Friday, May 13, 2011

कंपोस्ट-३ : गुग्ल्या आणि कं

- तुम्ही ब्लॉग लिहीत असाल,

- ब्लॉगवर मोठमोठाल्या पोस्ट्स टाकत असाल,

- आणि त्या मोठमोठाल्या पोस्ट्स पब्लिश करायच्या आधी ब्लॉगरवर सेव्ह न करता 'घमेल्या'तल्या ड्राफ्टमधे सेव्ह करत असाल...

वर सांगितलेल्या तिन्ही अटींमध्ये तुम्ही-म्हणजे तुमचा ब्लॉग-बसत असेल तर ही छोटीशी पोस्ट उर्फ कंपोस्ट तुमच्यासाठीच आहे. (नाही. ब्लॉगर कित्येक तास बंद पडलं होतं त्याच्याशी या कंपोस्टचा काहीही संबंध नाही.)

पण यावेळी थोडं वेगळं आहे. ही कंपोस्ट  माझ्या कं विषयी नसून राजाधिराज, सिंहासनाधिश्वर, महासम्राट (गो-ब्राह्मणप्रतिपालक मुद्दाम लिहिलं नाहीये. उगाच वाद होतात त्या शब्दाने ;) ) गुगल महाराजांच्या कं विषयी आहे. आणि कंपोस्ट असल्याने अर्थातच छोटीशी आहे.

पेबची गोष्ट  लिहिताना आठवून, वेळ काढून, तुकड्यातुकड्यात लिहायला मला जवळपास ४-५ दिवस लागले होते. चांगली सवय की वाईट सवय किंवा चूक की बरोबर ते माहित नाही पण पोस्ट लिहिताना मी ती घमेल्याच्या मसुद्यांमध्ये (जीमेल ड्राफ्ट) मधे लिहितो. थोडा भाग लिहून झाल्यावर लिखाण बंद करायचं असेल तर ते तिकडेच सेव्ह करून ठेवतो. तर त्या सवयीप्रमाणे ४-५ रात्री जागून लिहून शुक्रवारी रात्री (अ‍ॅक्च्युअली शनिवारी पहाटे) पेब बर्‍यापैकी पूर्ण केलं आणि शनिवारी सकाळी पुन्हा एकदा नीट वाचून चेक करून पहिला भाग टाकायचा असं ठरवलं.

पण शनिवारी सकाळी उठून बघतो तर काय !! शेवटचे दोन भाग गायब !! पुन्हा पुन्हा शोधलं पण जैसे थे. आणि नेमका मी पहिला भाग जस्ट टाकला होता. त्यामुळे रात्री बसून शेवटचे दोन भाग संपवायचे असं ठरवलं आणि त्याप्रमाणे शनिवारी रात्री बसून ते संपवलेही. एकच चूक केली की सगळे भाग वेगवेगळया ड्राफ्टसमधे सेव्ह करण्याऐवजी एकत्र सेव्ह केले आणि रविवारी सकाळी व्हायचं तेच झालं. पुन्हा दोन भाग गायब होते !!!!

आधीच्या वेळी कदाचित अति झोप आल्याने मी सेव्ह करायला विसरलो असेन (खरंतर ड्राफ्टस ऑटोसेव्ह होतात.. पण तरीही) असा संशयाचा फायदा मी घमेल्याला दिला होता पण यावेळी मात्र मला पक्कं आठवत होतं की मी ड्राफ्ट नक्की सेव्ह केला होता. आणि त्यानंतर आयुष्यात पहिल्यांदा मी गुग्ल्यावर अविश्वास व्यक्त केला. प्रचंड राग आला होता त्याचा. तोवर दुसरा भाग टाकून झाला होता. त्यामुळे त्या रात्री (म्हणजे रविवारी रात्री, सोमवारी सकाळी ऑफिसला जायचं असूनही) रात्रभर जागून पुन्हा एकदा शेवटचे दोन भाग नीट लिहून काढले आणि सगळे भाग वेगवेगळ्या ड्राफ्टसमधे सेव्ह केले. मग उरलेल्या दोन दिवसात शेवटच्या भागांवर फायनल हात फिरवून ते पोस्ट केले.

