Thursday, May 3, 2012

स्र आणि स्त्र


तो : इस्त्रायल की इस्रायल?

मी : काय?

तो : इस्त्रायल की इस्रायल? कसा करशील उच्चार?

मी : इस्त्रायल.. अर्थात..

तो : नाही. काहीतरी चुकतंय.. इस्त्रायल नाही असू शकत.

मी : का?

तो : अरे स्पेलिंग बघ न इस्रायलचं..  I S R A E L.. it IS  इस्रायल.

मी : हो रे. खरंय. मग इतकी वर्षं आपण चुकीचा उच्चार करत होतो लिहिता, वाचता, बोलताना !!

तो : हम्म.. खरंय.

मी : पण मग आपल्याला असं चुकीचं कसं शिकवलं असेल शाळेत? अर्थात शाळेतच. इस्रायल.. सॉरी इस्रायल या शब्दाची पहिली ओळख मला शाळेतच झाली असणार. घरी कशाला आम्ही इस्रायलबद्दल गप्पा मारणार आहोत म्हणा.

तो : अरे चूक अशी कोणाचीच नाही. आपल्याला कदाचित बरोबरच शिकवलं असेल. किंवा नसेलही. पण मुद्दा तो नाही. मुद्दा हा आहे की ही चूक वेगळीच आहे. देवनागरी लिपीची चूक आहे ही.

मी : ?

तो : अरे आता बघ ना. आपण 'स्रा' कसं लिहितो? 'स' मधून तिरकी रेष देऊन.. बरोबर? पण देवनागरी वाचताना ती तिरकी रेष म्हणजे 'त्र' मधली खालची रेष वाटते. अँड देअर यु गो. स्र चा स्त्र, स्रा चा स्त्रा आणि 'इस्रायल' चा इस्त्रायल

मी : आईशप्पत !! खरंच यार.. कित्येक वर्तमानपत्र, मासिकं इत्यादी छापील ठिकाणीही ही चूक दिसते यार.

तो : आणि माझा काही अगदी दावा बिवा नाही पण ही कॉमन चूक होते ती देवनागरीतल्या स्र आणि स्त्र च्या सारख्या दिसण्यामुळे. पण अर्थातच उच्चारात बराच फरक पडतो.

मी : आयला आता मला लक्षात आलं की इंग्रजी चित्रपटात किंवा जनरल बोलताना उच्चारल्या जाणार्‍या 'इस्रायल' चं किंवा खरं तर 'इझ्रायल' चं  मराठीत बोलताना (आणि लिहितानाही) 'इस्त्रायल' कसं होतं ते.

तो : हाहाहा

मी : असे अजून बरेच शब्द असतील रे..

तो : शक्य आहे.

मी : म्म्म्म्म्म्म.... यस्स... स्रोत... स्रोत स्त्रोत... स्त्रोत स्रोत !!

तो : परफेक्ट

मी : आणि... हिंस्र की हिंस्त्र??

तो : हो रे.. हे पण तसंच वाटतंय. पण नक्की कल्पना नाही.

मी : मलाही.  बघू.. शोधावं लागेल.

77 comments:

 1. तुझ्या लेखणीतनं स्र हे 'स्र' सारखं स्रवतं की 'स्त्र' सारखं?? ;)

  ReplyDelete
  Replies
  1. हाहाहा.. स्र सारखं स्रवतं !!! यप्प.. अजून एक शब्द :)

   Delete
 2. भारी आहे हेरंब....नशीब मी माझा ब्लॉग तुझ्याकडे शुद्धलेखना तपासाया दिला नाही ते.....बंद करावा लागला असता त्या मेळाव्याचं बिगुल वाजेपर्यंत...:)

  अवांतर... आज किती महिन्यांनी की वर्षांनी मी मब्लॉविला आपले ब्लॉग्ज एकाखाली एक पाहातेय....आवडलं....:)

  मस्त पोस्ट....मर्मावर बोट ठेवणारी की काय म्हणू....इज्राएल..इज इट?? .. :)

  ReplyDelete
  Replies
  1. हाहाहा.. नाही बंद नसता करावा लागला. पण कम्प्लीट मेळावा मी तुला स्पॉन्सर करायला लावला असता ;)

   आयला हो.. ते मब्लॉवि चं मी आत्ता बघितलं :) तरी एक मेन 'पार्टी' मिसिंग आहे :P

   यप्प.. इज्राएल बेस्टे... सेफ ;)

   Delete
 3. भारी कन्फ्युजन!!
  डोक्याला मुंग्या येत आहेत!!!!
  स्रोत? स्त्रोत? पेक्षा Sorces बेस्ट आहे!

