाने तो झोपल्यावर आणि मला आलेली प्रचंड झोप बाजूला सारून लिहिलंय हे. आता तूच ठरवा कोणी कोणाच्या मागण्या मान्य केल्या ते..

  >> बाकी आदितेय महाराज मोठेपणी हे पोस्ट वाचतील तेंव्हा हे आपल्याबद्दल लिहालेलं आहे अशी शंका देखील येऊ नये म्हणून पात्रांची नावे बदललेली दिसतात.

  हाहाहा.. अगदी बरोबर !

  ReplyDelete
 13. माझा उपवास नाही रे. वेळेने उपास धरलाय. अगदी मोजून मापून मिळतो ! असो.. त्याला काय सांगणार. त्याच्या नावाचा पुरावा मी पोस्टमध्ये म्हणून तर ठेवलेला नाहीये ;)

  ReplyDelete
 14. धन्स सागरा.. स्नानासाठी नवीन पोस्ट लिहावी लागणार इतका अपार आहे स्नानमहिमा :)

  ReplyDelete
 15. आप्पा धन्स.. पोटातलं ओठावर आलं खरं ;)

  ReplyDelete
 16. आभार्स कांचा, अग अधून मधून जरा वेळेशी फायटिंग होते आणि नेहमीप्रमाणे मी हरतो.. आज जिंकलो म्हणून लगेच वटवटून घेतलं :)

  पोस्ट नाही म्हणून घाबरलीस? आभार.. (पोस्ट आली की लोकं घाबरतात असा पूर्वानुभव असल्याने :P)

  ReplyDelete
 17. हाहाहा.. धन्स देवेन.. एकदम डिप्लोमॅटिक ;)

  ReplyDelete
 18. हाहा.. अग मी नेहमी म्हणतो मागच्या पिढीच्या पेशन्स लेव्हलला आम्ही लोकांनी सदैव मानाचा मुजराच करायला हवा.. अर्थात आमच्या पिढीने आई-बापाला या पिढीएवढा त्रास दिला नाही हेही खरं.. नाही का ? ;)

  ReplyDelete
 19. हाहा धन्स योगेश्वरा..

  >> आदितेय मोठा झाल्यावर ह्या सगळ्या पोस्ट त्याच्यापर्यंत नक्की पोहचवल्या जातील ;)

  बिनधास्त पोचावा.. या पोस्ट्स राजस आणि प्रितावर लिहिलेल्या आहेत :P

  ReplyDelete
 20. हेहे.. धन्स धन्स राजे..

  ReplyDelete
 21. हाहाहा.. खूप आभार्स सारिका..

  अग आमची एकाला सांभाळताना त्रेधा उडाली आहे. तुझी दोन लेकरं आहेत म्हटल्यावर तर तुला मेंबरशीप डोळे झाकून मिळणार :)

  ReplyDelete
 22. काका, अनेक आभार.

  ReplyDelete
 23. A, आभार आणि स्वागत.

  ReplyDelete
 24. देवदत्त, खूप धन्स.. :)

  ReplyDelete
 25. :)
  :)
  :)
  हेरंबा अरे कालच वाचली तुझी पोस्ट... मग म्हटलं कमेंटूया जरा सवडीने... रागावायचे आहे तूला, का रे आमच्या आदिच्या अश्या तक्रारी सांगतोस :) वर आणि पात्रांची नाव बदलतोय होय रे.... अरे आडातलेच आहे पोहऱ्यात... ’त’ म्हणता पिल्लू ताकभात लगेच ओळखेल :)

  मस्त लिहीलेयेस :) ...

  माझ्यामते त्या बाकि ३५ तश्याच ना अजून :)

  लिहीत जा वेळच्या वेळी... ही सुचना नव्हे धमकी आहे नाहितर आम्ही सगळे आदिला तुझे नाव सांगू :) (त्याची माझी मेलामेली वाचतोस ना तू ;) )

  ReplyDelete
 26. लई भारी...रस्त्यात गडाबडा लोळणे... प्रचंड वाटलं... :D:D
  आदिराजांचा विजय असो.. मजा आली!

  ReplyDelete
 27. लय भारी ....
  आदिराजांमुळे सत्यवान फार्मात आले.

  ReplyDelete
 28. >> का रे आमच्या आदिच्या अश्या तक्रारी सांगतोस :)

  अरे काय तुम्ही सगळेजण असे कम्फुज्य होताय? ही आदितेयची नाही राजस आणि प्रिताची गोष्ट आहे. त्यांच्या आई-बापाने त्यांच्या केलेल्या तक्रारी आहेत :P हेहेहे

  आभार्स ग.. त्या ३५ कधी होतील, होतील की नाही काही कळत नाही.. बघू प्रयत्न चालू आहेत :)

  वेळच्यावेळी लिहायचा प्रयत्न चालूच आहे. पण तो महिन्यातून एकदा साफल होतो :P हेहे.. धन्स..