नंतर 'इनसाईड जॉब' बघून झाल्यावर पुन्हा एकदा लंब्याचवड्या पोस्टस  लिहायची खुमखुमी आली :P .. पण यावेळी आठवणीने वेगवेगळे ड्राफ्टस बनवले होते. पण तरीही प्रत्येक भागाला वेगळा ड्राफ्ट बनवला नव्हता.. एका ड्राफ्टमधे दोन-तीन भाग एकत्र असं सेव्ह केलं आणि व्हायचं तेच झालं. शेवटचे दोन भाग पुन्हा यावेळीही उडाले. !!!! :(

त्यानंतर आधीप्रमाणेच जागरणं करून, पुन्हा पुन्हा माहितीपट बघून सगळे भाग पुन्हा लिहिले. या सगळ्याला जवळपास १५-२० दिवस लागले आणि थोडक्यात पोस्ट किमान वीस दिवसांनी तरी लांबली. यावेळी मात्र एका भागाला एक ड्राफ्ट असं करून पोस्ट्स सेव्ह केल्या असल्याने वाचलो.

दोन्ही पोस्ट्स पूर्ण लिहून झाल्यावर सहज कुतूहल म्हणून नेटवर ड्राफ्टच्या साईझ लिमिटबद्दल काही माहिती मिळते का म्हणून शोधाशोध केली (म्हणजे पुन्हा गुगलवरच.. आईशप्पत $%^$). अर्थातच कुठेच काहीच सापडलं नाही. मग पुन्हा एकदा माझ्या पोस्ट्स बघितल्या आणि एक गोष्ट लक्षात आली. 'पेब' चे पाहिले पाच भाग मिळून अंदाजे ३२७५ शब्द होतात आणि 'इनसाईड जॉब'चे पहिले तीन भाग मिळून अंदाजे ३७१७ शब्द होतात. थोडक्यात घमेल्याच्या ड्राफ्टसमधे या आकड्यांच्या आसपास कुठेतरी काहीतरी गफलत नक्की आहे. यापेक्षा जास्त शब्दसंख्या झाली की घमेलं टांग देतं. अजिबात रिस्क घ्यायची नसेल तर ३००० शब्द अँड दॅट्स ऑल असं म्हणू. !!

वरची सगळी बडबड ऐकून तुमच्या डोक्यात दोन विचार नक्की आले असतील. एक म्हणजे ही खरंच कंपोस्ट असेल तर हा एवढी बडबड का करतोय.. ही खरंच कंपोस्ट आहे का? तर हो आहे. कारण आता लवकरच ही संपणार आहे

आणि दुसरी गोष्ट म्हणजे "च्यायला, ब्लॉगसाठी हा किती मेहनत करतो, दोन-चार रात्री जागतो, १५-२० दिवस लिहीतो अँड व्हॉट नॉट !!" हे दाखवण्यासाठी हे लिहिलंय असं वाटतंय. किंबहुना आता वाचताना मलाही ते तसंच वाटतंय ;) ... पण तरीही तुम्हाला बरं वाटावं म्हणून क्षणभर ते खरं आहे असंही समजू पण तरीही एवढी बडबड वाचल्यावर तुम्हाला ३००० शब्दांच्या लिमिटविषयी तरी कळलं ना? आणि तेही न जागता ;) थोडक्यात आपल्या दोघांसाठीही विन-विनचं आहे हे.. नाही का?

तर तात्पर्य एकच.... ३००० शब्दांपेक्षा जास्त शब्दांचे लेख गुगल ड्राफ्टमधे सेव्ह करू नका आणि केलेत तर विसरून जा कारण कितीही कामसू आणि आज्ञाधारक असला तरीही गुग्ल्यालाही कधीकधी कं येतोच !! ;)


* तळटीप : ही पोस्ट मात्र (कंपोस्ट असल्याने) एका बैठकीतच संपवलेली आहे ;)

62 comments:

 1. म्हूनशान आमी ड्राफ्ट सेव करायला बराहा वापरतो ...ताच बरा....आपला काम आपल्या कडे ठेवा उगाच गुग्ल्याला किती तरास देणार...