  ReplyDelete
  Replies
  1. हाहाहा.. पण मराठीत काय म्हणशील?

   Delete
  2. स्रोत ;)उत्तर सापडलं आहे :D
   शिवाय खुराक मिळाला आहे या पोस्ट च्या निमित्ताने ते वेगळंच!

   Delete
  3. यस्स.. तेच सांगतोय.. स्रोतच बरोबर आहे :))

   खुराक :)

   Delete
  4. येस्स खुराक! :)

   Delete
 4. हिंस्र,स्रवणे,स्रोत...हे बरोबर.

  ReplyDelete
  Replies
  1. सहमत काका. फक्त हिंस्रबद्दल जरा गोंधळ होता. धन्यवाद.

   Delete
 5. सहस्र कि सहस्त्र ??

  ReplyDelete
  Replies
  1. सहस्रच. संदर्भ : सहस्रबुद्धे :)

   Delete
 6. हेहेहेहे मी बरेचदा ते सहस्त्रबुद्धे असं वाचायचे / म्हणायचे :-P

  ReplyDelete
  Replies
  1. हाहाहा.. मी ही.. अनेक वर्ष..

   Delete
 7. शाळाच घेतोयस तू..भारी! फेसबुकवर सहज म्हणून सर्च मारला तर 'सहस्त्रबुद्धे' (sahastrabudhe) आडनाव असलेली दोन चार माणसं सापडली..त्यांना ब्लॉगची लिंक पाठवायची इच्छा होतेय..:P

  ReplyDelete
  Replies
  1. हाहाहा.. अरे शाळा नाही.. पण हे नेहमीचं कन्फ्युजन आहे.

   मूळचे 'सहस्त्रबुद्धे' असतीलही काहीकाही... पण बाकीचे 'सहस्रबुद्धे' च हे नक्की :)

   Delete
 8. ओक मास्तर लई भारी... :)

  हे कधी लक्ष्यात आलं नव्हतं इस्रायलच्या बाबतित..
  आम्ही ही इस्त्रायल म्हणायचो, मग विंग्लिश सिनेमे आणि न्युझमध्ये ऐकून अ‍ॅक्सेंट बदलली... :)

  ReplyDelete
  Replies
  1. हाहाहा.. अरे कन्फ्युजनच भारी आहे हे..

   अगदी अगदी.. मीही पूर्वी इस्त्रायलच म्हणायचो. हॉलीवुडच्या कृपेने इस्रायल (खरं तर इझ्रायल) म्हणायला लागलो.

   Delete
 9. सहस्रबुद्धे या आडनावाच्या व्यक्तींच्या बाबतीत खरच हा गोंधळ फार होतो. छान पोस्ट हेरंब! मराठीच online प्रशिक्षण चालू करतोय का?

  ReplyDelete
  Replies
  1. धन्यवाद माधुरी... हो अगदी खरं आहे.. सहस्रबुद्ध्यांच्या बाबतीत हा कॉमन गोंधळ आहे.

   ऑनलाइन प्रशिक्षण.. हाहाहा.. हरकत नाही करायला.. पण वाचक आणि फॉलोअर गळत जाऊन हळू हळू शून्यावर येतील ;)

   Delete
 10. असे आणखी शब्द शोधायला हवेत ...

  ReplyDelete
  Replies
  1. खरंय.. बरेच शब्द असतील नक्की.. खाली अरुणाताईंनी दिलाय तो 'चतुरस्र' हा अजून एक शब्द.

   Delete
 11. "पण मग आपल्याला असं चुकीचं कसं शिकवलं असेल शाळेत? अर्थात शाळेतच." हा मुद्दा आवडला कारण====> हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे हे देखील शाळेत शिकवलं गेलं.

  लई भारी :)

  ReplyDelete
  Replies
  1. हाहा.. खरंय नागेश.. बरेच गोंधळ आहेत खरे !

   Delete
 12. म्हणजे आता शाळेत शिकलेले सगळेच ज्ञान पुन्हा तपासून घ्यावे लागेल!
  स्वतः सहस्रबुद्ध्यांनाही प्रश्न पडेल की, ‘ते सहस्रबुद्धे की सहस्त्रबुद्धे?’
  चतुरस्र की चतुरस्त्र?

  ReplyDelete
  Replies
  1. अरुणाताई, 'चतुरस्र' लक्षातच आला नव्हता.. बरं झालं यादीत अजून एकाची भर टाकलीत.