  ReplyDelete
 29. बाबा, अरे एकदा राग आला की तो रस्त्यात, दुकानात, जिन्यात जिथे असेल तिथे लोळतो आणि हा राग फार पटापट येतो :)

  ReplyDelete
 30. हेहे सपा.. धन्स धन्स :)

  ReplyDelete
 31. हेरंब, अरे किती मस्त लिहितोस. झकास

  ReplyDelete
 32. मनःपूर्वक धन्यवाद राहुल :)

  ReplyDelete
 33. या विकेंडला स्ट्रेस बस्टरची जाम गरज होती...पोस्ट यकदम फ़क्कड झालीय...अगदी आमच्याच घरातली वाटतेय....वाचताना आपला मागचा फ़ोन आठवत होते..म्हणजे जे बोलायचं होतं ते बोललो पण सुरुवात आणि शेवट मुलांवरुनच.....:)

  ReplyDelete
 34. >> या विकेंडला स्ट्रेस बस्टरची जाम गरज होती..

  कधीही.. स्ट्रेस बस्टर क्लबमध्ये स्वागत !! ;)

  हाहा.. आपली बोलणी मुलांवरून सुरु होऊन मुलांवरच संपणार.. मध्ये १-२ माफक फिलर्स असणार फक्त..

  अग या पोस्टमध्ये लिहिलेला किस्साही घडलेला आहे गेल्या आठवड्यात.. भारतातल्या एका जुन्या मैत्रिणीशी बोलत होतो आणि तेव्हा स्ट्रेस बस्टर क्लबची स्थापना केली आम्ही... आता सुखात आहोत :P

  ReplyDelete
 35. poorvee mhaNaje early ninetees eka weekend la amhee aNee mitrache kutumb world trade center la gelo hoto ( ho khoop poorveech mhaNava lagel ata!) , tithalya baherchya desk varchee kanya mhaNalee 'you can leave your jackets here if you like'.tar mitra mhaNala "can we leave the kids too?" tee mhaNalee " no I am sure you will forget to collect them!" tyacheech athavaN zalle tuzee firNyachee/ firavun AnNanyachee kahaNee vachun, nice post.:-))

  ReplyDelete
 36. हाहाहाहा.. अगदी असंच काहीसं चालू असतं आमच्याकडे. आमच्याकडे कोणी पाहुणे वगैरे आल्यावर निघताना ते लेकाला विचारतात "येतोस का रे आमच्याबरोबर?" तर तो काही हो-नाही म्हणायच्या आधी आम्ही दोघेच लगेच म्हणतो "हो प्लीज घेऊन जा. सावकाश तीन-चार दिवसांनी आणून दिलंत तरी चालेल" ;) .. हेहेहे

  ReplyDelete
 37. आमचा सूडकरी अडीच वर्षे मांडीवरुन खाली ठेवले की लगेच गळा काढून भेकायचा. कसे त्याला कळायचे कोण जाणे, जरा गादीवर ठेवले की भोकाड. रिक्षातून मध्यरात्री बाबा फिरवायचा तेव्हां मस्त वार्‍यावर गुडुप झोपायचा. रिक्षा थांबली की पुन्हा भोकाड.

  आमचा स्ट्रेस बस्टर होता, " ओये ओये.... " :D:D

  ’त’ म्हणता पिल्लू ताकभात लगेच ओळखेल :)
  +100... :)

  ReplyDelete
 38. सूडकरी... हाहाहाहा :)

  हो मला आठवतंय मागे एकदा तू म्हणाली होतीस 'ओए ओए' बद्दल :)

  थोडक्यात सगळे सूडकरी एकसारखेच :P

  ReplyDelete
 39. आयला पण पोरांना शिव्या घालायला काय मजा येतेय ग !!
  हा हा ... अगदी अगदी मज्जा निदान मला वाचायला तरी मज्जा आली... :)
  चायला.... हेरंब.. मला उगाच आधीपासून टेन्शन... :D

  ReplyDelete
 40. हेहे रोहणा.. मलाही लिहायला मजा आली जाम :P

  टेन्शन घेऊ नको रे.. (काही फायदा नसतो टेन्शन घेऊन एवढंच सांगायचंय ;) )

  ReplyDelete