  ReplyDelete
 2. आयला एवढ्या मोठ्या पोस्ट लिहण मला तरी जमणार नाही, ती काळजी तू आणि बाबा ने घ्यायला हवी...

  तरी घमेल्याची साईज मर्यादित आहे ही माहिती उत्तम.. धन्स रे :)

  ReplyDelete
 3. आयला हे माहिती नव्हते !!

  ReplyDelete
 4. पुन्हा एकदा नवीन माहिती. :)
  फार मोठा लिहीणं तसं नाहीच झेपत मला...इटुकलं पिटुकलं आपलं बरं. आणि स्वत:लाच एक मेल पाठवून देते...म्हणजे मेलबॉक्समध्ये सुरक्षित. :)

  ReplyDelete
 5. navin mahiti :)

  thanks heramb !!

  kal bloggers band hota tyamule me shvatachi takaleli post gayab zali hoti repost karavi lagali :(

  ReplyDelete
 6. >>>>>आयला एवढ्या मोठ्या पोस्ट लिहण मला तरी जमणार नाही, ती काळजी तू आणि बाबा ने घ्यायला हवी...

  तरी घमेल्याची साईज मर्यादित आहे ही माहिती उत्तम.. धन्स रे :) +100

  मी तर माझ्या पोस्ट्स डायरीत लिहीते बाबा.... घोळच नको :) .... आता ती डायरी गौरापासून वाचवण्याचे दिव्य पार पाडावे लागते हा भाग वेगळा.... कारण नेमक्या त्याच डायरीत तिलाही पोस्ट्स ( ;) ) लिहायच्या असतात :)

  बाकि हेरंबा मानले बुवा तूला..... कारण कर्केच्या आळश्यांकडून इतकी मेहेनत होणे अवघडच, त्यात जर त्यांना खरच एखादी गोष्ट मनापासून आवडत असेल तर काही शक्य आहे असे मानले तर ब्लॉगिंग तूला किती मनापासून आवडते ते लक्षात येते :)

  ReplyDelete
 7. ३००० शब्द सुचतात कसे राव?

  ReplyDelete
 8. ३०००.....आम्ही ३०० मध्येच तंबुत परततो...त्यामुळ तुला जर तुझ्या गुगल्याच घमेल कमी पडल तर माझ्या खात्यावरच घमेल वापर...मी देइन तुला*

  *-अटी लागु ;)

  ReplyDelete
 9. अरे हो... माझ्याबरोबर असे एकदा झाले होते... म्हणजे एखादा ड्राफ्ट तर उडतोच पण ड्राफ्ट मेल मोठा असेल तर त्याचा शेवटचा भाग देखील उडू शकतो.

  म्हणून मोठा पोस्ट असेल तर २-३ ड्राफ्ट मेल्स मध्ये ठेवायचा.

  आता त्यात ब्लॉगरची भर पडली आहे... ही कमेंट सुद्धा सेव्ह करून ठेवतो नाहीतर........... हेहेहे..

  ReplyDelete
 10. http://explore.live.com/windows-live-writer?os=other he waafrun faha :)

  ReplyDelete
 11. गूगलला विंडोज्‌ लाईव्हचा पर्याय? म्हणजे आगीतून फुफाट्यातच की!! ;)

  बाकी बरहाने लिहून नोटप्याड/वर्डप्याडात शेव करणं ब्येष्ट्ट!!!