   Delete
 13. माझा अपुरे ज्ञान सांगते आहे :

  चतु + अस्त्र = चतुरस्र ( कारण अस्त्र मधील र आपण बाहेर घेतला आहे व चतुर असे म्हणत आहोत. चतुर् - चार + अस्त्र - फेकण्याचे शस्त्र. आणि म्हणून चतुरस्त्र म्हणजे = चाणाक्ष, चोहोबाजुचे ज्ञान असलेला.
  त्याप्रमाणे-
  सहस्त्र - हजार + बुद्धे- बुद्धी- ज्ञान, शहाणपण, आकलन, समज.
  आणि म्हणून ह्या शब्दाचा उच्चार सहस्त्रबुद्धे असा व्हावयास हवा.
  ( संदर्भ - महाराष्ट शब्दकोश)

  बाकी इझ्स्रायल असा उच्चार आपण करतो हे हॉलीवूडने शिकवले म्हणून.
  त्या देशाला आपला म्हणणारा माझा एक ज्यू मित्र देखील त्याचा उच्चार तसाच करतो.

  ReplyDelete
  Replies
  1. अनघा,

   चतुरस्र (चतुरस्त्र नव्हे) ची व्युत्पत्ती मी सध्या शोधतोय. पण तू म्हणतेस त्याप्रमाणे ती चतु+अस्त्र अशी नक्कीच नाहीये..

   आणि आता सहस्र (सहस्त्र नव्हे) बद्दल.. अग तीच तर गंमत आहे. हजर या शब्दासाठी संस्कृत शब्द सहस्र असा आहे सहस्त्र नव्हे.. उदाहरण देण्यासाठी आत्ता सहज नेट/ब्लॉग्ज धुंडाळत होतो तेव्हा हे सापडलं.

   https://docs.google.com/file/d/0B5QD3AkyOSlITVRPYlhVNjRueFU/edit?pli=1#

   यातला 'विष्णुसहस्रनाम' हा शब्द नीट बघ. सहस्र आहे सहस्त्र नव्हे.

   आणि इझ्रायल/इज्रायल/इस्रायल असा उच्चार आपण करतो ते हॉलीवुडने शिकवलं म्हणून नव्हे तर तोच उच्चार बरोबर आहे म्हणून.. फक्त पूर्वी आपण चुकीचा उच्चार करत होतो आणि हॉलीपटांमुळे आपल्याला योग्य उच्चार कळला.

   Delete
  2. हेरंबा, सहस्र+बुद्धे ह्यावर म्हणे बरीच चर्चा झालेली आहे...ते स्त्र नसून स्र च आहे. काळाच्या ओघात अपभ्रंश झालेला आहे म्हणे.
   आणि हजार म्हणजे सहस्र. बरोबर. जरी संदर्भासाठी महाराष्ट्र शब्दकोश वापरला तरीही लिहिताना मी पुन्हा तीच चूक परत केलेली आहे. कमेंट करताना 'माझा' न लिहिता मला ते 'माझं' असं लिहायचं होतं. तेही न तपासता मी कमेंट टाकलेली आहे ! क्षमस्व.

   Delete
  3. आणि हा काळाच्या ओघात झालेला अपभ्रंश म्हणजे मी म्हणतोय ती स ला दिलेली तिरकी रेष जी स्त्र सारखी वाटते तीच असणार असं माझं ठाम मत आहे.. :)

   Delete
 14. मुळ पोस्टसाठी : :)
  .... विचारात टाकले आहेस वगैरे....अनघाला अनूमोदन!!

  अवांतर (अगोचरपणा ) : मी तर सरळ ’इज्रायल’ म्हणते ;)

  ReplyDelete
  Replies
  1. अख्ख्या 'इझ्रायल' ला विचारात टाकलंय.. ;)

   यस.. इज्रायल बरोबरच आहे (अमेरिकन इंग्रजी प्रमाणे.. करण ते लोक एस चा उच्चार झ असा करतात.. संदर्भ रियलाईझ)

   Delete
 15. अरे खरंच कि कधी प्रश्नच नव्हता पडला. अनघा ताई, +१.

  ReplyDelete
  Replies
  1. श्रद्धा :) .. शोधून बघ असे अजून शब्द..