  ReplyDelete
 12. एका वेळी तीन - चाळ ओळी अश्या कूर्मगतीने ’बराहा डायरेक्ट’ वापरून आपल्या लाडक्या टेक्स्ट एडिटरमध्ये सेव्ह करत रहायचं. एक दिवस त्या पोस्टचं भाग्य उजाडतं आणि ती पूर्ण होते. मग ठरवायचं - हे लिखाण फक्त ‘आत्मनेपदी’ आहे, का ‘मोकळे आकाश’वर टाकण्यासारखं. मग ब्लॉगवर नुसतं कॉपी - पेस्ट मारून पोस्टायचं. हाकानाका. बाकी माझ्या पोस्टीने ३००० शब्दांची लक्ष्मणरेखा ओलांडण्याची शक्यता कमीच :)

  एक शंका ... हा ३००० चा प्रॉब्लेम शेड्यूल्ड पब्लिशला पण येतो, का फक्त अनपब्लिश्ड ड्राफ्टला?

  ReplyDelete
 13. तुला ठेच लागल्यावर तू मागच्यांना शहाणं करून सोडतोयस हे महत्वाचं! :)
  धन्स रे!

  ReplyDelete
 14. ३००० शब्द? गरीबाच्या १० पोस्ट होतील तेवढ्यात... :)
  तरीपण हे माहिती नव्हतं.. धन्यवाद... :)

  ReplyDelete
 15. ३००० शब्द म्हणजे बरहाची पाच पानं.. बापरे माझी पोस्ट नॉर्मली बरहाचं एक किंवा दोन पानं असते. फॉंट साइझ १२ वापरून..
  पण माहीती चांगली आहे.( मी गुगल वापरत नाही तरीही- मी बरहा वापरतो )

  ReplyDelete
 16. धन्यवाद हेरंब!

  ReplyDelete
 17. बझ्झ ५०० कमेंटनंतर आणि घमेल ३००० शब्दानंतर झोपते हा शोध लावल्याबद्दल मंडळ आभारी आहे.

  बाकी मराठीत टंकलेलं काहीही गायब झाले की जाम मनस्ताप होतो.

  ReplyDelete
 18. Thanks for sharing Heramb.

  मला असा अनुभव आला नाही (कारण मी एवढ्या मोठ्या पोस्ट लिहायचे कष्ट घेत नाही. आळस हा कधी कधी मित्र सुद्धा असतो :ड). तरी लक्षात ठेवेन.

  आणि तुला मानलं बॉ. माझी एक कथा अशीच २ वेळा डिलीट झाली तर मी तिसर्‍यांदा लिहिण्याचे कष्ट न घेता सरळ एक वाईट शेवट करुन टाकला :O

  ReplyDelete
 19. हो. ही अगदी खरी गोष्ट आहे. मी शब्दमर्यादा किती हे पाहिलं नव्हतं पण फार मोठा ड्राफ्ट सेव्ह केला तर तो उडतो, गुगल्याला तशा सूचनाबिचना देण्याचाही कं आहे. ही गोष्ट केवळ घमेल्यालाच नाही तर सेंडण्यालाही लागू पडते. एक मोठा लेख ईमेलने तीन वेळा पाठवूनही जेव्हा अर्धाच गेला, तेव्हा लक्षात आलं.

  ReplyDelete
 20. नविन माहिती दिल्याबद्दल स्वामी आपले आभारी आहेत !!!
  सध्यातरी आम्ही इटुकले-पिटुकले लेख अणि कविता टाकतोय ( ज्या वाचण्याचे कुणी कष्ट घेत नाही ! ) , पण भविष्यात मोठ्ठाले लेख लिहिण्याचा मानस असल्याने आणि आम्हीदेखील घमेल्यात शेव करत असल्याने ही पूर्वसूचना आमच्या कामी येईल.
  पुन्हा एकदा हाबार्स !!!
  ( ३००० शब्द !!! अब्बबबब !!! कसे लिहितोस सत्यवाना ? )

  ReplyDelete
 21. @alhadmahabal Raje, waafrun pahaa :) Offline tool aahe. works for me at least.

  ReplyDelete
 22. हेरंब, मलाही हे माहीतच नव्हते.

  मागे मी ’ नको म्हंटले होते ना... तरीही ’ हे लिहीत असताना काही वेळा संपूर्ण पोस्टच्या पोस्ट उडल्या होत्या. पण ते मी ब्लॉगरमधेच लिहीत होते. कारण मला अजूनही कळलेलेच नाही म्हणा... :(

  बरे झाले तू ही ’ ठेच ’ सांगितलीस. कधी कधी प्रथम लिहीलेले पुन्हा लिहीण्यात लिखाणाचा आत्माच हरवतो...

  ReplyDelete
 23. इथे बहुतेक जन बरहा वापरतात असे दिसते...मी तर quillpad च वापरतो नाहीतर मग google transliteration
  आणि एवढ्या मोठ्या पोस्ट तर कधी जमायच्याच नाहीत आपल्याला...

  ReplyDelete
 24. अपर्णा, बरहामधे ड्राफ्ट सेव्ह करता येतात? म्हणजे बरहा लोकल डिस्क वापरतं का? सहीये. मीही निदान सेव्ह करण्यासाठी तरी बरहा वापरेन.. टंकायला आपलं गुगल इमे बरं.

  ReplyDelete
 25. हाहा सुहास.. अरे मलाही मोठ्या पोस्ट्स लिहायला कंटाळाच येतो पण कधी कधी अगदी नाईलाज असतो. उगाच छोटंसं लिहिलं तर त्या विषयावर अन्याय केल्यासारखं होतं. म्हणून कंटाळत का होईना लिहितो बापडा. :)

  ReplyDelete
 26. बरंय ना राजे. पोस्ट न् गमावता नवीन माहिती मिळाली की नाही :)

  ReplyDelete
 27. अनघा :)

  दोनदा हात पोळून घेतल्यावर मिळाली आहे ही माहिती :)

  तुझ्या पोस्ट्स बेस्ट असतात. कमीत कमी शब्द आणि जास्तीत जास्त अर्थ..

  ReplyDelete
 28. निवेदिता :)

  अग ब्लॉगरच्या म्हणण्याप्रमाणे आता सगळ्या पोस्ट्स रिस्टोर झाल्या आहेत आणि कमेंट्स रिस्टोर करताहेत.. मग तुझ्या ब्लॉगवर ती पोस्ट दोनदा दिसते आहे का आता?

  ReplyDelete
 29. बापरे तन्वी... खरं तर तुला मानायला हवं. तू एकदा डायरीत आणि मग ब्लॉगवर लिहितेस? सही.. प्रत्यक्ष लिहिणं (आणि त्यात पुन्हा मराठी) तर मी आता विसरूनच गेलो आहे. पूर्वीचं चांगलं अक्षरही आता बिघडलं :(((

  >> ब्लॉगिंग तूला किती मनापासून आवडते ते लक्षात येते

  वो तो है.. कोई शक्क्क्क !! :P

  ReplyDelete
 30. आप्पा, एकदम नाही रे सुचत.. म्हणून तर आठवडेच्या आठवडे लागतात पोस्ट्स टाकायला ;)

  ReplyDelete
 31. यवगेशसाई, तुमच्या घमेल्यातलं काही कधीच हरवणार नाही आणि हरवलं तरी तुम्ही चमत्कार करून, मुठीतून राख काढावी तशी पोस्ट काढाल ;)

  ReplyDelete
 32. बरोबर रोहन.. माझे असेच शेवटचे भाग उडाले दोन्ही वेळा.. पूर्ण ड्राफ्ट कधी उडाला नाहीये अजून सुदैवाने.

  >> आता त्यात ब्लॉगरची भर पडली आहे..

  नाहीतर काय रे.. कधीपासून पोस्ट्स, कमेंट्स रिस्टोर होतील म्हणून थापा मारतायत.. च्यायला फटके दिले पाहिजेत लॅरीला..

  ReplyDelete
 33. अरविंदा, खाल्ल्या मिठाला जागतोयस होय रे?? :P

  ReplyDelete
 34. आल्हाद, हाहा..

  >> बाकी बरहाने लिहून नोटप्याड/वर्डप्याडात शेव करणं ब्येष्ट्ट!!!