   अनघाला उत्तर दिलंय तेच तुलाही :)

   Delete
 16. :)
  आज शाळेतील माझ्या वर्गातील मुलामुलींना हा प्रश्न मी घातला आहे.
  सध्या जगभर विखुरलेले आहेत.
  त्यातील बरेच त्यावेळी बोर्डात आलेले आहेत.
  बघू काही उत्तर मिळतंय का ?

  ReplyDelete
  Replies
  1. मी बोर्डात आलेलो नाही हे त्यांना सांगू नकोस नाहीतर ते प्रश्न सिरीयसली घेणार नाहीत ;))

   Delete
 17. आत्ता जस्ट पेपर वाचताना मला अजून एक शब्द सापडला.. इस्रो (ISRO : Indian Space Research Organisation)..

  आणि मटाचे खुद्द ऑनलाइन संपादक सुहास फडके यांनीही बरोब्बर तीच चूक केलीये. त्यांनीही इस्त्रो लिहिलंय इस्रोच्या ऐवजी. इथे वाचा. :DDDD

  अभिमान बाळगावा अशी 'इस्त्रो' : http://goo.gl/X7e1C

  ReplyDelete
  Replies
  1. वर्तमानपत्राच्या लेखनात शुद्धलेखनाचा संदर्भ घेण्याचे दिवस संपलेत ! :)

   Delete
  2. अक्च्युअली मी अशुद्धलेखनाचा संदर्भ देत होतो.. ;)

   Delete
 18. अक्च्युअली मी अशुद्धलेखनाचा संदर्भ देत होतो.. ;)

  ReplyDelete
 19. ‘इस्रायल’ की ‘इस्राईल’? मी तर नेहमी इस्राईल असाच उच्चार करत आलो आहे. ‘इस्रायल’ हा हिंदी आणि इंग्रजी मधील उच्चार वाटतो. त्यासंदर्भात मी विकिपीडिया वर शोध घेतला असता. मला हा दुवा मिळाला - http://en.wikipedia.org/wiki/File:He-Medinat_Israel2.ogg

  वरील दुव्यावर जाऊन Israel चा उच्चार ऐकावा तो ‘इस्राईल’असाच वाटतो. मराठी वर्तमानपत्रांमधूनही अनेकदा इस्राईल असेच लिहिले जाते.

  ReplyDelete
  Replies
  1. हम्म.. इथे उच्चार इस्राईल असा आहे. इ किंवा य जे काय असेल ते असो पण स्र च आहे आणि स्त्र नाही हे महत्वाचं... बाकीचे शब्द कसे उच्चारतोस तू? सहस्र, चतुरस्र, हिंस्र वगैरे..

   Delete
 20. उत्तर सापडलं ! शाळेतील सोबत्याकडून मिळाल्याने मला अधिकच आनंद झालाय ! :) :)
  तो म्हणतोय:
  "अनघा,
  अस्र असा शब्द आहे (अस्त्र नव्हे) ज्याचा अर्थ कोपरा असा होतो. चतुरस्र म्हणजे वाच्यार्थाने चार कोपरे असलेला. चौकोन म्हटले तरी चालेल.
  भरताने आपल्या नाट्यशास्त्रात रंगमंचाचे तीन प्रकार सुचवले आहेत: विकृष्ट (आयताकार), चतुरस्र (चौरसाकार) आणि त्र्यस्र (त्रिकोणाकार). तेव्हा हा शब्द पहिल्यांदी आला असण्याची शक्यता आहे.
  ह्याचा आलंकारिक अर्थ अर्थातच ज्याला अथवा जिला अनेक पैलू आहेत. उदा: चतुरस्र अभिनेत्री.
  लोभ
  रवी"

  :) :)

  ReplyDelete
 21. तू शाळा घेतल्यावर लक्षात आलं, गेली कित्येक वर्षं मी या देशाला इज्राएल म्हणते आहे. :D

  हा जर्मन उच्चार आहे, आणि तोच डोक्यात पक्का बसलेला आहे.

  बाकी हमखास कन्फ्यूजनचा अजून एक शब्द म्हणजे स्तोत्र. मी कित्येक वर्षं ‘स्त्रोत्र’च म्हणायचे याला. :)

  ReplyDelete
  Replies
  1. सही गौरी.. तू सेफ आहेस... इज्राएल हा उच्चारही बरोबरच आहे.

   स्त्रोत्र.. हाहाहा :)

   Delete
 22. चतु: + अस्र =चतुरस्र असा तो संधी असावा
  जसा चतु: + भुज = चतुर्भुज
  इथे चतु: हे चतुर या अर्थाने नसून 'चौ' वा 'चार' या अर्थाने आहे .
  या सगळ्याचा "स्रोत" काय ? स्रोत का स्त्रोत ?