  अरे पण खिडक्या-क्षप असेल तर नोटप्याड/वर्डप्याडात शेव होत नाही. ७-खिडक्या लागतात त्याच्यासाठी. :(

  ReplyDelete
 35. गौरी, आल्हादला म्हणालो त्याप्रमाणे नॉटपॅडमधे देवनागरी सेव्ह होण्यासाठी ७-खिडक्या लागतात :( माझ्या एका लॅपटॉप क्षप आहे आणि एकावर ७ आहे. त्यामुळे मी सरळ गुगल ड्राफ्टमधेच सेव्ह करतो.


  >> हा ३००० चा प्रॉब्लेम शेड्यूल्ड पब्लिशला पण येतो, का फक्त अनपब्लिश्ड ड्राफ्टला?

  नाही हा प्रॉब्लेम ब्लॉगरमधल्या ड्राफ्टला येत नाही (म्हणजे नसावा).. हा जीमेलच्या ड्राफ्टला येतो.

  ReplyDelete
 36. हो ना बाबा. कधीपासून हे सगळ्यांना सांगायचंच होतं.. दोनदा ठेच खाल्ल्यावर मुहूर्त लागला.

  ReplyDelete
 37. ख्या ख्या ख्या प्राची..

  "आमच्या मुलांना ९५ टक्के मार्क्स मिळतात..... दोघांत मिळून" वाला जोक आठवला.. (हघे)

  ReplyDelete
 38. काका, मलाही खरंतर छोट्याच पोस्ट्स टाकायला आवडतात. पण गेल्या काही पोस्ट्स छोट्या होणं शक्यच नव्हतं.. त्यामुळे टंकत बसलो :(

  ReplyDelete
 39. आभार विनायककाका.

  ReplyDelete
 40. ५०० चा शोध जुनाच आहे.. त्याचं श्रेय देवकाकांना आणि बझमंडळाला.. ३००० वाला शोध वरिजनल आहे. ;) बोटं दोनदा जळाल्यानंतर लागलेला.


  >> बाकी मराठीत टंकलेलं काहीही गायब झाले की जाम मनस्ताप होतो.

  अगदी अगदी !!!

  ReplyDelete
 41. >> आळस हा कधी कधी मित्र सुद्धा असतो

  हाहा खरंय तृप्ती.. माझा तर तो भलताच जीवाभावाचा मैतर आहे. फक्त ब्लॉग लिहिताना बऱ्याचदा पळून जातो तो.

  >> माझी एक कथा अशीच २ वेळा डिलीट झाली तर मी तिसर्‍यांदा लिहिण्याचे कष्ट न घेता सरळ एक वाईट शेवट करुन टाकला

  अग माझंही तसंच झालंय खरंतर. गायब होण्यापूर्वी जे लिहिलं होतं ते आत्तापेक्षा जास्त चांगलं जमलं होतं (दोन्ही प्रसंगांत) असं मला अजूनही वाटतंय. :(

  ReplyDelete
 42. >> गुगल्याला तशा सूचनाबिचना देण्याचाही कं आहे.

  परफेक्ट !! माझंही अगदी हेच म्हणणं होतं. अरे काहीतरी सूचना देण्याची पद्धत नको का ?? :(

  बरोबर आहे तुझं. हे सेंडण्यालाही लागू पडतं. मोठ्या लेखांचे शेवटचे भाग गायब होतात सेंडताना.

  ReplyDelete
 43. स्वामी, असं कसं.. आम्ही वाचतोय की. आणि बरेच जण वाचतायत रे.. काळजी नको.

  येउदे येऊदे मोठ्या पोस्टा. वाट बघतोय.

  ReplyDelete
 44. अरविंद, वापरलंय मी हे आधी. आधी नावावरून लक्षात आलं नव्हतं. डालो केल्यावर लक्षात आलं. चांगलं आहे.

  ReplyDelete
 45. श्रीताई, बापरे.. म्हणजे हे शब्दसंख्येचं बंधन फक्त घमेल्याला नाही तर ब्लॉगरला सुद्धा आहे तर.. !!

  >> कधी कधी प्रथम लिहीलेले पुन्हा लिहीण्यात लिखाणाचा आत्माच हरवतो.

  अगदी अगदी सहमत. पहिल्या वेळी लिहिताना एकदम नैसर्गिकरीत्या आलेलं असतं. दुसऱ्या वेळी लिहिताना आपण 'आधी लिहिलं तसंच' लिहायला जातो आणि एकदम कृत्रिमता येते लिखाणात :(

  ReplyDelete
 46. सागर, तू google transliteration वापरत असशील तर मग गुगल IME वापरून बघ. IME वापरणं तुला खूप सोपं जाईल. मीही पूर्वी google transliteration च वापरायचो काही दिवस.. पण नंतर इमे वापरायला लागलो.

  ReplyDelete
 47. हेरंब, Notepad नाही, Notepad++. हे एक फ्रीवेअर टेक्स्ट एडिटर आहे. (Textpad सारखं)त्यात देवनागरी सेव्ह होतं.

  ReplyDelete
 48. ओह ऐसा क्या... !!! बघतो बघतो हे ट्राय करून.. धन्स गौरी.

  ReplyDelete
 49. "Textpad"?

  नक्की "Notepad" म्हणायचंय कि "Wordpad" ?
  Notepad मधेही देवनागरी सेव होतं

  टग्या

  ReplyDelete
 50. टग्या,

  खिडक्या-क्षप : नोटपॅड मधे देवनागरी लिखाण सेव्ह करताना खिडक्या वॉर्निंग देतात.. आणि नंतर उघडून बघताना लिखाणाच्या ऐवजी ???? दिसतात.

  खिडक्या-७ : यामध्ये तुम्ही म्हणता ते योग्य आहे.

  ब्लॉगवर स्वागत आणि प्रतिक्रियेबद्दल आभार.

  ReplyDelete
 51. That is new information.Actually,experienced same with google docs.

  ReplyDelete
 52. Thanks Anee. Haven't used g-docs much extensively. But thanks for the info.

  ReplyDelete
 53. new info.. new joy with it.
  Thanks for sharing..

  ReplyDelete
 54. हेहेहे.. धन्स योग :)

  ReplyDelete
 55. Google Docs हा पण ड्राफ्ट संरक्षित करण्यासाठी चांगला पर्याय आहे. त्याला काही शब्द मर्यादा असावी असे वाटत नाही.

  ReplyDelete
 56. गूगलच्या IME प्रमाणेच विशालऑन.नेट वरून एक प्रोग्रॅम घेउन वर्ड मधे (क्षप असल्यास)टाईप करता येतं. इथला एडिटर हा 'गमभन' च्या जवळचा आहे त्यामुळे पुन्हा नवा लर्निंग कर्व्ह नाही.
  http://www.vishalon.net/LinkClick.aspx?fileticket=UsZQQPB3JPo%3d&tabid=287&mid=613

  ReplyDelete
 57. विनय, बरोबर.. कदाचित गुगल डॉक्स हा चांगला पर्याय असावा. आता तोच वापरायचं ठरवलं आहे. धन्यवाद...

  ReplyDelete
 58. किरण, वा हा पर्याय देखील मस्तच आहे. वापरून पाहायला हरकत नाही.. धन्यवाद..

  ReplyDelete
 59. तू आणि तुझी "वटवट"......लई आवड्या....!!
  तुझं लिहिणं येडं करून सोडतं रे बाबा....! :)

  ReplyDelete
 60. हेहे.. धन्स धन्स चैताली.. बऱ्याच पोस्ट्स वाचल्यास वाटतं.. (आणि तरीही असं म्हणते आहेस म्हणजे ;)) )

  प्रतिक्रियेबद्दल आभार्स आणि ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत राहा.

  ReplyDelete
 61. मला तर मोठ्या मोठ्या पोस्ट लिहायला तसाही कं येतो आणि मी जे काही ड्राफ्ट असते ते वर्डप्रेसमध्येच साठवून ठेवतो..तरीही न जागता घमेल्याविषयी ही माहिती मिळाली,हे ही नसे थोडके... विन विन ... :)

  ReplyDelete
 62. हाहा देवेन.. जनकल्याणार्थ प्रकाशित ;)

  ReplyDelete