  ReplyDelete
 23. चतु: + अस्र =चतुरस्र असा तो संधी असावा
  जसा चतु: + भुज = चतुर्भुज
  इथे चतु: हे चतुर या अर्थाने नसून 'चौ' वा 'चार' या अर्थाने आहे .

  ReplyDelete
  Replies
  1. राजीवकाका, वरती अनघाने चतुरस्रचा गोंधळ सोडवलाय बघा.

   Delete
 24. हेरंबा, 'अस्र'चा संस्कृत अर्थ इथे बघ...
  http://pustak.org:5200/home.php/images/booksimage_L/home.php?mean=8729

  ReplyDelete
  Replies
  1. बापरे. पण आपल्या चतुरस्रमध्ये यातला कुठलाच बसत नाहीये !

   Delete
  2. का ?
   चतु (चार) + अस्र (कोना, कोपरा. रवी ज्याप्रमाणे म्हणतोय त्याप्रमाणे) = चौफेर ज्ञान असलेला/असलेली.
   नाही का ?

   Delete
  3. अग अस्रच्या अर्थात ज्ञान/गुण वगैरे नाहीये ना. कोना/कोपरा वगैरेने मेळ लागत नाहीये.

   Delete
 25. फारच रोचक लिखाण आणि चर्चा आहे ही. पोस्ट वाचताना सुरुवातीलाच माझ्या मनात स्रोत आणि स्त्रोत या नेहमी होणाऱ्या गल्लतीबद्द्ल येत होते ज्यावर तुम्ही लिहिलेच आहे. यावरून एक किस्सा आठवतो. ग्रामीण पाणी पुरवठा योजनेसंदर्भात मी काम करत असताना एका गावात ग्रामसभेला जायचे होते, एकूणच योजनेची माहिती देऊन सहभागी पद्धतीने नियोजन करण्यासाठी. मला पोचायला थोडा उशीर झाला. सभा नुकतीच सुरू झाली होती, सरपंच बोलत होते. कानावर शब्द पडत होते, पाण्याचं स्तोत्र. मला वाटलं सुरुवातीला देवाची प्रार्थना वगैरे करतात तसं हे पाण्याचं स्तोत्र वगैरे म्हणणार. मग पुढच्या संदर्भातून हे स्तोत्र म्हणजे स्रोत होता हे लक्षात आलं, त्यामुळे साहजिकच हसू आलं. मात्र त्यामागे चरचरीत जाणीव होतीच की ज्यांची बोली, प्रमाणभाषेपेक्षा वेगळी असते त्यांना प्रमाणभाषेतून (आणि ते ही सरकारी!!) व्यवहार करताना किती धडपड करावी लागतं असेल!

  ReplyDelete
  Replies
  1. प्रीति, धन्यवाद... नेहमीचे साधे शब्द आपण अनेक वर्षं कसे चुकीचे उच्चारत असतो नाही?..

   >> ज्यांची बोली, प्रमाणभाषेपेक्षा वेगळी असते त्यांना प्रमाणभाषेतून (आणि ते ही सरकारी!!) व्यवहार करताना किती धडपड करावी लागतं असेल!

   अगदी अगदी.. खूप मोठा विचार आहे हा.. लौकिकार्थाने शुद्ध/अशुद्ध असं काही असू शकत नाही. आपलं शुद्ध ते त्यांचं अशुद्ध आणि vice versa असू शकतं :)

   Delete
 26. कधी लक्षात आलं नव्हती ही चूक. मी पण इस्त्रायल तर कधी इझ्रायल पण म्हणायचो. माझं शुद्धलेखन कसं आहे ते पुन्हा सांगत नाही,पण त्या मुळे या चूका लक्षात येणं शक्यच नाही मला तरी!

  ReplyDelete
  Replies
  1. हाहाहा काका.. अहो माझ्याही सुरुवातीला लक्षात यायचं नाही. मागे एकदा एका मित्राशी बोलताना वर दिलेला संवाद झाला.. त्यानंतर मग असे शब्द शोधायची सवयच लागली. :)

   Delete
 27. Mla Ashok saraf v diabaties ch auoshad aathvat Israel mhtl ki..;-)

  ReplyDelete
 28. हाहाहा सागरा.. कोकाकोका ;)

  ReplyDelete
 29. या गुणीजनांच्या मेळाव्यात मोल्सवर्थ(काकां)ची वेगळी ओळख करून देण्याची आवश्यकता नसावी. त्यांच्या संशोधनानुसार:
  चतुरस्त्र - http://dsal.uchicago.edu/cgi-bin/romadict.pl?query=%E0%A4%9A%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0&display=utf8&table=molesworth

  सहस्त्र - (स्क्रोल करून पहा) http://dsal.uchicago.edu/cgi-bin/romadict.pl?query=%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0&display=utf8&table=molesworth

  हिंस्त्र - http://dsal.uchicago.edu/cgi-bin/romadict.pl?query=%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0&display=utf8&table=molesworth

  स्त्राव - (स्क्रोल करून पहा, गर्भस्त्राव, रक्तस्त्राव)
  http://dsal.uchicago.edu/cgi-bin/romadict.pl?query=%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5&display=utf8&table=molesworth

  ब्रिटीशांच्या उच्चाराच्या जवळपास उच्चार इझ्रय्ल असा होतो. देवनागरीत तो लिहीता येणार नाही. अमेरिकेत तो आणखीनच वेगळा होतो.

  ReplyDelete
  Replies
  1. संहिता/आदिती, तुम्ही दिलेली लिंक अर्थातच विश्वासार्ह आहे. पण इस्रायल, सहस्रबुद्धे वगैरे उदाहरणांचं काय?

   Delete
  2. >> इस्रायल, सहस्रबुद्धे वगैरे उदाहरणांचं काय <<
   इज्रय्ल हा तसाही मराठी शब्द नाही. हिब्रू असावा. त्याच्या उच्चारासाठी हिब्रू शब्दकोषच लागेल. त्यात पुन्हा आजच्या इज्रय्लमधे अनेक भाषा बोलणारे लोक आहेत (भारतासारखाच प्रकार, आपल्याकडे संस्कृतचे वेगवेगळे अ‍ॅक्सेंट आहेत); त्यामुळे कोणाचा अ‍ॅक्सेंट शुद्ध मानायचा हे आपल्याला बाहेरून, त्यांची संस्कृती माहित नसताना समजणं कठीणच आहे. माझ्या तोंडात (आणि कीबोर्डात) असणारा इज्रय्ल हा उच्चार साहेबाच्या देशातल्या सवयीमुळे आहे.

   शाळेत हिंस्त्र, अस्त्र, स्त्राव हे शब्द असेच शिकल्याचं आठवतं. सहस्र योग्य आणि सहस्त्र अयोग्य असं मी ही शिकल्याचं स्मरतं. मोल्सवर्थमधे सहस्त्र योग्य म्हटलेलं आहे. ही टायपो आहे का मूळ शब्द असाच आहे हे विश्वासार्ह छापील प्रतीवरून ठरवता येईल. कोणाकडे छापील प्रत असल्यास त्यात पहाता येईल.

   सहस्रबुद्धे/सहस्त्रबुद्धे हे आडनाव असल्यास ज्याची त्याची मर्जी.
   माझी एक मैत्रीण तिचं नाव संस्कृत शुद्धलेखनानुसार अदिति असं लिहीते, मी माझं नाव मराठी शुद्धलेखनानुसार अदिती असं लिहीते. उद्या कोणाचं नाव आदिती असं असेल तर इतर व्यक्ती त्याबद्दल आक्षेप घेऊ शकत नाहीत. (देवांची आई या अर्थाने जे नाव आहे ते अदिति/अदिती असं आहे.)

   --अदिती

   Delete
  3. शिवाय शुद्धलेखन सुधारणांनंतर सहस्त्र/सहस्र, स्त्रोत/स्रोत असा प्रश्न आला असेल तर मोल्सवर्थ सुधारणांच्या आधीचा शब्दकोष असल्यामुळे त्यातलं शुद्धलेखन आता प्रमाण मानता येणार नाही. उदा: कवी, गुरू अशा शब्दांबाबत.

   Delete
  4. अदिती, तुम्ही म्हणताय ते पटतंय मला. सहस्रबुद्धे आणि इस्रायल ही विशेषनामं म्हणून सोडून देऊ आपण क्षणभर. पण स्राव, स्रोत, हिंस्र, सहस्र, चतुरस्र वगैरेबाबत माझ्या मनात अजूनही संभ्रम आहे. तिकडे स्त्र नाही स्र असायला हवा असं मला वाटतं. अर्थात मी काही कोणी भाषापंडित नाही की तज्ज्ञ नाही त्यामुळे माझं मत हे "मला असं वाटतं" इथवरच सीमित राहणार आहे.

   Delete